बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती
सुधार योजनेअंतर्गत १९ कामांना मंजुरी
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहेत. शहरात ५ कोटी ५ लाख ७१ हजार रुपयांची १९ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मागील काळात आचारसंहिता असल्यामुळे बीड शहरातील कामांना कार्यादेश देता आले नव्हते. त्यामुळे कामे सुरू होण्यास उशीर झाला. बीड शहरातील कामे आराखड्याच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आली आहेत.
कुठे नियमानुसार, शासन निर्णयानुसार कामे झाली नसल्यास किंवा निकृष्ट दर्जाची झाली असल्यास, तेथील कामांची तक्रार द्यावी. तक्रारीवरून या कामांची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment