सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 9 July 2024
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दोन वर्षांतील महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दोन वर्षांतील
महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि. 8 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व योजनांच्या 'कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र' माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विभागातील सर्व अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले.
कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम : मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्य युक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र घडवणार आहे हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजना, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिका-यांना प्रशिक्षण,करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व संकेतस्थळ विकास योजना, मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार, आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी, प्रशिक्षण व मार्गदर्शन, राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील
विधानसभा निवडणुकीचा आढावा
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, वरिष्ठ निवडणूक उपायुक्त नितेश व्यास, निवडणूक उपायुक्त हिर्देशकुमार, वरिष्ठ प्रधान सचिव (मतदार यादी) एन.एन.बुटोलिया, महाराष्ट्राकरिता नियुक्त सचिव सुमनकुमार दास, सचिव (मतदार यादी) पवन दिवान तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचनाही केल्या.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उत्तुंग इमारतीमध्ये तसेच 200 पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील उत्तुंग इमारती आणि समूह सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, मतदार यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदार नावे समाविष्ट करणे यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा, नवीन मतदान केंद्रे उभारणे, मतदार यादीत मतदार कार्डांची छपाई व वितरण त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्याही सूचना भारत निवडणूक आयोगाकडून यावेळी करण्यात आल्या. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन आदीबाबतही भारत निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली.
या बैठकीनंतर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, डॉ.सुखबीर सिंग संधू यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायदान प्रक्रिया
गतिमान करण्याचा प्रयत्न प्रशंसनीय
- मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायदान प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्याय व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास गतिमानता येते, हे न्यायाधिकरणाने दाखवून दिले आहे. न्यायदानात आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणून ही प्रक्रिया गतिमान करण्याचा न्यायाधिकरणाचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी आज काढले.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या 33 व्या स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यायाधिकरणाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर उपस्थित होत्या, तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ, ‘महारेरा’चे अध्यक्ष न्या. संभाजी शिंदे, अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, उपाध्यक्ष न्या. पी आर बोरा, सदस्य देवाशिष चक्रवर्ती, मेधा गाडगीळ, रजिस्टार श्रीमती पी.एस झाडकर, विशेष कार्य अधिकारी सुरेश जोशी उपस्थित होते.
मुख्य न्यायमूर्ती श्री. उपाध्याय म्हणाले की, प्रशासकीय सेवेमध्ये नागरिकांप्रती जबाबदारीने काम करावे लागते. सेवा देताना पदोन्नती, बदली, नियुक्ती, निवृत्ती आदी प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. सेवेतील अनेक प्रकरणांमध्ये न्यायाधिकरणाने दिलेले निकाल पथदर्शी ठरतात. सेवाविषयक 95 टक्के प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण न्याय देत आहे. त्यामुळे निश्चितच पारंपरिक न्यायव्यवस्थेवरील दबाव कमी होत आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामार्फत ई- मॅट नावाने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यावर न्यायिक प्रकरणांची सद्य:स्थिती, आदेश व न्याय निर्णय यांची माहिती मिळते. तसेच न्यायाधिकरणामार्फत लवकरच न्याय निर्णय व आदेशांचे भाषांतर मराठीमध्ये करण्याकरिता 'सुवास ॲप' सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष न्या. भाटकर यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान सेवा विषयक कायदे, न्यायाधिकरणाची माहिती, सुविधा विषयक पुस्तिकेचे मुख्य न्यायमूर्ती श्री. उपाध्याय यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विधीज्ञ वैशाली जगदाळे व पूर्वा प्रधान यांचा न्यायाधिकरणातील अनुभव आधारित संवाद देखील सादर करण्यात आला. विधीज्ञ एम.डी लोणकर, पूनम महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विशेष कार्य अधिकारी श्री. जोशी यांनी केले, तर आभार रजिस्ट्रार श्रीमती झाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायाधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट
सातारा व पुणे जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट
मुंबई दि. 8 : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना दि. 09 जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असून त्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा व पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून त्या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे. नदीकाठी/ दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. नदीनाल्याच्या पूलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा संपर्क क्र. 1077 हा असून यावर संपर्क साधावा. असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
0000
Monday, 8 July 2024
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 8 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी 15 जुलै 2024 पर्यत अर्ज करता येणार असून निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होईल. उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार असून 2 सप्टेंबर 2024 रोजी निवड यादी जाहीर होईल. या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्तीनुसार लाभार्थी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.
शासकीय वसतिगृहामधून प्रवेश अर्जाची पी.डी.एफ. आवश्यक त्या प्रतीसह सहायक संचालक कार्यालयात सादर करावी. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक संलग्न करुन गृहपालाकडे सादर करावा. विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. त्यांना किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक राहील. विद्यार्थी वसतिगृहास प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील हा विद्यार्थी रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली महिती खरी व अचूक असल्याबाबत),कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र,भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र/करारनामा,महाविद्यालया
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
