Monday, 8 July 2024

महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार

 महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्यपुरस्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकृषी मंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार

            मुंबई दि 8:- माजी सरन्यायाधीशकेरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार  समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 यावर्षाचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्यपुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या 'ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह'मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ॲग्रीकल्चर टुडे च्या वतीने या पुरस्काराची सुरुवात सन 2008 पासून करण्यात आलेली आहे.

            महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षासर्वात मोठी बांबू लागवडतृणधान्य अभियानऔष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर यांसारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्पपंधानमंत्री किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्यत्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचे वितरणसूक्ष्म बाजरी कार्यक्रमडाळींच्या उत्पादनात देशात अव्वल स्थानतसेच एक रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असल्याचे पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहेत.

            कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण धोरणे आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.

            ॲग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेत प्रमुख भागधारकांचा मेळावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरीयांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानब्राझीलअल्जेरियानेदरलँड इत्यादी देशांचे राजदूततसेच महाराष्ट्रउत्तर प्रदेशहरियाणाहिमाचल प्रदेशनागालँड आदी राज्यांचे मंत्री यांचा समावेश असणार आहे.

            सन 2008 पासून या पुरस्काराची प्रथम सुरुवात करण्यात आली असून कृषी क्रांतीचे प्रणेते प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश या राज्याला प्रदान केला होता. आतापर्यंत या पुरस्काराने माजी कृषीमंत्री शरद पवारकेंद्रीय मंत्री राजनाथ सिंहकेंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानअखिलेश यादवदिवंगत नेते प्रकाश सिंह बादलवर्गीस कुरियनएम. एस. स्वामिनाथन इत्यादी मान्यवरांचा गौरव करण्यात आलेला असून स्वामिनाथन यांनी दहा वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. सध्या डॉ. एम.जे. खान हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

            2023 करिता सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022 करिता तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे

 मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कसज्ज रहावे

                                                     - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 8 : राज्यात सर्व दूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे.या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढामदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नयेअसे आवाहन यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केले.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 9 जुलै रोजी मुलुंडला आयोजन

 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार

मेळाव्याचे 9 जुलै रोजी मुलुंडला आयोजन

 

          मुंबईदि. ८ : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवर ९ जुलै २०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामिठागर रोडठाकूरवाडीमुलुंड (पूर्व)मुंबई - ४०००८१ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या कौशल्य रोजगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात  मुंबई जिल्ह्यातील सीआयआय (CII), शिंडलर (Schndilar), महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेडपेटीएममॅजिक बसचाणक्य स्टाफिंगएमईपी इन्फ्रॉस्ट्रक्चरएलआयसीएड्रॉमेडा सेल्स अॅन्ड डिस्ट्रीब्युशन प्रा. लि.बीटीडब्लू व्हीसा सर्व्हिस प्रा.लि.युवा शक्ती प्रा.लि. यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असूनत्यांच्याकडील रिक्त पदांसाठी मुलाखती होणार आहेत त्यानुसार त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास शासनाचे विविध महामंडळाच्या कर्जाच्या योजनेबाबत महामंडळाचे प्रतिनिधी माहितीसह उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १० वी नापास /१० वी पास/१२ वी पास/आय.टी.आय/पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावेअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाई करावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई महानगरपालिका, पोलीस आयुक्तांना सूचना

 ड्रंक अॅण्ड ड्राइव्हरोखण्यासाठी कडक कारवाई करावी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्जबाररेस्टॉरंटवरही कारवाई करावी

       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई महानगरपालिकापोलीस आयुक्तांना सूचना

          मुंबईदि. 8 : मुंबईतील ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्तेचौकवर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करून ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावीअशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्यात यावीअशी सूचनाही मुंबई महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

            विशेषत: रात्रीच्या वेळेस तसेच विकेंडच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर (Repeat offenders) कडक कारवाई करण्यात यावी. अशा हॅबिच्युअल वाहन चालकांचे परवाना रद्द करण्यात यावेत. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्जबार आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करावी. पब्जबाररेस्टॉरन्ट चालू ठेवण्याची वेळध्वनिप्रदुषणाचे नियमआवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात. रात्री उशीरा सुरू राहणारे बारपब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावेअशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

            मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावीअशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका

 _*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं  9922238922   आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं


. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल

 मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल

-मंत्री दीपक केसरकर

मुंबईदि. 8 - मुंबईत रात्री मोठा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईलअशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

काल रात्री मोठा पाऊस झाल्याने मुंबईतील परिस्थितीबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यावेळी श्री. केसरकर यांनी सद्यस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली.

पावसामुळे विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक बंद असून दोन तासात परिस्थिती सामान्य होईलअशी माहितीही त्यांनी दिली.

                            ००००

जे काही आहेः ते..........


 

Featured post

Lakshvedhi