Thursday, 27 June 2024

विधानपरिषदेच्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शोकप्रस्ताव

 विधानपरिषदेच्या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शोकप्रस्ताव

 

            मुंबईदि. 27 : विधान परिषदेचे माजी दिवंगत सदस्य गंगाधर गाडेमधुकर वासनिकमधुकर देवळेकर,  वसंत मालधुरे आणि बळवंतराव ढोबळे यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत शोक प्रस्तावाद्वारे दुःख व्यक्त केले. या माजी सदस्यांना सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिवंगत माजी सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. गंगाधर गाडे यांच्याबाबत बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या कीश्री.गाडे यांनी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नोव्हेंबर 1999 ते एप्रिल 2000 या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. मधुकर देवळेकर यांच्याबाबत संवेदना व्यक्त करताना उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याश्री.देवळेकर हे 1978 ते 1982 मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर काम केले होते. ते अत्यंत निस्पृह सदस्य होते.

            डॉ.मधुकर वासनिक यांच्या कार्याचा गौरव करताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की डॉ.वासनिक हे नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून नागपूर पीपल्स वेल्फेअर सोसायटी व पंचशील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. सन 1990 मध्ये विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून ते निर्वाचित झाले होते. वसंत मालधुरे यांच्याबाबत भावना व्यक्त करतानाश्री.मालधुरे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी विदर्भातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष योगदान दिले होते. सन 1990 साली अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर ते निर्वाचित झाले होतेअशी माहिती उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिली. बळवंतराव ढोबळे यांच्याविषयी बोलताना उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्याश्री.ढोबळे हे नागपूर महानगरपालिकेत अनेक वर्ष सदस्य होते. नागपूर मधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून 1998 साली ते विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते.

चिल्ड्रेन ऐड सोसायटीमधील उन्हाळी सुट्टीत घरी न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरे उपक्रम राज्यभर राबवावा

 चिल्ड्रेन ऐड सोसायटीमधील उन्हाळी सुट्टीत 

घरी न जाऊ शकणाऱ्या

विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरे 

उपक्रम राज्यभर राबवावा

- मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. 28 :- महिला व बाल विकास विभागाच्या चिल्ड्रेन ऐड सोसायटीमधील जे विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत घरी जाऊ शकत नाहीतअशा विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी शिबिरांचे आयोजन करावे. त्याचप्रमाणे हा उपक्रम राज्याच्या सर्व विभागात राबविण्यात यावाअसे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 10 वी12वी तसेच व्यवसाय प्रशिक्षणात उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच पॅराऑलिंपिक खेळामध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूचा सत्कार मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आज  चिल्ड्रेन  ऐड सोसायटीमाध्यमिक शाळामानखुर्द येथे करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्याला  विभागीय उपायुक्त सुवर्णा पवारमुख्याधिकारी बापूराव भवानेप्रकल्प बालविकास अधिकारी श्रीमती प्रेमा घाटगेशरद कुऱ्हाडे तसेच इतर अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यातील कोकण विभाग आणि विशेषतः दहावीबारावीतील विद्यार्थिनी ह्या नेहमी परीक्षेत अव्वल असतात, असे सांगून मंत्री कु.तटकरे यांनी सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

000

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा

 विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांना 

मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र विधिमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत वि. स. पागेजयंतराव टिळकरा. सु. गवई अशा अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या विचारांची परंपरा लाभलेली असून या सभागृहाच्या माध्यमातून संसदीय आयुधांचा वापर करून सदस्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील सर्वश्री सुरेश धसप्रवीण पोटे पाटीलरामदास आंबटकरनरेंद्र दराडेविप्लव बाजोरिया हे पाच सदस्य २१ जून २०२४ रोजी निवृत्त झाले. या निवृत्त झालेल्या सदस्यांना विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारअल्पसंख्याक विकास व औकाफ पणन मंत्री अब्दुल सत्तारगृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीवरिष्ठ सभागृहाच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाचा लौकिक वाढवलापावित्र्य जपले. विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्यांनी आपापल्या भागाचे  प्रतिनिधित्व करून त्या भागातील समस्यांना न्याय मिळवून दिला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी निवृत्त झालेल्या सदस्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. विचारमंचाचे सभागृह आहे. विविध वैचारिक चर्चा या सभागृहात होतात. मर्यादित सदस्य संख्या असल्यामुळे त्यांच्या विचाराला या ठिकाणी अधिक चांगला वाव मिळतो. त्यामुळे सदस्यांना मत मांडण्यासाठी वेळ मिळतो. सदस्य आपले विचार सविस्तर मांडून जनतेला न्याय देण्याचे काम करू शकतात. निवृत्त होत असलेल्या सदस्यांनी या सभागृहात उत्कृष्ट असे काम केले असल्याचे सांगून त्यांनी सर्व सदस्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सर्व निवृत्त होणाऱ्या सदस्यांची सभागृहातील कामगिरीयोगदानाबद्दल अभिनंदन केले. विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे वेगळे महत्त्व आहे. या महत्त्वाच्या सभागृहात काम करून सभागृहात जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठीचा अनुभव घेतल्याने भविष्यात अधिक उत्तम काम आपल्या माध्यमातून होईलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जनतेबद्दलची तळमळ त्यांना नक्कीच पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि राजकीय व सामाजिक कार्यामध्ये यापुढेही त्यांची प्रगती होत राहीलअसे त्यांनी सांगितले.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह निवृत्त होणारे सदस्य सुरेश धसप्रवीण पोटे पाटीलरामदास आंबटकरनरेंद्र दराडे यांनी आपला अनुभव कथन केला. तर आमदार राजेश राठोडडॉ. मनीषा कायंदे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार डॉ.सत्यजित तांबे यांनी केले. समारंभानंतर उपस्थित सर्वांचे विधिमंडळाच्या प्रांगणात एकत्रित छायाचित्र घेण्यात आले.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)

दि.१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर

 

            मुंबई, दि. २७ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने  दि.१  जूलै २०२४  या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार हा कार्यक्रम राज्यभरात २५ जूलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. 

कार्यक्रमाचे टप्पे

            पुनरिक्षण – पूर्व उपक्रम– यामध्ये दि. २५ जून  ते २४ जूलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण.

             मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ.  आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे. विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधुन फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे,  नमुना १-८ तयार करणे०१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे हे कामकाज  करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण उपक्रम

            या अंतर्गत दि. 25.07.2024 (गुरूवार) रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील. तर  दि.25.07.2024 (गुरूवार ) ते दि. 09.08.2024 (शुक्रवार )दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी राहील. विशेष मोहिमांचा कालावधी यामध्ये दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत,मुख्य निवडणूक अधिकारीयांनी निश्चित केलेले शनिवार व रविवार आहे. (i) दावे व हरकती निकालात काढणे

             (ii) अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, (iii) डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 19.08.2024 (सोमवार) पर्यंत असून दि.  20.08.2024 (मंगळवार) रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

घरोघरी भेट देऊन पडताळणी

            विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम2024 अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये घरोघरी भेट देवून नागरिकांची माहिती गोळा केलेली आहे. तथापियेत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका2024 मध्ये काही नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत. यामुळे आता विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25.06.2024 ते 08.07.2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम2024 दरम्यान शिल्लक राहिलेल्या घरांना गृह भेटी देणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा सार्वत्रिक निवडणूका2024 मध्ये मतदार यादीत नावे आढळून न आल्याबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे गृहभेटी देतील. त्या गृहभेटी दरम्यान पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात येईल :-  नोंदणी न केलेले पात्र मतदार (०१ जुलै२०२४ रोजी पात्र)तसेच  एकापेक्षा अधिक नोंदी/मयत मतदार/ कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार आणि मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती या प्रमाणे कामकाज करण्यात येईल.

मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण

             याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या दि.20 जून 2024 च्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचना विचारात घेवून करण्यात येणार आहे. याद्वारे मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रे निवासाच्या जवळ ठेवण्याबाबतचा प्रयत्न केला जाणार आहे.

                 मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणादरम्यान अति ऊंच इमारती/हौसिंग सोसायटी समूह जेथे सामान्य सुविधा असलेली जागा किंवा सभागृह त्या इमारतीच्या परिसरामध्येच तळमजल्यावर उपलब्ध आहे अशी ठिकाणेशहरी भागातील झोपडपट्टी तसेच विस्तारीत होणारे शहरी /निम शहरी भाग यामध्ये नविन मतदान केंद्र प्रस्तावित करण्याबाबत योग्य प्रक्रियेचे पालन केल्यानंतर मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

                सर्व कुटुंब एकाच ठिकाणी आणि शेजारी हे एकाच विभागात असतील आणि मतदार यादीत व मतदार ओळखपत्रात एकसमानता यावी अशाप्रकारे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

                पूर्व पुनरिक्षण उपक्रमात मतदार ओळखपत्र (EPICs) संदर्भातील १०० % त्रुटी दुर करण्याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यांचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

            मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाहीअसे होऊ नयेयासाठी पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत दि.25 जुलै ते 9 ऑगस्ट2024 या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनीत्यांचे नोंदणी केलेले नावपत्तावय व इतर तपशिल बरोबर आहे का ते तपासून घेऊनत्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत तो तपशील दुरुस्त करुन घ्यावा. यातून मतदार यादी अधिकाधिक बिनचूक होण्यास मदत होईल. दि.1 जुलै2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत मतदार म्हणून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करु शकतात. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची ही महत्वाची संधी असल्याने पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करावी. मतदार यादीत नवीन नाव नोंदविण्यासाठी व नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी किंवा मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी पुढील दोन ऑनलाईन पर्यायांचा वापर करु शकता.

              मतदार सेवा पोर्टल - http://voters.eci.gov.in/  ,  त्याचप्रमाणे वोटर हेल्पलाईन ॲप त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास भेट देऊनही प्रत्यक्ष अर्ज भरता येईल.

             भारत निवडणूक आयोगाच्या दि.20.06.2024 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार दि.01.07.2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्याबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवार दि.25 जून2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

               मतदार यादी सर्वसमावेशक व त्रुटी विरहीत करण्यावर आयोगाचे कायम लक्ष केंद्रीत आहे.  कोणताही पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून तसेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित राहू नये अशी आयोगाची भावना आहे. सबब त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहेजर आतापर्यंत नावनोंदणी झाली नसेल तर नावनोंदणी करून आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

******

धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी

 धनंजय मुंडेंनी हिंगोलीच्या त्या शेतकऱ्यास बांधावर पोहोच केली बैलजोडी

 

            मुंबई, दि. 27 : शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैल जोडी भेट पाठवली आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात  विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रदर्शित केले होते.

             वृत्ताची दखल घेत मंत्री श्री. मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज श्री. मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.

            दरम्यान मंत्री श्री. मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधलायावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टर साठी देखील अर्ज करावाअसे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करूअसा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह स्थानिक   पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.

0000

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा

 महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून छत्रपती संभाजी नगर

जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा

 

            मुंबई, दि. 27 : महसूल मंत्री तथा पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विविध विषयांवरील आढावा बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

            या बैठकीत सिल्लोड तालुका दूध संघाने महानंदासोबत सदस्यत्व   देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सिल्लोड तालुक्यातील सोयगाव पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.

            तसेच जिल्ह्यातील महसूल आणि पशुसंवर्धन विभागाशी निगडित इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मंत्री श्री. विखे पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर मधील सर्व समस्यांचा आढावा घेत त्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

            या बैठकीसाठी पणन व अल्पसंख्याक विकास विभाग मंत्री अब्दुल सत्तारमहसूल विभागाचे अपर सचिव राजेशकुमारमहानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर तर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया उपस्थित होते.

0000

कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी

 कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थानच्या

विकासासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 27 : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामधील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान तीर्थक्षेत्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत ’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. येथे नवरात्र उत्सवासह वर्षभर देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज विधिमंडळातील समिती कक्षात श्री जगदंबा देवस्थान (ता. येवला) तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. यावेळी अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरापर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजग्रामविकास विभागाचे सहसचिव काळू वळवी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीकोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान येथे नवरात्र उत्सवात विविध भागांतून येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असते. भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसराच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने त्रुटींची पूर्तता करून घेऊन नियोजन विभागाकडे पाठवावा. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी देखील याबाबतची बैठक घ्यावीअसे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

०००

Featured post

Lakshvedhi