Tuesday, 25 June 2024

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

 मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ

निवडणुकीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

             मुंबईदि. २५ : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदारांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई शहर निवडणूक शाखेने दिली आहे.

             भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील  मतदारांना मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्र संदर्भात माहिती  देण्यासाठी 022-20822693 हा हेल्पलाइन क्रमांक तसेच https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे मुंबई शहर, जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.

000

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

 मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

खतेबियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेतेकंपन्यांवर कठोर कारवाई करावी

                                                                                                                                                 मुंबईदि. २५ : राज्यातील शेतकरीनागरिक यांना नैसर्गिक आपत्तीशेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावीअसेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खतेबियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.                                                          

            सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटीलसहकार मंत्री दिलीप वळसे -पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेपणन मंत्री अब्दुल सत्तारग्रामविकास मंत्री गिरीश महाजनमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,  मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेकृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधाकृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.                                                                                                                                     मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीशेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाहीअसे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावाअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुकेजिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ‘ला निना’मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

            खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.

            यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टरसोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टरभात पिकाखाली १५.३०लाख हेक्टरमका पिकाखाली ९.८० लाख हेक्टरकडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा  करण्यात आल्याची माहिती, प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली.

0000


 

सिमी संघटनेवरील बंदीबाबत बेकायदेशीर कृत्ये; प्रतिबंधासंदर्भात न्यायाधीकरणाची सुनावणी

 सिमी संघटनेवरील बंदीबाबत बेकायदेशीर कृत्ये;

प्रतिबंधासंदर्भात न्यायाधीकरणाची सुनावणी

 

            मुंबईदि. 25 बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3 (1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ सिमी’ या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 अन्वये केंद्र शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतच्या उलट तपासणीसाठी नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्रकुमार कौरव यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधीकरणाचा दौरा राज्यात होत आहे.

            न्यायाधीकरणाने 26 जून 2024 रोजी कोर्ट रूम नंबर 19, पहिला मजलामुख्य इमारतउच्च न्यायालयफोर्टमुंबई आणि कोर्ट रूम नंबर एफउच्च न्यायालय मुंबईनागपूर खंडपीठनागपूर येथे 28 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दिवसअखेर सुनावणी आयोजित केली आहे. या संदर्भात ज्या इच्छुक व्यक्तींना साक्ष द्यावयाची असेलत्यांनी त्यांची दुय्यम प्रतितील शपथपत्रे निमस्वाक्षरीत न्यायाधीकरणाकडे दाखल करावीत. तसेच स्वत: 26 जून रोजी उलट तपासणीसाठी न्यायाधीकरणासमोर उपस्थित रहावेअसे आवाहन गृह विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

Central Government issues notification

SIMI notifies cross examination

 

            Mumbai, 25th June : According to Section 3 (1) of the Unlawful Activies (Prevention) Act, the Indian Islamic Student Movement ‘SIMI’ has been notified by the Central Government under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967 vide notification No.S.O.722 (E), dated 16.02.2024 issued on for cross-examination. In this regard Hon. Justice Mr. Purushaindra Kumar Kaurav, Delhi High Court, will held sitting at Court Room No. 19, first floor, High Court Main Building, Fort, Mumbai, Maharashtra on 26th June, 2024 at 10.00 a.m. onwards and at Nagpur Bench on 28th June at 10.00 a.m. onwards.

            Interested persons who wish to give evidence in this regard may file their affidavits (in duplicate) with the undersigned, and present themselves for cross-examination on the above date respectively, to appear before the Tribunal.

0000

 


--
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी

पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देणार दरडीने, भूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा

 पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाला अतिरिक्त निधी देणार

दरडीनेभूस्खलनाने संपूर्ण गाडलेल्या गावातील बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दर्जा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची बैठक

 

            मुंबईदि. 25 :- राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या 18 नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईलअसा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. या निर्णयामुळे राज्यातील अनेक पुनर्वसित गावठाणांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. त्याचबरोबर दरड कोसळून तसेच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडले गेलेल्या वाड्यावस्त्यातांडेपाडेगावांतील बाधितांना सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

            सह्याद्री राज्य अतिथीगृहातील समिती कक्षात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलप्राधिकरणाचे सहअध्यक्ष तथा मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटीलजलसंधारण मंत्री संजय राठोडमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामहसूल व वने विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डीमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठीविधी व न्याय विभागाच्या सहसचिव बुशरा सय्यदरस्ते सचिव संजय दशपुते उपस्थित होते.

            राज्याच्या विकासात विविध प्रकल्पांचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्यात ठिकठिकाणी पुनर्वसित गावठाणे उभारण्यात आली आहेत. मात्र, अनेक पुनर्वसित गावठाणे अद्यापि ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरित झाली नसल्याने त्यांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांचा विकास रखडतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व पुनर्वसित गावठाणे आहे त्या स्थितीत’ त्यांच्या ताब्यात घ्यावीत. या गावठाणांना 18 नागरी सुविधांसह विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज घेतला. त्याचबरोबर पुनर्वसित गावठाणात अनेक वर्षापासून वाटपाविना रिक्त असलेले भूखंड संबंधित प्रकल्पातील बाधितांना द्यावेतत्यानंतर या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना द्यावेतत्यानंतरही शिल्लक राहिले, तर राज्यातील इतर प्रकल्पग्रस्तांना या प्राधान्य क्रमानुसार देण्यात यावेतअथवा कोणी हे भूखंड घ्यायला तयार नसतील, तर नियमाप्रमाणे त्यांचे लिलाव करावेतअसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

            कोयना धरण प्रकल्पबाधीत गोकुळरासाटीहेळवाक मधील जलविद्युत प्रकल्पामुळे बाधीत शिवनदेश्वर प्रकल्पबाधित गावांसाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा. सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पामध्ये शंभर टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यांमध्ये चारशे रुपयांवरून दरमहा एका कुटुंबाला एका वर्षासाठी तीन हजार रुपये वाढ करणेतसेच याच प्रकल्पातील सावरघर येथील 29 कुटुंबाची खास बाब म्हणून रोख रक्कम देऊन पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली.  

            बीड जिल्ह्यातील गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातील सुकळी (ता.धारूर) येथील प्रकल्पग्रस्तांसाठी खास बाब म्हणून पुनर्वसन तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अमडापूर लघु पाटबंधारे प्रकल्पातील कुरळी व घामापूर (ता.उमरखेड) गावातील पात्र प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचा‍ निर्णय घेण्यात आला.


शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये

 शेतकऱ्यांना पीककर्ज देताना 

बँकांनी हात आखडता घेऊ नये

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"सिबील स्कोअरची सक्ती करता येणार नाही

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत वार्षिक पत आराखडा सादर

            मुंबईदि. २५ :- शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्पअत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावेअसा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ लाख २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय आणि नाबार्ड कडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेतअसे निर्देशही देण्यात आले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटीलकृषी मंत्री धनंजय मुंडेसहकार मंत्री दिलीप वळसे –पाटील, मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमारवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडेरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अविरल जैनसचिन शेंडे‘नाबार्ड’च्या मुख्य व्यवस्थापक रश्मी दरडविविध बँकाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र कृषीप्रधान आणि प्रगतीशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्यावर संकट आल्यास आम्ही शासन म्हणून त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत. त्यासाठी आम्ही संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या निकषाहून दुपटीने मदत केली आहे हेक्टर मर्यादाही वाढवली आहे. एक रुपयात पीक विमा दिला आहे. बँकांनी त्याला संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जगूअसेही ते म्हणाले.

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या योजनेला प्रथम प्राधान्य दिले आहे. केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे सहा हजार रुपये मिळून शेतकरी सन्मान योजनेतून मदतीचा हात दिला आहे. बँका मोठ्या शेतकऱ्यांना आणि काही कृषी उद्योगांना कर्ज देतात. पण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना हात आखडता घेतला जाऊ नये. बँकांनी शेतकऱ्यांच्या संकट काळात मागे उभे राहिल्यास तेही भक्कमपणे उभे राहतील. आम्ही देखील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करावी यासाठी प्रयत्न करतो. प्रोत्साहन देत असतो. केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी आणि सहकार क्षेत्राला मजबूत करण्याचे धोरण आखले आहे. बँकांनी शेतकऱ्यांसाठीच्या या संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरी सहकारी बँकाकृषी पतपुरवठा संस्थाजिल्हा बँकांना राष्ट्रीयकृत बँकांनी मदत केली पाहिजे. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता आहे. उद्योग क्षेत्राचेही महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलेले असते.  आपल्याकडे चांगले मनुष्यबळ आहे. आम्ही उद्योगांना रेड कार्पेट घातले आहे. दावोस येथूनही दीड लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करार केले गेले आहेत. त्यामुळे बँकांनाही यात सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच बँकानाही शासन म्हणून सहकार्य करूआपल्यामागे ठामपणे उभे राहूअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवारमहसूल मंत्री श्री. विखे-पाटीलसहकार मंत्री श्री. वळसे -पाटीलकृषी मंत्री श्री. मुंडे यांनीही महत्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली आणि चर्चेत सहभाग घेतला. सहकारी बँकांचे बळकटीकरणशेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्यावर या सर्वांनीच विविध सूचना केल्या.

            बैठकीत श्री. पांडे यांनी राज्याचा वार्षिक पत आराखडा सादर केला. तसेच गतवर्षीच्या‌ उद्दिष्टांची तौलनिक माहिती सादर केली.

            मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्याच्या वार्षिक पतपुरवठयाचे उद्दिष्ट हे रक्कम रु. ३३,९०६०१ कोटी होते. राज्यातील बँकांनी सक्रिय सहभागाद्वारे रु. ३८,७०,३८२ कोटी रु. वाटप करून ११८% एवढे लक्ष्य साध्य केले आहे.

            आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्राधान्य क्षेत्रांतर्गत एकूण उपलब्धी वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत रु. ६,४०,२९६ कोटी इतकी असून जे उद्दिष्टाच्या ९८% आहे. (वार्षिक उद्दिष्ट रु. ६,५१४०१ कोटी होते).

            कृषी क्षेत्रांतर्गत रु. १,६८,४८१ कोटी ह्या वार्षिक उद्दिष्टांच्या तुलनेत बँकांनी रक्कम रु. १,५४,१२० कोटींचे वितरण मागील आर्थिक केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या ९१% आहे.

            एमएसएमई क्षेत्रांतर्गत वार्षिक उद्दिष्ट रु. ३,६१,९१६ कोटी रु. च्या उद्दिष्टाच्या तुलनेत बँकांनी रु. ४,२३११५ कोटी रु. वितरण केले असूनजे वार्षिक उद्दिष्टाच्या ११७% आहे.

            आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता वार्षिक पत आराखडा हा रु. ४१,००२८६ कोटी प्रस्तावित केला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत २१% वाढ दर्शविते. एकूण पत आराखड्या पैकीप्राधान्य क्षेत्रासाठी रु. ६,७८,५४० कोटी प्रस्तावित आहेतजे गेल्या आर्थिक वर्षात ६,५१,४०१ कोटी रुपये होते.

0000


 


मतदार यादी व मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

 मतदार यादी व मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

 

            मुंबई, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून२०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी

हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

            मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक तसेच 022 69403398 आणि 022 69403396 हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या हेल्पलाइनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

            सोमवार १ जुलै२०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवनसेक्टर-२४. नेरुळ (पश्चिम)नवी मुंबई येथे पार पडणार आहे.

-----000------

 

 

 


 

Monday, 24 June 2024

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी समन्वयाने विभागांनी खबरदारी घ्यावी

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी

समन्वयाने विभागांनी खबरदारी घ्यावी

- उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. २४ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून पासून सुरू होत आहे. सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने विधिमंडळ सदस्य आणि पत्रकारांना उपलब्ध व्हावा. साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावीकर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            विधानभवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आलीत्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस पोलीससार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागसामान्य प्रशासन विभागअन्न व औषध प्रशासन विभागजिल्हाधिकारी कार्यालयबृहन्मुंबई महानगरपालिकाहवामान विभागएमटीएनएलमध्य आणि कोकण रेल्वेमेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै२०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे.  त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने नियोजन करावे. शनिवार२९ जून२०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावेसुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीसअन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारीमहिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्षस्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी स्वच्छता होईल, अशी दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. 

            या बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवलेउपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकरविधानमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, डॉ. पल्लवी सापळेअधिष्ठाताजे. जे. रुग्णालयविशेष शाखेचे दत्तात्रय कांबळेपोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, मुंबई महापालिकेचे महेश नार्वेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताविद्याधर पाटसकरश्रीमती रेशमा चव्हाण आणि विजय सानपअग्न‍िशमन समादेशक अधिकारी बाळासाहेब पाटीलमध्य रेल्वेचे सहायक परिचालन प्रबंधक अरुणकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi