Monday, 24 June 2024

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी समन्वयाने विभागांनी खबरदारी घ्यावी

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी

समन्वयाने विभागांनी खबरदारी घ्यावी

- उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. २४ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून पासून सुरू होत आहे. सर्व संबंधित विभागांनी उत्तमप्रकारे पूर्वतयारी करावी. अतिवृष्टीसंदर्भातील इशारा तातडीने विधिमंडळ सदस्य आणि पत्रकारांना उपलब्ध व्हावा. साथीच्या रोगांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावीकर्मचाऱ्यांना रेनकोट बरोबरच पावसाळी बूट देखील उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            विधानभवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशन संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आलीत्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस पोलीससार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागसामान्य प्रशासन विभागअन्न व औषध प्रशासन विभागजिल्हाधिकारी कार्यालयबृहन्मुंबई महानगरपालिकाहवामान विभागएमटीएनएलमध्य आणि कोकण रेल्वेमेट्रो प्रकल्प अशा सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            या बैठकीत प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४व्या विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२ जुलै२०२४ रोजी विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित ११ विधानपरिषद सदस्यांची निवड प्रस्तावित आहे.  त्यादृष्टीने विधानमंडळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि सुरक्षा विभागाने नियोजन करावे. शनिवार२९ जून२०२४ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज होणार असल्याने सन्माननीय सदस्यांचे जाण्याचे आणि सोमवारी येण्याचे रेल्वे आरक्षण प्राधान्याने उपलब्ध व्हावेसुरक्षा व्यवस्थेतील महिला पोलीसअन्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारीमहिला पत्रकार इत्यादींसाठी विशेष कक्षस्वच्छता गृहांची सकाळी आणि दुपारी स्वच्छता होईल, अशी दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. 

            या बैठकीस विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवलेउपसभापतींचे खाजगी सचिव रवींद्र खेबूडकरविधानमंडळ मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, अपर पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख, डॉ. पल्लवी सापळेअधिष्ठाताजे. जे. रुग्णालयविशेष शाखेचे दत्तात्रय कांबळेपोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, मुंबई महापालिकेचे महेश नार्वेकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंताविद्याधर पाटसकरश्रीमती रेशमा चव्हाण आणि विजय सानपअग्न‍िशमन समादेशक अधिकारी बाळासाहेब पाटीलमध्य रेल्वेचे सहायक परिचालन प्रबंधक अरुणकुमार आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi