Saturday, 22 June 2024

वटसावित्री विज्ञाननिष्ठा

 *वटसावित्री*! 

*नवीनच लग्न झालेल्या* एका *मित्राकडे* बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी *वटसावित्रीची पौर्णिमा* होती. मी सहज *नवीन वहिनींना प्रश्‍न केला*, काय वहिनी! *झाले का बुकिंग*?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे*.असल्या *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय* हो?


 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,


 मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*? *ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते*. अनेकांजवळ नसते. 

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.


 *जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-

 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌

 | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌

*|*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.


 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*

|’ प्रकारातील *समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.


 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.


 *शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’

 🙏

योग साधना आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी

 योग साधना आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी

        - आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

 

            मुंबईदि. २१ : सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. प्रत्येक जण आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी व उद्दिष्ट कृतीसाठी परिश्रम घेत आहे. यामध्ये मात्र शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी प्रत्येकाने योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवन शैलीचा भाग बनवावेअसे प्रतिपादन आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्रीरंगा नायक यांनी केले.

            आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्यसेवा आयुक्तालय कार्यालयात आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात  आयुक्त श्री.नायक बोलत होते.

            योग ही भारतीयांनी जगाला निरोगी राहण्यासाठी दिलेली साधना असल्याचे सांगत आयुक्त श्री.नायक म्हणाले कीया वर्षीच्या दहाव्या जागतिक योग दिवसाचा संदेश ‘स्वत: व समाजाकरिता योग (Yoga for self and society) असा आहे. दररोज नियमित योग साधना करून सर्वांनी निरोगी रहावे.

            शरीर व मनाला जोडणारा दुवा म्हणजे योग आहे. योग साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते, असे सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर यांनी सांगितले. यावेळी इशा फाऊंडेशनच्या योग प्रशिक्षक मोहिनी बासलसंदेश दादरकर व सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर करून योगाबाबत माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुभाष घोलप यांनी केले. आयुष विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक (वित्त) जयगोपाल मेननसहसंचालक सुभाष बोरकरडॉ.  स्वप्नील लाळेतसेच आरोग्य सेवा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


डीएलएड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

 

डीएलएड प्रथम वर्ष प्रवेशासाठी

ऑनलाईन अर्ज भरण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. 21 : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापिबऱ्याच संस्थालोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी 25 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवडनिर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी कळविले आहे.

            या बाबतच्या सर्व सूचनाप्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे च्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावीअसेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

एमएचटी-सीईटी २०२४ मध्ये कोणत्याही उमेदवारास अनुग्रह गुण दिले नाहीत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचा खुलासा

 एमएचटी-सीईटी २०२४ मध्ये कोणत्याही उमेदवारास अनुग्रह गुण दिले नाहीत

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचा खुलासा

 

            मुंबईदि. 21 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२४ (MHT-CET 2024) संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत याबाबत वस्तुस्थितीदर्शक  खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आला. तो पुढीलप्रमाणे.

 

            राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकीऔषधनिर्माणशास्त्रकृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी २०२४ (MHT-CET 2024) ही सामाईक  प्रवेश परीक्षा 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024 (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक 02 मे, 2024 ते 16 मे, 2024 (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. या परीक्षेस एकूण 3 लाख 30 हजार 988 विद्यार्थी, 3 लाख 94 हजार 33 विद्यार्थीनी  व 31 तृतीयपंथी उमेदवार होते. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. यापैकी 6 लाख 75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

            उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. हा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलेला आहे. या परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत.

            या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक/परीक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतीलतर सीईटी कक्षामार्फत  ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय  निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.

            समान  गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पसॅटांईल दाखविलेले आहेत. हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पर्सेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळालेले आहेत.

            तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तरतालिकेप्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीतहे सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगाने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय  निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.

             ही परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते. परंतूप्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असतेअसा आक्षेप आहे. तथापिप्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात  येतो. ही कार्यपद्धती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे. एप्रिल 2024 च्या परीक्षेआधी प्रसिध्द करण्यात आली होती.  त्यामुळे हा आक्षेप  वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच आतापर्यंत सीईटी सेलमुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास 200पालकांचे/उमेदवार तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांची शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. 

            यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पर्सेंटाईल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो. ही परीक्षा पद्धत शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येत आहे.

0000

 


काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार

 काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार

-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

            मुंबईदि. २१ : राज्य शासनाच्यावतीने काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मिरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

            या संदर्भात मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले कीजम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कँनल) जमीन राज्य सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मिर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

             आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कसे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, असा विश्वास मंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केला. बडगाम येथे राज्य सरकारच्यावतीने बांधण्यात येणा-या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी राज्य सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहेअशी माहिती मंत्री  श्री.चव्हाण यांनी दिली आहे.

0000

सत्यवन साठी वतपुजा,sreebag






 

Friday, 21 June 2024

जी.डी.सी.ॲण्ड ए. आणि सी. एच. एम. परीक्षेचा निकाल जाहीर विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

 जी.डी.सी.ॲण्ड ए. आणि सी. एच. एम. परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. २१ : सहकार विभागामार्फत जी.डी.सी. अॅण्ड ए. आणि सी. एच. एम. परीक्षा मे २०२३ मध्ये घेण्यात आला होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई केंद्रामधून परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था (३), पश्चिम उपनगरेमुंबई यांच्या कार्यालयात प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र घेऊन जावेअसे आवाहन जिल्हा केंद्र प्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक राजेंद्र वीर यांनी केले आहे.

            विद्यार्थ्यांनी गृहनिर्माण भवनतळमजलाकक्ष क्र. ६९वांद्रे (पूर्व)मुंबई ४०००५१ येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या आत त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतः उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावेत. एक महिन्यानंतर उर्वरित परीक्षार्थींना त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना नोंद केलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे त्यांचा निकाल पाठविण्यात येईलअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi