Saturday, 22 June 2024

काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार

 काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार

-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

            मुंबईदि. २१ : राज्य शासनाच्यावतीने काश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मिरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

            या संदर्भात मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले कीजम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कँनल) जमीन राज्य सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मिर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

             आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कसे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, असा विश्वास मंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केला. बडगाम येथे राज्य सरकारच्यावतीने बांधण्यात येणा-या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी राज्य सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहेअशी माहिती मंत्री  श्री.चव्हाण यांनी दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi