Wednesday, 19 June 2024

जिस किसी को अपने ग्रामपंचायत में Cluster Development Project संचालित करके 300 लोगों को स्वंरोजगार दिलाना चाहते हैं

 जिस किसी को अपने ग्रामपंचायत में Cluster Development Project संचालित करके 300 लोगों को स्वंरोजगार दिलाना चाहते हैं अयेसे मिलकर सबसे पहले 5 लोग पढे-लिखे चुनो, वे अपने घर में सुक्ष्म उद्योग स्थापित करने के लिए तैयार हो।  


उन 5 लोगों को कहो अपने साथ 5-5 पढे-लिखे लोगों को जोड़लें जो उनके मनमें उद्योग और व्यापार स्थापित करने कि तीव्र ईच्छा होनी चाहिए। 


अब सुची बनाओ, पहला कॉलम सीरीयल नंबर 1 से 30 का, दुसरा कॉलम हितग्राही का पुरा नाम, तीसरा  कॉलम उम्र, चौथा कॉलम शिक्षा, पांचवा कॉलम जाति,  छटवा कॉलम वॉटसॅप नंबर, सातवा कॉलम हस्ताक्षर का होना चाहिए। इतनी सुची 9423113365 इस वॉटसॅप पर भेजदो। सुची अप्रूवल हो जाने के बाद इन 30 हितग्राहीयों का आवेदन फार्म भरना है।  


30 का 1 झुम मिटींग लेलो जिसमें उपरोक्त वॉटसॅप में लिंक भेज दो, मैं सभी 30 हितग्राहीयों से क्लस्टर संबंध में बात कर लेता हुं।  


उन सभी 30 लोगों से अपने-अपने लिए 9-9 वही आवेदन फार्म भरवालो जिसमे सभी दस्तावेज जोडे होना चाहिए।  


30 हितग्राहीयों को कहो कि अपने आवेदन को उपर रखो और 9 दुसरे आवेदनों को निचे रख कर 1 क्लीप वाला फाईल लेकर उसमें 30 फाईल लेकर प्रपोजल बनाने साथ लेकर *ऊईके शिल्पग्राम सालेकसा जि. गोंदिया महाराष्ट्र* 9146238815 पर  फोन करो। आगे की जानकारी जैसा जैसा मैं बताऊंगा वैसा-वैसा करते जाना है।  अगर आप तैयार हो तो आगे बोलो।  


याद रहे 30 हितग्राहीयों को स्वयं के लिए 35% खर्च करने तैयार रहना अती आवश्यक है।  


जिन 5 लोगों को आपने चुना है वे अपने घर में स्वरोजगार हेतु युनिट सुरू करने तैयार होना चाहिए।  जैसे कच्चा माल, टुल-किट, पैकेजिंग और लेबलिंग के लिए लगनेवाला खर्च करने तैयार हो सके।  


अगर कोई मशीन खरीदना पडे तो कम से कम 25% भरने तैयार रहना चाहिए।  75% अनुदान मिलेगा।  


सभी 30 लोग आदिवासी ST के होनी चाहिए । 


यह मिनी क्लस्टर में 1 ही ग्रामपंचायत के लोग होना अनिवार्य है। 


अगर आपको मेगाक्लस्टर के ओर बढना है तो नजदीक-नजदीक वाले 4 ग्रामपंचायतों को जोडा जा सकता है। यदि किसीको बात समझ नहीं आया हो तो मुझसे बात कर सकते हैं।  नं. 9423113365 या 9146238815

| श्रीराम ||

 || श्रीराम ||


वटपौर्णमा परवावर आली आहे.  आज माझे व माझ्या मैत्रिणीचे सहज काही बोलणे झाले. मी या विषयावर दोन-तीन वाक्य बोलून गेले. तर तिने मला तू वटपौर्णिमा व हरतालिका यावर काही लिही असे सुचवले. आणि माझे विचार चक्र सुरू झाले. 

हिंदू धर्मात बेल, वड, पिंपळ, तुळस,,आंबा,कमळ, शमी, पारिजातक अशा काही झाडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. काही झाडांची फळे काही झाडांची पाने तर काही जणांची फुले वेग वेगळ्या देवांना अर्पण करतात. या सर्वांचे विविध औषधी उपयोग आहेत .आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 

जगात सर्वात दाट सावली असते वडाची. संपूर्ण मोठ्या झालेल्या वृक्षाच्या  पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे, त्याचे गुण वर्णन करणारे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. 

"कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्||"

अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते.  अशी घर होती तोपर्यंत कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून आहे .

 ज्येष्ठ महिन्याच्या जीवघेण्या घुसमट करणाऱ्या उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. उष्णतेने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!

वडात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात. वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपांत  औषध तयार होते. 

पक्ष्यांचेही वास्तव्य वडाच्या झाडावर असते.

पौर्णिमेच्या उपासाचा सात जन्माची काही एक संबंध नाही .आपण सर्वजण भागवत कथा ऐकतो त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. एकाच जन्मात पती असलेला गेल्या जन्मी पुत्र पुढच्या चरणी पिता असेही घडू शकते. जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या पेशी मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.

 संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या. १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असे सात वेळा १०० वर्षाच्या आयुष्यात घडू शकते म्हणून सात जन्म. 

आपण सध्या काय करतो? मोठी वडाची झाडे तर फारशी उरली नाहीतच मग वडाच्या फांद्या तोडून आणतो किंवा वडाचा पूजेचा कागद आणतो. दोन्ही कृती सावित्रीला शोभणाऱ्या नाहीत. कारण प्रत्येकाने फांदी आणायची म्हटले तर झाडाला राहणारच काय आणि कागद जरी म्हटला तरी वृक्षतोड होणारच आहे. या सगळ्याचा विचार करावा. उपासाचा याच्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. सावित्रीने पतीचे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पराकष्ठेचे प्रयत्न केले.तेही खंबीर राहून हातपाय न गाळता.आपणही आपल्या पतींना त्यांच्या व्यवसायात  त्याच्या समाज उपयोगी कार्यात भक्कम साथ द्यावी. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर आपला उपास म्हणून त्यांना बाहेर जेवायला सांगणे यासारखा विरोधाभास नाही. एखादे कार्य करत असताना त्यात तल्लीन झाल्यावर उपास घडणे ही वेगळी गोष्ट आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. वटवृक्ष हा अनेक पारंब्या असल्यामुळे वंश वृक्ष देखील मानल्या जातो त्याचा विचार करावा. आजकाल सर्व भगिनी वर्ग सुशिक्षित आहे. प्रत्येक व्रतवैकल्या मागील कारण जाणून घेऊन आपले आचरण तसे असावे. केवळ नटून थटून वडाला दोरे, चिंध्या बांधून काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवावे.

शतायुष्याच्या प्रार्थनेबरोबरच निसर्गाची कृतज्ञता मानण्याचा हा दिवस आहे. सावित्रीला हे वटमहात्म्य माहीत होते. म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण विनाकारणच केवळ उपचार म्हणून "वटवृक्ष " तोडले तर आपल्या सत्यवानाचे काय याचा विचार करण्याचा दिवस आहे. "वटपौर्णिमा""

यावर्षीपासून आपण वडाच्या फांद्या न तोडता वडाचे शास्त्रीय महत्त्व जाणून वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करूया. उपास करणे किंवा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

तसेच हरतालिका च्या उपासाचे देखील आहे त्याचा विचार नंतर करू . 


सद्गुरू चरणी अर्पण🙏🙏🙏

|| जय जय रघुवीर समर्थ||


सौ. वीणा भाले 

अकोला.

लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

 लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या परीक्षांकरिता

टंकलेखन कौशल्य चाचणीचे आयोजन

 

            मुंबईदि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक १ जुलै२०२४ ते १३ जुलै२०२४ या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

            लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या चाचणीचा दिनांकचाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील त्यांच्या प्रवेश प्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार आहे.

            प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidates Information >Instructions>General Instructions येथे 'Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test' या सदराखाली उपलब्ध असलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे, असे आयोगाने कळविले आहे.


शालेय गणवेशाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप

 शालेय गणवेशाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप

      

               मुंबईदि. 19 : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून  करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मविम बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (ऑनलाइन) करण्यात आले.

            मंत्री कु.तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमध्ये मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवमविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे(ऑनलाइन) सांगलीकोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट  आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीकेंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलीअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुलेयांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

            यावर्षी एक राज्य एक गणवेश योजनेनुसार राज्यभरात एकाच रंगाचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते.

             यापुढे  गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि मविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का, याचाही विचार करावा, अशा सूचना करून बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे  आभार मानले.

            महिलांना गणवेश शिवणकाम देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात, याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेशाचे  वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत होत आहे  आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

००००

मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी

 ‘मिशन धाराऊ’ लोकचळवळ म्हणून राबवावी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 19 : राज्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणेस्तनपान व शिशुपोषण याबाबत शास्त्रोक्त ज्ञानाद्वारे आनंदी मातृत्वाची संकल्पना समाजामध्ये रूजवण्याच्या उद्देशाने विविध शासकीय व अशासकीय घटकांच्या समन्वयातून सातारा जिल्ह्यामध्ये ‘मिशन धाराऊ माता- दुग्धामृतम्’ ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. ही योजना  शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयातून सामाजिक  लोकचळवळ म्हणून राज्यभर राबविण्यासाठी नियोजन करावे,असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

             मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांनी  सातारा जिल्ह्यातील मिशन धाराऊ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवएकात्मिक बाल विकास योजना आयुक्त कैलास पगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतुआजही समाजात याबाबत गैरसमजुती पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनाजिल्हा आरोग्य कार्यालयजिल्हा शल्यचिकित्सकयुनिसेफराजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन, बीपीएनआय (महाराष्ट्र) ग्रामपंचायतजिल्हा परिषद शिक्षण विभागस्थानिक अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ म्हणून जनजागृती केली पाहिजे, असे सांगून मंत्री आदिती तटकरे यांनी 'मिशन धाराऊतसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली.

            या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मदर सपोर्ट ग्रुपची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये  प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविकामदतनीसआशाप्राथमिक शिक्षिकाग्रामसेविका, महिला लोकप्रतिनिधी व इतर तज्ज्ञ स्थानिक महिला यांचा समावेश मदर सपोर्ट ग्रुपमध्ये करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

0000

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक

 दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. १९ : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

             राष्ट्रीय दृष्टीहीन संघमहाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरशालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदनदिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरीशिक्षण आयुक्त सूरज मांढरेमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगेशालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंततुषार महाजनराष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रशिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

             शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

आरोग्य विमा इन्सुरांच मधील सुधारित नियम


 

Featured post

Lakshvedhi