Sunday, 26 May 2024

*असं एका पायावर उभं राहता येत का तो बघण्याचा प्रयत्न 60 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीने करायला हवा म्हणजे आपण फिट आहोत की नाही हे कळेल - ऋतुजा दिवेकर.* 😍 *All senior citizens must watch this health related video +very.*

*नौतपा 2024 मभांजे काय

 *नौतपा 2024* 

वर्षातील सर्वात उष्ण नऊ दिवस, ज्याला नौतपा असेही म्हणतात, हे 25 मे रोजी सुरू होईल आणि 2 जूनपर्यंत चालेल. 

25 मे रोजी दुपारी 3:17वाजता सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने नौतपाची सुरुवात होईल. कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सूर्य कृतिकापासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि ८ जूनपर्यंत या नक्षत्रात राहील. या कालावधीतील पहिल्या ९ दिवसांना नौतपा असे  म्हणतात. यावेळी सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतील परंतु यावेळी शुक्र आणि गुरु या ताऱ्यांच्या अस्तामुळे त्यांचा प्रभाव कमी असेल. नौतपाच्या काळात सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. याचा परिणाम तीव्र उष्णतेवर होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार नौतपाच्या सर्व दिवशी सूर्य पूर्णपणे तापत असेल तर ते चांगल्या पावसाचे लक्षण मानले जाते. 

या काळात 8 जूनपर्यंत सूर्य 23 अंश ते 40 अंशांवर राहील. याचे कारण म्हणजे रोहिणी नक्षत्राचा अधिपती ग्रह चंद्र आहे. सूर्य हे तेज आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते, तर चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे. जेव्हा सूर्य चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा सूर्य या नक्षत्राला आपल्या प्रभावाखाली घेतो.

ह्या काळात सर्वांनी अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. उदा : काहीतरी खाल्ल्याशिवाय (रिकाम्या पोटी ) घराबाहेर पडू नये. 

बाहेर जात असताना पूर्वापार  परंपरागत उपचार पद्धतीनुसार खिशात एक कांदा नक्की  ठेवावा. 

भरपूर पाणी (फ्रीज चे नाही) चे सेवन करावे.

 *संकलन: उमेश पटवर्धन.*

Saturday, 25 May 2024

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

 बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

            मुंबईदि. २४ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

            उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थीयापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले)श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार २७ मे पासून शुक्रवार ७ जून २०२४ या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.

            उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.

            पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,

महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण

         मुंबई दि.25: मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमहाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.

000000

Clarification  of  Chief  Electoral  Officer  Maharashtra

Mumbai date.25: It is noticed that some old video from other states are getting circulated through social media showing miscreants trying to vitiate the poll process and particularly tampering with EVM. It is clarified that such videos are not related to Lok Sabha Elections 2024 in Maharashtra. The poll in the state is completed smoothly and peacefully.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

 बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार

            मुंबईदि. २४ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

            उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थीयापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले)श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार २७ मे पासून शुक्रवार ७ जून २०२४ या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.

            उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.

            पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Friday, 24 May 2024

प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

 प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना

बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

            मुंबई. दि. २४ :   अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अंतर्गत असलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलधुळे येथील एक बचाव तुकडी दि.२२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती.

            ही तुकडी घटनास्थळी पोहचून दिनांक २३.०५.२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजता अतिशय शौर्याने शोध व बचाव कार्य करतेवेळी नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाण्याचा तीव्रवेग व पाणी उसळी खात असल्यामुळे बोट पाण्याच्या भोवऱ्यात उलटून दुर्देवी घटना घडली. त्यात १ पोलीस अधिकारी व ४ पोलीस अंमलदार हे पाण्याच्या प्रवाहात अडकले, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदेसपोशि/०३ वैभव सुनिल वाघ आणि पोशि/ २८६ राहुल गोपिचंद पावरा यांना वीर मरण आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त बोटीमधील २ पोलीस अंमलदार यांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल यांनी दिली आहे.

            या घटनेची माहिती प्राप्त होताच महसूल मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआ. किरण लहामटेपोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाराज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसादव स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व वीरमरण आलेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पार्थिवावर शासकीय इतमामात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

 ८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२४ ची परतफेड

            मुबंई,दि. २४ - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.२४ जून२०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि.२५ जून२०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा)सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.  

            "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१" अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २५ जून२०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

             सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडेत्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२४ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस " प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली."असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांनारक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील.

Featured post

Lakshvedhi