*नौतपा 2024*
वर्षातील सर्वात उष्ण नऊ दिवस, ज्याला नौतपा असेही म्हणतात, हे 25 मे रोजी सुरू होईल आणि 2 जूनपर्यंत चालेल.
25 मे रोजी दुपारी 3:17वाजता सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने नौतपाची सुरुवात होईल. कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सूर्य कृतिकापासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल आणि ८ जूनपर्यंत या नक्षत्रात राहील. या कालावधीतील पहिल्या ९ दिवसांना नौतपा असे म्हणतात. यावेळी सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतील परंतु यावेळी शुक्र आणि गुरु या ताऱ्यांच्या अस्तामुळे त्यांचा प्रभाव कमी असेल. नौतपाच्या काळात सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. याचा परिणाम तीव्र उष्णतेवर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार नौतपाच्या सर्व दिवशी सूर्य पूर्णपणे तापत असेल तर ते चांगल्या पावसाचे लक्षण मानले जाते.
या काळात 8 जूनपर्यंत सूर्य 23 अंश ते 40 अंशांवर राहील. याचे कारण म्हणजे रोहिणी नक्षत्राचा अधिपती ग्रह चंद्र आहे. सूर्य हे तेज आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते, तर चंद्र शीतलतेचे प्रतीक आहे. जेव्हा सूर्य चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा सूर्य या नक्षत्राला आपल्या प्रभावाखाली घेतो.
ह्या काळात सर्वांनी अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. उदा : काहीतरी खाल्ल्याशिवाय (रिकाम्या पोटी ) घराबाहेर पडू नये.
बाहेर जात असताना पूर्वापार परंपरागत उपचार पद्धतीनुसार खिशात एक कांदा नक्की ठेवावा.
भरपूर पाणी (फ्रीज चे नाही) चे सेवन करावे.
*संकलन: उमेश पटवर्धन.*
No comments:
Post a Comment