Friday, 24 May 2024

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

 विधानपरिषद शिक्षकपदवीधर मतदारसंघाची

२६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

 

        मुंबईदि. २४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

            विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ)निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे सदस्य दिनांक  ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

            या निवडणुकीसाठी शुक्रवार३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर शुक्रवार७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार१० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार१२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होईलअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

A small help required.

 Hi All,


A small help required.


Will you please post this message in the known groups so that it gets circulated....


If you have come across any bright students coming from poor financial background who have finished their 10th standard this year and scored more than 80%, please ask them 

to contact the NGO - Prerana (Supported by Infosys foundation).


The NGO is conducting a written test and those who clear the test will be eligible for financial help for their further studies.


Please ask the students to contact the people mentioned below to get

the form:


Contact numbers:

1. Ms. Saraswati - 9900906338

2. Mr. Shivkumar - 99866 30301

3. Ms. Bindu - 99645 34667


Even if you don't know 

anyone, please  pass on this info, someone might be in need of this. www.infosys.com/infosys-foundation


Thanks 


Forward it in other groups as well.😊

If it helps even one person

 This is good information for poor students ☝️

कोकण पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी *दिनांक ३० मे २०२४*

 [ 1: कोकण पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी करण्याची शेवटची संधी *दिनांक ३० मे २०२४* 


ऑक्टोबर २०२० पुर्वी जे पदवीधर झालेले आहेत त्यांनी त्वरित आपले नाव नोंदवावे . 

*लागणारी आवश्यक कागद पत्रे...*

१ पदवीधर प्रमाणपत्र किंवा मार्क    लिस्ट ( पाच आणि सहा सेम )

२ रहिवासाचा पुरावा - पासपोर्ट/ ड्राइविंग लायसन्स/ चालु लाइट बिल/ वोटर कार्ड/ आधार कार्ड

३ नावात बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र

४ पासपोर्ट साईज फोटो 1: पदवीधर मतदार म्हणून नावनोंदणी ऑनलाईन फार्म लिंक


https://gterollregistration.mahait.org/

*जेवता जेवता बघा एक पोळी जास्त खाल.*🩷🙏🌞🌸🔔👌👌🕯️

 *जेवता जेवता बघा एक पोळी जास्त खाल.*🩷🙏🌞🌸🔔👌👌🕯️


Thursday, 23 May 2024

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करू

 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करू                                                                                                  - राज्यपाल रमेश बैस

      सातारा, दि.23 :- कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. निधी उपलब्धतेसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.          


            कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची (समूह विद्यापीठ) स्थापना ऑक्टोबर 2021 मध्ये झाली आहे. या विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणी याबाबत महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल श्री. बैस यांनी आढावा घेतला. यावेळी राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरू डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ.विजय कुंभार, उपसचिव रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.


            रयत शिक्षण संस्था ही देशातील अत्यंत जुनी व मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत जवळपास साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते, त्याप्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.


            या आढावा बैठकीत राज्यपालांनी विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असणाऱ्या करिअर ओरिएंटेड उपक्रम, स्किल ओरिएंटेड उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांकरिता निर्माण होत असलेला रोजगार, नोकऱ्या यांचाही आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेमार्फत बेळगाव मध्ये चालविण्यात येत असणाऱ्या शाळांबद्दलही राज्यपाल श्री. बैस यांनी माहिती घेतली.



0000


एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली पी.एन. पाटील

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

            मुंबई :- कोल्हापूरमधील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे सांगून त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

            मुख्यमंत्री म्हणतात, कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्वधडाडीचा लोकप्रतिनिधीस्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकऱ्यांचे प्रश्नपुनर्वसनाचे प्रश्नकामगारांचे प्रश्नमागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत माझ्याकडे पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिकराजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

            कालच मला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले होते. त्यानंतर मी तातडीने आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्याशी बोलून पाटील यांची प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. 

            मी पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांच्यासहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

000

                                                                            वृत्त क्र. 389

आमदार पी. एन. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला

                                                     - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 23 :- कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्वधडाडीचे लोकप्रतिनिधीकर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.   त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिकराजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी. एन. पाटील यांच्या कुटुंबियांच्यासहकाऱ्यांच्याकार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

0000

*‼ध्यान ( मेडिटेशन) चे फायदे‼

 *‼ध्यान ( मेडिटेशन) चे फायदे‼*


ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.


डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते. त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते. जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे नेते.


*ध्यानाचे फायदे:-*


आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारिरीक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे. आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो.


*१) ताबडतोब बरे होणे*


सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते.

ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते. लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात.

परिणामस्वरूप सर्व शारिरीक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.


*२)स्मरणशक्ती वाढते:-*


ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.


*३) वाईट सवयी नष्ट होतात:-*


खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.


*४) मन आनंदी होते:-*


कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापी आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.


*५) कार्यक्षमता वाढते:-*


भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात.

थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात.

किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.


*६) झोपेचे तास कमी होतात:-*


ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते.

त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.


*७) दर्जेदार नातेसंबंध:-*


अध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.


*८) विचारशक्ती वाढते:-*


आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापी मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाट्यपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.


*९) जीवनाचा उद्देश:-*


आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात…

साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.

आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.


*ध्यान का करावे?*

*ध्यानामध्ये काय ताकद आहे?*

*सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?*


जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल. जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वी वरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची आणि तुम्ही तो ध्यानातून ज्ञानाचा शोध घ्याल फक्त रोज किमान १५ मिनिटे ध्यान करुन.

Featured post

Lakshvedhi