Thursday, 23 May 2024

एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली पी.एन. पाटील

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

पी.एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

            मुंबई :- कोल्हापूरमधील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे सांगून त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

            मुख्यमंत्री म्हणतात, कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्वधडाडीचा लोकप्रतिनिधीस्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकऱ्यांचे प्रश्नपुनर्वसनाचे प्रश्नकामगारांचे प्रश्नमागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत माझ्याकडे पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिकराजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 

            कालच मला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले होते. त्यानंतर मी तातडीने आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले आणि डॉ. अजय केणी यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्याशी बोलून पाटील यांची प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. 

            मी पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांच्यासहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

000

                                                                            वृत्त क्र. 389

आमदार पी. एन. पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला

                                                     - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 23 :- कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्वधडाडीचे लोकप्रतिनिधीकर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.   त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिकराजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी. एन. पाटील यांच्या कुटुंबियांच्यासहकाऱ्यांच्याकार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi