Saturday, 18 May 2024

 ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४१,८९७ तर कंट्रोल युनिट (सीयु) २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत भ्रमणध्वनी यंत्रणा (मोबाईल) नेण्यास निर्बंध आहे.

            85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी तेराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

            निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 15 मे पर्यंत 50,970 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे.  परवाने रद्द करून 1,136 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,976 इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,27,837 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  राज्यामध्ये 1 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 74.35 कोटी रोख रक्कम तर 48.36 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 185.55 कोटी रुपयेड्रग्ज 264.69 कोटीफ्रिबीज .४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०५.५३ कोटी रुपये अशा एकूण ६७८.९७ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४८,४९० तक्रारी निकाली

               16 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ६३८५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ६३७८ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४९,५४३ तक्रारीपैकी ४८,४९० निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

            चौथ्या टप्प्यातील नाशिक विभागातील 05 आणि पुणे विभागातील 03 व औेरंगाबाद विभागातील 03 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि.13.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

पुरूष मतदार

मतदान केलेले पुरूष मतदार

महिला मतदार

मतदान केलेल्या महिला मतदार

तृतीयपंथी मतदार

मतदान केलेले तृतीयपंथी मतदार

एकूण मतदार टक्केवारी

1

01 नंदुरबार

9,92,971

7,23,097

(72.82%)

9,77,329

6,69,528

(68.51%)

27

10

(37.04%)

70.68%

2

03 जळगाव

10,37,350

6,28,123

(60.55%)

9,56,611

5,37,827

(56.22%)

85

18

(21.18%)

58.47%

 

3

04 रावेर

9,41,732

6,21,983

(66.05%)

8,79,964

5,48,950

(62.38%)

54

11

(20.37%)

 64.28%

4

18 जालना

10,34,106

7,35,880

(71.16%)

9,33,416

6,25,335

(66.99%)

52

11

(21.15%)

69.18%

 

5

19 औरंगाबाद

10,77,809

7,09,131

(65.79%)

9,81,773

5,89,055

(60.00%)

128

41

(32.03%)

63.03%

 

6

33 मावळ

13,49,184

7,77,742

(57.65%)

12,35,661

6,40,651

(51.85%)

173

46

(26.59%)

54.87%

 

7

34 पुणे

10,57,877

5,84,511

(55.25%)

10,03,075

5,19,078

(51.75%)

324

89

(27.47%)

53.54%

 

8

36 शिरूर

13,36,820

7,73,969

(57.90%)

12,02,679

6,01,591

(50.02%)

203

33

(16.26%)

54.16%

 

9

37 अहमदनगर

10,32,946

7,21,327

(69.83%)

9,48,801

5,98,790

(63.11%)

119

51

(42.86%)

66.61%

 

10

38 शिर्डी

8,64,573

5,80,236

(67.11%)

8,12,684

4,77,028

(58.70%)

78

34

(43.58%)

63.03%

 

11

39 बीड

11,34,284

8,31,245

(73.29%)

10,08,234

6,88,270

(68.27%)

29

08

(35.51%)

70.92%

 

 

चौथ्या टप्प्यातील 11 मतदार संघामध्ये एकूण 62.21 टक्के मतदान झालेले आहे.

पाचव्या टप्प्यात 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पुर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण-मध्य व 31 मुंबई दक्षिण अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

मतदार संघाचे नाव

मतदान केंद्रे

क्रिटीकल मतदान केंद्रे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या

बॅलेट युनिट (बीयु)

कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1

02 धुळे

1,969

14

18

3,938

1,969

1,969

2

20 दिंडोरी

1,922

04

10

1,922

1,922

1,922

3

21 नाशिक

1,910

06

31

3,820

1,910

1,910

4

22 पालघर

2,270

05

10

2,270

2,270

2,270

5

23 भिवंडी


मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

 

            मुंबई दि. १७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही माहिती अथवा सूचना असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षात ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.


मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने 18 ते 20 मे 2024 पर्यंत बंद राहणार

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची

दुकाने 18 ते 20 मे 2024 पर्यंत बंद राहणार

-निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव

 

            मुंबई दि. 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे  रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत.

            मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे6 लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त

            मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे, असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊनवाईन शॉपपरमिट रुमदेशी दारूचे गोडाऊनदेशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक

             मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असूनत्या पथकांच्याकडून अवैध मद्यविक्रीअवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सत्यवान गवस तथा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.

000

Friday, 17 May 2024

मतदानाची टक्केवारी अंतिम करण्याची प्रक्रिया पारदर्शक

 मतदानाची टक्केवारी अंतिम

करण्याची प्रक्रिया पारदर्शक


     


            भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोर (Google Play Store) व ॲपल स्टोर (Apple Store) वर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध आहे आणि कोणीही डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करु शकतो. यावर मतदानाच्या दिवशी सकाळी 9 नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. मतदानाची प्रत्यक्ष टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर राज्य, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ यातील अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. हे ॲप डाऊनलोड करुन वापरण्याची लिंक सोबत जोडली आहे.


https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.eci.pollturnout&hl=en_IN


https://apps.apple.com/in/app/voter-turnout-app/id1536366882


            दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजताची अंदाजित टक्केवारी बघता येते. काही मतदान केंद्रावर संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत म्हणजे मतदानाची वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान चालू राहते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालू असण्याची उदाहरणे आहेत.


            मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येवून मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना मुख्यालयी पोहोचण्यास उशीर होतो किंवा कधी कधी पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे देखिल उशिर होवू शकतो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तामध्ये विधानसभा मुख्यालयात पोहोचल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षितरित्या क्रमवार एकत्र लावून लोकसभा मतदार संघाच्या मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालयामध्ये येण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि व्हिडिओच्या निगराणीमध्ये सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना सूचित केल्यानंतरच मतदान यंत्राचा प्रवास चालू होतो. अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपार होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी Encore ह्या भारत निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरद्वारे वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर जाहीर करतात. ही जाहीर करण्यात आलेली टक्केवारी “Close of Poll” म्हणजे मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते.


केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरुन खात्री करुन जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून भारत निवडणूक आयोगाच्या Encore या सॉफ्टवेअरवर भरण्यात येते आणि तीच टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसिध्द करण्यात येते. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होवून मतदानाची अंतिम टक्केवारी वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर प्रसारित होते. त्याला “end of poll” अंदाजित टक्केवारी म्हणतात. यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.


            वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व मतदान केंद्रावरील माहिती एकत्र होऊन मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. ही सर्व टक्केवारी अंदाजित असते. याचे कारण उघड आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सूपुर्द केलेली असते. प्रत्येक मतदान केंद्रावरील ही संख्या आणि टक्केवारी हा संपूर्ण आकडेवारीचा मूळ आधार असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 98,000 च्या आसपास होती. यावरुन ही आकडेवारी तयार करण्याचे काम किती मोठे आहे याची कल्पना करता येते.


            एखादया राजकीय पक्षाने नियुक्ती केलेल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी निश्चितपणे जुळेल. तरी देखिल वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) मध्ये अंतिम टक्केवारीला Approximate असेच म्हटले आहे. त्याचे कारण असे की ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये पोस्टल बॅलेट (डाक मतपत्रिका) द्वारे झालेल्या मतदानाची संख्या समाविष्ट केली जाते. त्यामुळे मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात मतमोजणीच्या दिवशी किंचीतशी वाढ दिसून येते. वोटर टर्नआऊट ॲप (Voter Turnout App) वर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील मतदानाची टक्केवारी असते. त्यामध्ये Election Duty Certificate (EDC) मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाची संख्या समाविष्ट असते. त्याबाबतची नोंद संबंधित केंद्राध्यक्षांने डायरीत घेवून त्याची माहिती मतदान केंद्रातील प्रतिनिधींना दिलेली असते.


            ही सर्व रचना लक्षात घेतल्यास या रचनेमध्ये बारकाईने विचार करुन त्याचे काटेकोर असे कार्यवाहीचे टप्पे भारत निवडणूक आयोगाने गेल्या लोकसभा निवडणूकीपासूनच निश्चित केलेले आहेत. ही पध्दत आता चांगली प्रस्थापित झालेली असून पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण आहे.


मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज अथवा अफवा पसरु शकते आणि उपयुक्त तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या सगळयांच्या हाती असूनही तिचा सुयोग्य उपयोग होत नाही, अशी परिस्थिती होऊ शकते.


डॉ.किरण कुलकर्णी,


अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,


महाराष्ट्र राज्य.

Featured post

Lakshvedhi