मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष कार्यान्वित
-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
मुंबई दि. १७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही माहिती अथवा सूचना असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षात ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment