Tuesday, 14 May 2024

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात

ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

            मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान करून आनंद व्यक्त केला असल्याचे समन्वय अधिकारी श्री. वानखेडे  यांनी सांगितले.

            १७० – घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती, तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली आहे.

            १५७ – भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार आहेत. त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानविलकर यांनी दिली.

            १७१ – मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृह मतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले असूनउर्वरित मतदारांचे मतदान होणार असल्याची माहिती, तहसीलदार सतिश कदम यांनी दिली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे आजीने केले मतदान

            आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल असेच वाटत होते. मात्रनिवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाहीमतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई आजीने यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावे असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

 मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूकीसाठी

नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा

            मुंबईदि. १३  : मुंबई शहर जिल्ह्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य ३१-मुंबई दक्षिण व लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांच्यासाठी १४ मे ते १६ मे२०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे.   

            तसेचनिवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी १७ मे ते १९ मे२०२४ या कालावधीत अतिरिक्त सुविधा केंद्रावर टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

            ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या अधिनस्त येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील ज्यामध्ये पोलीस व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहेअशा मतदारांना १४१५ व १६ मे२०२४ रोजी मतदानासाठी चेंबूर एज्युकेशन सोसायटीप्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळासंगणक कक्षाशेजारीरूम नंबर १ व‌ २आर. सी. मार्गमातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहचेंबूर नाकामुंबई येथे दोन टपाली मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी स्तरीय मतदान सुविधा केंद्र याच ठिकाणी १७१८ व १९ मे२०२४ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

            ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांच्यासाठी अधीक्षकराज्य उत्पादन शुल्कदुसरा मजलाजुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे मतदान केंद्र १४ मे, ते १६ मे२०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

            ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांना १७ मे, ते १९ मे२०२४ या कालावधीत अधीक्षकराज्य उत्पादन शुल्कदुसरा मजलाजुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त सुविधा केंद्रात टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. या संपूर्ण टपाली मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण केले जाणार आहे.        

            भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.

            निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हे टपाली मतदान केंद्रास भेट देऊ शकतात. तसेच त्यांनी आपले मतदान प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित ठेवण्याचे आवाहन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.             

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 १०४ वर्षांच्या आज्जींनी

बजावला गृह मतदानाचा हक्क

            मुंबई दि. 13 :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या श्रीमती लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज गृहमतदानाचा हक्क बजावला. अत्यंत जबाबदारीने या आजीबाईंनी त्यांचे कर्तव्य पार पाडून इतर मतदारांकरिता आदर्श निर्माण केला आहे. गृहमतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान पूर्णतः अडचणमुक्त आणि सुरळीत झाले आहे. 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाकरिता एकूण 68 नोंदणीकृत पात्र मतदार आहेत. यापैकी एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 26- मुंबई उत्तर मतदारसंघात समाविष्ट विधानसभेच्या 153-दहिसर मतदारसंघात गृहमतदानासाठी 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील आज जे मतदार मतदान करू शकले नाहीतते 16 मे 2024 रोजी मतदान करू शकणार आहेत.

            लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या महत्वपूर्ण उपक्रमानुसार१५३ दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये ८५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी  व दिव्यांगांसाठी घरगुती मतदान यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र मतदाराला गतिशीलतेच्या समस्या किंवा वयाबाबतच्या आव्हानांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना पार करून त्यांच्या लोकशाही अधिकाराचा वापर करता येईल हे निश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे.

            लोकसंख्येच्या महत्त्वपूर्ण भागासाठी निवडणुकीतील सहभाग अधिक सुलभसर्वसमावेशक आणि न्याय बनणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासन, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशीसहायक मतदार नोंदणी अधिकारी अतुल सावेदहिसरचे नायब तहसीलदार बालाजी फोले यांनी ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन केले.

            मतदार आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे आणि वेळेप्रमाणे प्रशासनाने नियोजन करुन ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडली. क्षेत्रीय अधिकारी दिनेश सावंतमतदान अधिकारी सुभाष डुबेसहायक मतदान अधिकारी आनंद कोळेकर यांच्यासह गिरीश खानविलकर आणि केतन गुजर यांनी प्रत्यक्षपणे संबंधित मतदारांच्या घरी जाऊन ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.  

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल मतदार चिठ्ठी

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेल मतदार चिठ्ठी

            मुंबई दि. 13 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 27- मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. 19 मे 2024 पूर्वी सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात येईलअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी दिली.

            लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत मतदान होणार आहे. 27- मुंबई उत्तर- पश्चिम मतदारसंघात विधानसभेचे 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वीप’ समितीच्या माध्यमातून जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबरोबरच प्रत्येक मतदाराला त्याचे मतदार यादीतील भागअनुक्रमांकमतदान केंद्राचे नाव आणि ठिकाण याविषयीची माहिती व्हावी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी (Voter Slips) पोहोचविण्यात येत आहेत.

            विधानसभेच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात 1 लाख 8 हजार 201, दिंडोशी मतदारसंघात 1 लाख 93 हजार 796, गोरेगाव मतदारसंघात 1 लाख 24 हजार 277, अंधेरी पश्चिम मतदारसंघात 1 लाख 37 हजार 227 त्याबरोबरच अंधेरी पूर्ववर्सोवा मतदारसंघात जवळपास प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचलेली असेल. तसेच मतदानाच्या दिवशी बीएलओ मतदारांच्या सहकार्यासाठी मतदान केंद्रांजवळ थांबतील. ते तेथे मतदारांना मार्गदर्शन करतीलअसेही श्रीमती सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.

वडाळा विधानसभा मतदारसंघात १०० वर्षाच्या पार्वती शेषानंद यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 वडाळा विधानसभा मतदारसंघात १०० वर्षाच्या

पार्वती शेषानंद यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

      मुंबईदि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील १८०- वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या श्रीमती पार्वती शेषानंद यांनी  गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी गृह टपाली मतदान प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष पाहणी करुन सर्वसाधारण निरीक्षक जी. एस.प्रियदर्शी यांनी समाधान व्यक्त केले.

            मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार असे १२४ मतदारांच्या घरोघरी जावून मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या गृह टपाली मतदान प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.

0000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात

ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

            मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात एकूण १८२ ज्येष्ठ आणि ८ दिव्यांग मतदार गृहमतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. आजपर्यंत १५० मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. १५ तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघात २८ ज्येष्ठ मतदार आणि तीन दिव्यांग मतदार होते. त्यापैकी एक व्यक्ती मृत झाल्याने ३० मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त पथकाने घरोघरी जाऊन आस्थेने त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असल्याचे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गिता गायकवाड यांनी सांगितले. मतदारांनी एका मतासाठी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी घरी आल्याचे समाधान आणि मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

            १६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५८ ज्येष्ठ नागरिक तर एक दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ५० ज्येष्ठ नागरिक आणि एक दिव्यांग असे एकूण ५१ मतदारांनी गृहमतदान करून आनंद व्यक्त केला असल्याचे समन्वय अधिकारी श्री. वानखेडे  यांनी सांगितले.

            १७० – घाटकोपर पूर्व येथे २८ पैकी २७ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती, तहसीलदार वृषाली पाटील यांनी दिली आहे.

            १५७ – भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३७ मतदार गृहमतदान करणार आहेत. त्यापैकी ३५ जणांनी गृहमतदान केले असल्याची माहिती एस.ए.खानविलकर यांनी दिली.

            १७१ – मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९ मतदार गृह मतदान पद्धतीने मतदान करणार आहेत. यापैकी सात जणांनी मतदान केले असूनउर्वरित मतदारांचे मतदान होणार असल्याची माहिती, तहसीलदार सतिश कदम यांनी दिली.

विक्रोळीमधील १०० वर्षीय काशिबाई कुपटे आजीने केले मतदान

            आजपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आता प्रकृती खालावल्याने कुठेही जाऊ शकत नाही. यावेळी आपले मतदान वाया जाईल असेच वाटत होते. मात्रनिवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन गुप्त पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मत वाया गेले नाहीमतदानाचा हक्क बजावता आला याचा आनंद काशिबाई आजीने यावेळी व्यक्त केला. तरूणांनीही मतदान नक्की करावे असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

०००

Featured post

Lakshvedhi