Sunday, 28 April 2024

आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील चर्चासत्र संपन्न कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल रमेश बैस

             आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताविषयावरील चर्चासत्र संपन्न

कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा : राज्यपाल  रमेश बैस

 

            मुंबईदि. २८ : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार  यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत.  विशेषतः विविध प्रकारचे कर्करोगहृदयविकारत्वचा रोगदंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत.  मात्र या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजेअसे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  

            नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या 'आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताया विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते.

            गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरणबधिरीकरणमेडिकल इमेजिंगप्रतिजैविकेअवयव प्रत्यारोपणस्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

            डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावेअसे राज्यपालांनी सांगितले.  कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली  जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

            राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व  डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले.  अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल  तलवारडॉ. पी. व्ही. देसाईडॉ. बी. एस. सिंघलडॉ. सरोज गोपालडॉ. अशोक गुप्ता, डॉ. देवेन तनेजाडॉ. नादीर भरुचाडॉ. सुनील पंड्याडॉ. सतीश खाडिलकर, डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले. 

            चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. शिव कुमार सरीननियोजित अध्यक्ष डॉ. दिगंबर बेहराचर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश खाडिलकरसहाध्यक्ष             डॉ. अशोक गुप्ताबॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. राजकुमार पाटील,  हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अनिल शर्मातसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.

000

 

 

 

 

Maharashtra Governor inaugurates Conference on AI in Healthcare

 

            Mumbai, 28 - Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a Mid Term Annual Conference on Artificial Intelligence in Health Services and Medical Education at Bombay Hospital in Mumbai on Sun (28 April).

            The Conference was organised by the National Academy of Medical Science and Bombay Hospital Institute of Medical Sciences.

            Describing Artificial Intelligence as revolutionary technology that is set to alter the perspective of healthcare, the Governor expressed the hope that AI will help in reducing the cost of diagnosis and treatment. While appealing to the doctors and specialists to harness the power of technology, the Governor asked them to maintain good communication and personal touch with the patients.

            The Governor felicitated past Chairpersons and Fellows of NAMS on the occasion. Dr B K Goyal (posthumous), Dr L H Hiranandani (posthumous), Dr Ashok Gupta, Dr Satish Khadilkar, Dr Arun Jamkar were among those felicitated on the occasion.

            Chairman of National Academy of Medical Sciences (NAMS) Dr Shiv Kumar Sarin, Co Chairman Dr Ashok Gupta, Conference Chairman Dr Satish Khadikar, President - Elect NAMS Dr Digambar Behra, Medical Director of Bombay Hospital Trust Dr Rajkumar Patil, Head of Cardiology Dr Anil Sharma, Doctors, Specialists and delegates were present.

000

                            

आरोग्याविषयी



हे आपणास माहित आहे का? उत्तम असामान्य ज्ञान.*

 *हे आपणास माहित आहे का? उत्तम असामान्य ज्ञान.* 


(1) गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

(2) मोनालिसाच्या चित्राला *भुवया* नाहीत.

(3) "The quick brown fox jumps over the lazy dog" हया इंग्रजी वाक्यात *इंग्रजीचे सर्व अक्षर* आलेले आहेत.

(4) *जीभ* हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

(5) मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

(6) "I am." हे इंग्रजीतील *सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य* आहे.

(7) कोका कोला हे शीत पेय मूलतः *हिरव्या रंगाचे* होते.

(8) जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव *मोहम्मद*.

(9) जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा *जरासे कमी* भरते.

(10) वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी *उंटाला तीन पापण्या* असतात.

(11) "abstemious" आणि "facetious" हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात *इंग्रजीचे स्वर क्रमबध्द* आले आहेत.

(12) सर्व खण्डांची इंग्रजीतील नांवे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.

(13) अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

(14) *TYPEWRITER* हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

(15) उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.

(16) चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हस सिस्टिमवर विपरित परिणाम होतो.

(17) स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या *ब्लिंक* करतात.

(18) आपलाच *श्वास* रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

(19) ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड" तशी नोंद *गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड* मध्ये नमूद आहं.

(20) डुकराना *आकाशाकडे* पाहता येत नाही.

(21) "sixth sick sheikh's sixth sheep is sick" हे इंग्रजीतील सर्वात *उच्चारणास अवघड* वाक्य मानले जाते. 

(22) "Rhythm" हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात *लांब शब्द* आहे.

(23) आपण खूप जोरात *शिंकलो* तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

(24) *पत्त्यातील* चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत. 

- इस्पिक - राजा डेव्हिड

- किलावर - अलेक्झांडर

- बदाम - चार्लेमॅग्ने

- चौकट - जुलियस सिझर

(25) आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

(26) 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

(27) ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा *स्वार* युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

(28) गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व स्त्रीयांनी *शोधलेली साधने* आहेत.

(29) *मध* हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.

(30) मगरीला आपली *जीभ* बाहेर काढता येत नाही.

(31) *साप* तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.

(32) सर्व विषुवृत्तिय *अस्वल* डावरे असतात.

(33) विमानात द्यावयाच्या *सॅलड* मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

(34) फुलपांखरे पायांनी *चव* अनुभवतात. 

(35) *हत्ती* हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

(36) मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही *प्राणी* मानसाळला गेलेला नाही. 

(37) मृत्युपेक्षा *कोळ्याला* घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

(38) Stewardesses हा *इंग्रजी टंकयंत्रावर* डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

(39) *मुंग्या* विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

(40) विज दाहिनीचा शोध एका *दंतवैद्याने* लावला आहे.

(41) रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स *हृदय* निर्माण करते. 

(42) उंदिरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन *उंदीर* अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात. 

(43) *इअरफोन* एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.

(44) सिगारेट *लायटरचा* शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

(45) बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे *जीभ-ठसे* सुध्दा वेगवेगळे असतात.


आवडल्यास वरील माहिती जरूर शेअर करा. 🙏🏻

*कुलदैवत म्हणजे नेमकं काय ? कसे ओळखाल आपले कुलदैवत ?*

 ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

*कुलदैवत म्हणजे नेमकं काय ? कसे ओळखाल आपले कुलदैवत ?*




*काही दिवसापूर्वी मित्राची लग्नाची निमंत्रणपत्रिका आली... भावाचा फोन आला की भावा आपलं लग्न ठरल आहे, नक्की ये. दोस्ताने खूप आग्रह केला होता पण ऑफिसच्या कामामुळ जाताच आलं नाही. बिचाऱ्यान लग्नानंतर दोन दिवसांनी परत फोन केला की लग्नाला आला नाहीस आता कुलदेवतेच्या पूजेला तरी ये.....*


*त्या पूजेला गेलो. पण कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कोठे आहे ? त्याचे महत्व काय ? कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न मनात होते. तिथे हजर असलेल्या गुरुजीना सहज विचारलं तर त्यांनी सगळ पुराण उलगडून सांगितलं.....*


*“विभक्त्त कुटुंबपद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी जेष्ठ मंडळी जवळ नसतात आणि आपण फक्त एक रूढी परंपरा म्हणून या गोष्टीचे पालन करत राहतो. आणि हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात.....”*


*कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ...*

*‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हंटलय.....*


*कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.....*


*आपला कुलदैवत कोण असतात...?*

*कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदैवत’ असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घ्यावं असं म्हटल जात.....*


*प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.....*


*कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व...*

*पुराणात सांगितल आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे.....*


*त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.....*


*एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे...?*

*कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जातं. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.....*


*उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आईभवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेल आढळतं.....*


*कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे...?*

*कुलदेवी/देवता माहीती नसल्यास खालीलपैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करावी.....*


*मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश...*

*आदिमाया विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम...*

*शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती...*

*आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता...*

*गणेश, देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)*

*वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही...)*


*कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. त्यामुळेच जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे असं म्हणतात.....*


*ग्रामदैवत हेच कुलदैवत असते का...?*

*ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही.....*


*कुळ म्हणजे काय...?*

*कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.....*


*काही जणांना वाटत कुळ म्हणजे जात. तर ते चुकीच आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते. कुलदैवत सगळ्या कुटुंबाला, आपल्या घराण्याला, आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो.....*


*स्रोत:Terms Of Use Privacy Policy*

*© 2023 - BolBhidu.com. All Rights Reserved.Website Design: Enrich Media*

❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️

Saturday, 27 April 2024

A Delegation from Indonesian Election Commission Interacted with Chief Electoral Officer Got Information about Lok Sabha Elections

 A Delegation from Indonesian Election Commission

Interacted with  Chief Electoral Officer

Got Information about Lok Sabha Elections

 

 

       Mumbai, 27 : A delegation of high-level officials from the Election Commission of Indonesia  visited the office of the Chief Electoral Officer of the state in Mantralaya today.  On this occasion, they interacted with Chief Election Officer S. Chokkalingam.

      India is known as the largest democracy in the world.  The office of the State Election Officer under the Election Commission of India is conducting the Lok Sabha 2024 election process in the state in a strict and systematic manner. During the visit Chief Electoral Officer of Maharashtra State S. Chokkalingam informed the delegation about total voters in the state, facilities provided for voters, voter awareness etc. 

       On this occasion, Chief Election Commissioner of Indonesia Election Commission Idhaham Holik, Secretary Benard Der, Ma Wan Srishtono, Deputy Chief Election Officer Suryadi, Officer Robi Leo Agus, Moh Sakir Randia, Saikir, Saraha Goksi, Council General Tolh Ubadi, Vijay Tawde, Visa Officer Mohd. Akhyar,  Rajesh Padya, Joint Chief Electoral Officer of State Election Department Manohar Parkar were present on the occasion.

      Chief Electoral Officer S.  Chokkalingam on this occasion also informed about the powers and functioning of Maharashtra State Election Officer Office and elections in India.  Elections to local bodies are conducted independently through the State Election Commission. On this occasion, he provided detailed information about

State population, Lok Sabha Constituencies, total polling stations, polling phases in the State, phase wise election process, EVMs, VVPAT machines, ballot units, law and order, political parties and Code of Conduct, initiatives taken for voter enhancement, check posts set up in the State and   various apps and portals developed by the Commission using modern technology in the election process.

 

0000

 


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 28 - मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

28 - मुंबई उत्तर पूर्व

उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

                                                                        -केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

         मुंबई उपनगरदि. 27 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावीअसे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव  यांनी दिले.   मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात आज सकाळी खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकरनिवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी सीताराम काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 157 - भांडुप पश्चिम , 169 - घाटकोपर पश्चिम , 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

            निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत निरीक्षक डॉ. यादव म्हणाले की,  मुंबई उत्तर पूर्व अंतर्गत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या खर्चाच्या बँक खात्यावर देखरेख ठेवणेसंवेदनशील क्षेत्रात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेतही भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने सतर्क रहावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत  नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.    कक्षतक्रार कक्षआचारसंहिता कक्षपोलीस कक्ष सर्वांनी एकत्रितरित्या कार्य काम करूनउत्कृष्ट पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आचार संहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे.

सिव्हिजील ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा

                                                                         - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

सी - व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार तक्रारींबाबत 93 लाखांची जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदेबृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीबँकेचे समन्वय अधिकारीअमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारीभरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

                                                                        

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे 62.71 टक्के मतदान

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात

अंदाजे 62.71 टक्के मतदान

       

        मुंबईदि. 27 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल  मतदान पार पडले. सकाळी 7 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 62.71 टक्के मतदान झाले आहे.

        दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :  

वर्धा – 64.85 टक्के

अकोला – 61.79 टक्के

अमरावती – 63.67 टक्के

बुलढाणा -  62.03 टक्के

हिंगोली -  63.54 टक्के

नांदेड -  60.94 टक्के

परभणी – 62.26 टक्के

यवतमाळ - वाशिम – 62.87 टक्के.

 

00000 

दि. 27 एप्रिल2024


Featured post

Lakshvedhi