Saturday, 27 April 2024

बोरिवली मध्ये दिव्यांगांना मिळाली सुविधा ॲप आणि मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती

 बोरिवली मध्ये दिव्यांगांना मिळाली सुविधा ॲप आणि मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती

 

            मुंबई उपनगरदिनांक २७152 बोरीवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 प्रवेश योग्य आणि सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम ॲप तसेच मतदान केंद्रावर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इतर सोयीसुविधांची माहिती देण्यात आली.

या मेळाव्याला उपस्थित दिव्यांग मतदारांना सहायक निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा करमरकर यांनी मार्गदर्शन केले.    या मेळाव्यास अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी इरेश चप्पलवार,  स्वीप नोडल अधिकारी रविंद्र बोदडेदिव्यांग सहाय्यता कक्षाचे किरण साबळे,  दिव्यांग समन्वय अधिकारी कृतिका गंधारे उपस्थित होते. 

            मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी लोकसभेच्या चारही मतदारसंघातील दिव्यांगांचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांच्या यांच्या मार्गदर्शननाखाली मेळावा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोरिवली येथे दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या मार्गावर दिव्यांगांसाठी दिशादर्शक असणार आहेत. 

            ज्या मतदारांना व्हील चेअरची सुविधा हवी आहेतसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना घरापासून ते मतदान केद्रांपर्यंत वाहनाची सुविधा तसेच सहायकाची गरज असेल अशा मतदारांनी पूर्व सूचना देणे गरजेचे आहे. त्यासाठी सक्षम ॲपवर ऑनलाईन पद्धतीनेही पूर्वसूचना स्वीकारण्यात येत आहेत. याची माहितीही यावेळी श्रीमती करमरकर यांनी दिली. 

000

 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी रविंदर सिंधू खर्च निरीक्षक

 दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी रविंदर सिंधू खर्च निरीक्षक

 

             मुंबईदि.२७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  संजय यादव यांनी दिली आहे.

              निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक २०८ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८९३७४५ आणि इमेल आयडी exp30mumbai@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संदीपान मते असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५११६२१ हा आहे. 

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांना सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई  येथे  दुपारी १२ ते १२.३० वा. उमेदवारांना भेटण्याची वेळ  तर नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे.

0000

 

             मुंबईदि.२७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून रविंदर सिंधू (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी  संजय यादव यांनी दिली आहे.

              निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथील कक्ष क्रमांक २०८ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८९३७४५ आणि इमेल आयडी exp30mumbai@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी संदीपान मते असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५११६२१ हा आहे. 

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.सिंधू यांना सह्याद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई  येथे  दुपारी १२ ते १२.३० वा. उमेदवारांना भेटण्याची वेळ  तर नागरिकांनी भेटण्याची वेळ  सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे.

0000

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल हे 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल

 निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल

हे 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल

             ठाणे, दि. 27 (जिमाका) : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्री. नकुल अग्रवाल (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. नकुल अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील 2011 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक श्री.नकुल अग्रवाल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे  क्रिडासंकुल, पेंढारकर  कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण  येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमक खालीलप्रमाणे आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस)यांचा संपर्क क्रमांक 8369751654 असा असून Expobs24kalyan@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी हे 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल

 निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी

हे 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल

            ठाणे, दि. 27 (जिमाका) : 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी श्री. चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. चित्तरंजन धंगडा माझी हे भारतीय महसूल सेवेतील 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

23-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उप विभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. चित्तरंजन धंगडा माझी (आयआरएस) यांचा संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून 23.bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

0000

 

सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करावे- केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक

 सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून

लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करावे- केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक

ठाणे,दि.27 (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 23 भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, 24 कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री.राहील गुप्ता उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) डॉ. धोंडोपंत स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी 23-भिवंडी संजय जाधव, 24-कल्याण सुषमा सातपुते, 25-ठाणे मनिषा जायभाये, नोडल अधिकारी कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता विजयसिंह देशमुख तसेच आयकर विभाग,  पोलीस विभाग- ठाणे नवी मुंबई, मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय, केंद्रीय वस्तू व सेवाकर, महसूल, गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, राज्य उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर, राज्य परिवहन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक ठाणे, खर्च संनियंत्रण समिती 23-भिवंडी, 24-कल्याण, 25-ठाणे आदी सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व  विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक 2024 या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. तसेच मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  मतदानाचे शेवटचे चार दिवस हे  अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले.

137 भिवंडी, 146 ओवळा, 150 ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी केले. सूत्रसंचलन मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 28 - मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

28 - मुंबई उत्तर पूर्व

उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी

                                                                        -केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

         मुंबई उपनगरदि. 27 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावीअसे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव  यांनी दिले.   मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात आज सकाळी खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

            या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकरनिवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी सीताराम काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 157 - भांडुप पश्चिम , 169 - घाटकोपर पश्चिम , 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

            निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी - कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत निरीक्षक डॉ. यादव म्हणाले की,  मुंबई उत्तर पूर्व अंतर्गत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या खर्चाच्या बँक खात्यावर देखरेख ठेवणेसंवेदनशील क्षेत्रात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेतही भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने सतर्क रहावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत  नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.    कक्षतक्रार कक्षआचारसंहिता कक्षपोलीस कक्ष सर्वांनी एकत्रितरित्या कार्य काम करूनउत्कृष्ट पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आचार संहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे.

सिव्हिजील ॲपवरील प्राप्त तक्रारींचा 100 टक्के निपटारा

                                                                         - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

सी - व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार तक्रारींबाबत 93 लाखांची जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदेबृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीबँकेचे समन्वय अधिकारीअमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारीभरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची घेतली माहिती

 इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला   

                         मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

 

                     लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची घेतली माहिती

 

          मुंबईदि.२७ : इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. 

       जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणेनियोजनबद्धरित्या पार पाडत आहे.  राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला  दिली.

       यावेळी इंडोनेशिया निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त इधाहम होलिक, सचिव बेनार्ड डेरमा वन सृष्टोनोउपमुख्य निवडणूक अधिकारी सुर्यदीअधिकारी रोबि लिओ अगुसमोह सकिर रंदिया, सायकीरसरहा गोकसीकौन्सिल जनरल तोल्ह उबादी, विजय तावडे, व्हिसा अधिकारी मोहमद  अख्यारराजेश पाड्याराज्याच्या निवडणूक विभागाचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

      मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी  भारत निवडणूक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी देखील माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात.  राज्याची लोकसंख्यालोकसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र, राज्यातील मतदानाचे टप्पे, टप्पा निहाय सुरू असलेली  निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, राज्यात उभारलेले चेक पोस्ट, आधुनिक तंत्रज्ञानचा निवडणूक प्रक्रियेतील उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली. 

                                                            0000

 

Featured post

Lakshvedhi