Tuesday, 23 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात मुंबई, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, बारामती 38, धाराशीव (उस्मानाबाद) 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23, हातकणंगले 27 अशी आहे. ००००

 

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार रिंगणात

 

मुंबईदि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, बारामती 38, धाराशीव (उस्मानाबाद) 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23, हातकणंगले 27 अशी आहे.

००००

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार -

 मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

            मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नाव नोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघरदेहव्यवसाय करणारेतृतीयपंथीभटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी किंवा आपल्या क्षेत्रातील मतदार दुतांची मदत घ्यावी.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतरही ओळखपत्रे वैध

            मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्डपॅन कार्डविशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्रकेंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्टबँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवानाछायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,   मनरेगा कार्डसंसद सदस्यविधानसभा सदस्यविधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

बेघरदेहव्यवसाय करणारे ओळखपत्राशिवाय नाव नोंदवू शकतात

             नव्याने नाव नोंदवू इच्छिणाऱ्या बेघरदेहव्यवसाय करणारेतृतीयपंथीभटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसेल तर त्यांनी स्व-घोषणापत्र शासनास सादर करावे. स्व-घोषणापत्राद्वारेही मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. हे स्व-घोषणापत्र भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx  या लिंकवर उपलब्ध आहे.


‘दिलखुलास’मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ यावर मुलाखत

 ‘दिलखुलास’मध्ये वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची

‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ यावर मुलाखत

 

            मुंबईदि. २२ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी वर्धा जिल्हा प्रशासन सज्जयाविषयी  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात गुरुवार २५ एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे -राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            वर्धा जिल्ह्यात असलेले लोकसभा मतदार संघआदर्श आचारसंहिता अंमलबजावणीनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजनसर्व घटकातील मतदारांसाठी वर्धा जिल्ह्यात करण्यात आलेल्या सोयी सुविधा याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली आहे.

००००

 


बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे रोजी आवश्य मतदान करा कुर्लाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

 बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे रोजी आवश्य मतदान करा

कुर्लाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

 

            मुंबई उपनगरदि. 22 : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जावून अवश्य मतदान करा!! अशी उद्घोषणा देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गावी जाण्याची लगबग आणि त्यात १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कुर्ला- नेहरूनगर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार बस स्थानकावरील ही उदघोषणा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती.

            बस स्थानकावर साधारण दहा हजाराच्या आसपास नागरिकांची वर्दळ रोजच असते. आपल्या गावी जाण्यासाठी बसची वेळमार्ग आणि बस कुठे लागली आहे. याबाबत आगारच्या सूचना केंद्रामधून सर्वसामान्य प्रवाशांना सातत्याने उदघोषणा करून मार्गदर्शन करण्यात येते. या सूचना केंद्रामधून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे सुजाण आणि जागरूक मतदार व्हालोकशाहीचे रक्षण करा’ तसेच  मतदान’ आपली जबाबदारी आपला अधिकारमजबूत लोकशाहीचा आधार’ अशा नावीन्यपूर्ण उदघोषणा देवून प्रवासी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.

            कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे  यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला नेहरूनगर आगार येथे हा उपक्रम राबविण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडेस्वीप पथक प्रमुख सागर खुटवडतसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल यांनी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या. आगार व्यवस्थापक दीपक हेतंबेआगार प्रमुख दीपक जाधव व वाहतूक नियंत्रक कडवईकर यांच्या समन्वयाने सूचना केंद्रातून ही उद्घोषणा करण्यात येत आहे. 

000


 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रयत्न दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रयत्न

दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

          मुंबई उपनगरदि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावीयासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावाअसे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदारांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि लवकरात लवकर मतदान केंद्रांवर मतदान करुन जाता येईलया दृष्टीने नियोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

          लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होईल. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी पूर्णत्वास आली आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

          जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले कीलोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 7 हजार 879 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 82 हजार 590तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 24 हजार 477 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 812 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 15 हजार 958तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 174 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यापर्यंत मतदान कर्मचारी पोहोचले असून त्यांच्याकडून पर्याय भरुन घेण्यात आले आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे.

          उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिल 2024 पासून सुरवात होईल. 3 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 मे 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 6 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 मे 2024 रोजी मतदान होईलतर 4 जून 2024 रोजी नेस्कोगोरेगाव व उदयांचल शाळागोदरेज संकुलविक्रोळी येथे मतमोजणी होईल. याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय  आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी एका केंद्रांचे संपूर्ण संचलन महिला कर्मचारीएका मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन तरुण अधिकारी आणि तिसऱ्या मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन दिव्यांग कर्मचारी करतील. मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मंगळवार 23 एप्रिल 2024 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

तर मतदारांच्या सोयीसाठी विशेष कलर कोड

          पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र ज्या ठिकाणी असतील तिथे मतदारांच्या सोयीसाठी रंगसंगतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्र मतदारांसाठी सुलभ होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर पाणीवीजसावलीची सुविधा असेल. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी बेस्टसह प्रवासी वाहतुकदारांशी समन्वय साधला जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या मार्गावर ही वाहने मोफत चालविली जातील.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु

          मुंबई उपनगर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. फिरते पथकबैठे पथकव्हीडिओ व्हीजिलिंग पथकव्हीडिओ व्ह्यूइंग पथकखर्च सनियंत्रण पथकासह विविध 550 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारीनिवडणूक अधिकारीजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावर एक खिडकी कक्ष विविध परवानग्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. सी- व्हीजिल ॲपवर 188 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ग्रीव्हन्स ॲपवर 2251 तक्रारीविचारणा करण्यात आली होती. या सर्वांचेही निराकरण करण्यात आले आहेअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

0000


 

*रामधान्य*

 *रामधान्य*


आता रामाचे आवडते धान्य कुठले ?,

याचं उत्तर दडलंय एका भांडणात.


चला तर मग बघुया काय आहे हे भांडण.


भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. 


राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, "या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे." 


हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली. "म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ. आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते.""मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ." 


हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. "मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते."


शब्दाने शब्द वाढत जातो. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडते. राम म्हणतात की "मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे." 


राम अयोध्येला निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते. ६ महिन्यांनी जेव्हा राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात. तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते. नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते. 


हे बघून प्रभुराम म्हणतात. "तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली." म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात. 


या प्रसंगानंतर *राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे ती रागी* असं नवीन नाव नाचणीला मिळालं.


मित्रांनो तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या 'रामधान्यचरित्र' या काव्यात सांगितलेली आहे. 


माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंग रूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून केली पाहिजे.

हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळते....

🙏

Monday, 22 April 2024

Science doesn't wait for miracles,

 Glasses for blind babies. Science doesn't wait for miracles, it does miracles. Every viewer gets excited by enjoying these innocent babies! A big thanks to those scientists who made it possible. LET’S KEEP OUR WORLD 🌍 A HAPPY PLACE TO LIVE IN 😊


Featured post

Lakshvedhi