Tuesday, 23 April 2024

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

 मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

 

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयवांद्रे (पूर्व)मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली.

            लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरीष्ठ सहाय्यक संचालक तथा दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी केशव करंदीकर हे मुख्य समन्वयक आहेत.

            यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भेट देवून माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. मुख्य समन्वयक श्री. करंदीकर यांनी माध्यम कक्षाचे कामकाजमाध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे कामकाज याविषयीची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी टीव्ही मॉनिटरिंगसोशल मीडिया मॉनिटरिंग आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली. माध्यम कक्षाचे चाललेले कामकाजप्रशासन आणि प्रसारमाध्यमे यामध्ये दुवा म्हणून माध्यम कक्षाकडून मिळणारी माहिती सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींनी दिली.

०००


साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24x7 काम सुरु निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

 

साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24x7 काम सुरु

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात साडेपाचशेहून अधिक पथके अहोरात्र 24x7 असे काम करीत आहेत. लोकसभेच्या चारही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावीयासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी त्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की, 26 एप्रिलपासून निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. रविवारदुसरा आणि चौथा शनिवार आणि एक मे या सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत 3 मेपर्यंत असून 4 मे रोजी अर्जाची छाननी होईल. दिनांक 6 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 मे रोजी मतदान आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरु  इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत भरावयाची माहितीत्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती करुन घ्यावी. याबाबत काहीही शंका असल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसेही श्री. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

            पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी होणार नाहीयासाठी मतदान केंद्रस्तरीय आराखडा तयार करण्यात आला आहे. कमीत कमी वेळात मतदार मतदान करुन मतदान केंद्राच्या बाहेर पडेलअसे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी तेथील विविध मतदार केंद्रांना कलर कोड देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याशिवायत्यासाठी मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदारदूत यांची नेमणूक केली जाणार आहे.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार

            निवडणूक कालावधीत आदर्श  आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये व्हीडिओ सनियंत्रण पथकस्थिर सनियंत्रण पथकव्हीडिओ व्हिविंग पथकभरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा  मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी साडेपाचशेहून अधिक पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 24x7 आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी दक्ष आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका निष्पक्ष आणि शांततेच्या वातावरणात होतील यादृष्टीने जिल्हा निवडणूक यंत्रणेने पावले उचलली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न

            जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य सरासरी इतके मतदान व्हावे यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. याशिवायमतदानाच्या दिवशी मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करुन परत जाता यावेयासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणीजेथे शक्य असेल तेथे बैठक सुविधामतदान केंद्रांवर दिशादर्शक असणार आहेत.


 

येत्या दोन दिवसात निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येणार

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी 6 खर्च निरीक्षक, 4 जनरल निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था यासाठीचे 2 निरीक्षक भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत. येत्या 2-3 दिवसात खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन निवडणूक प्रक्रिया आणि खर्चाचा आढावा घेतील. 

000

 

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

 सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

 

            मुंबई उपनगरदि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.

            आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणेया तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला.

            जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावेअसे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप

            अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम -11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड -16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

००००


 


लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे

 लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी

राजकीय पक्षांनी सहकार्य करावे


- निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे


            मुंबई, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.


            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.


            या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.


****

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार - एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी

 मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

            मुंबई, दि. २२ : मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नाव नोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघरदेहव्यवसाय करणारेतृतीयपंथीभटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी किंवा आपल्या क्षेत्रातील मतदार दुतांची मदत घ्यावी.

व्होटर आयडी व्यतिरिक्त इतरही ओळखपत्रे वैध

            मतदारांनी मतदानाच्या दिवशी म्हणजे २० मे रोजी आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळख पत्र सोबत आणावे. ते नसल्यास आधार कार्डपॅन कार्डविशिष्ठ दिव्यांगांचे ओळखपत्रकेंद्र सरकार/राज्य सरकार/  सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र,  पासपोर्टबँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबूक,  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत  भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड,  वाहन चालक परवानाछायाचित्र असलेले निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे,  श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,   मनरेगा कार्डसंसद सदस्यविधानसभा सदस्यविधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र मतदाना दिवशी ओळख पटविण्यासाठी वापरता येणार आहे.

बेघरदेहव्यवसाय करणारे ओळखपत्राशिवाय नाव नोंदवू शकतात

             नव्याने नाव नोंदवू इच्छिणाऱ्या बेघरदेहव्यवसाय करणारेतृतीयपंथीभटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसेल तर त्यांनी स्व-घोषणापत्र शासनास सादर करावे. स्व-घोषणापत्राद्वारेही मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. हे स्व-घोषणापत्र भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Default.aspx  या लिंकवर उपलब्ध आहे.


बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे रोजी आवश्य मतदान करा कुर्लाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

 बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे रोजी आवश्य मतदान करा

कुर्लाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम

 

            मुंबई उपनगरदि. 22 : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कुर्ला- नेहरूनगर आगार येथे सूचना केंद्रातून बस स्थानकावरील सर्व प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! 20 मे 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जावून अवश्य मतदान करा!! अशी उद्घोषणा देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गावी जाण्याची लगबग आणि त्यात १७४ कुर्ला (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ कुर्ला- नेहरूनगर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगार बस स्थानकावरील ही उदघोषणा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती.

            बस स्थानकावर साधारण दहा हजाराच्या आसपास नागरिकांची वर्दळ रोजच असते. आपल्या गावी जाण्यासाठी बसची वेळमार्ग आणि बस कुठे लागली आहे. याबाबत आगारच्या सूचना केंद्रामधून सर्वसामान्य प्रवाशांना सातत्याने उदघोषणा करून मार्गदर्शन करण्यात येते. या सूचना केंद्रामधून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी व कर्मचारी हे सुजाण आणि जागरूक मतदार व्हालोकशाहीचे रक्षण करा’ तसेच  मतदान’ आपली जबाबदारी आपला अधिकारमजबूत लोकशाहीचा आधार’ अशा नावीन्यपूर्ण उदघोषणा देवून प्रवासी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.

            कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे  यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला नेहरूनगर आगार येथे हा उपक्रम राबविण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडेस्वीप पथक प्रमुख सागर खुटवडतसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल यांनी आगार प्रमुख आणि तेथील अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या. आगार व्यवस्थापक दीपक हेतंबेआगार प्रमुख दीपक जाधव व वाहतूक नियंत्रक कडवईकर यांच्या समन्वयाने सूचना केंद्रातून ही उद्घोषणा करण्यात येत आहे. 

000


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रयत्न दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रयत्न

दिव्यांग आणि वयोवृद्धांना मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा पुरविणार

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

          मुंबई उपनगरदि. 22 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना 26 एप्रिल रोजी जारी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मतदानाची टक्केवारी ही राष्ट्रीय व राज्य सरासरीपेक्षा जास्त असावीयासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावाअसे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदारांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये आणि लवकरात लवकर मतदान केंद्रांवर मतदान करुन जाता येईलया दृष्टीने नियोजन केल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

          लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरवात होईल. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी पूर्णत्वास आली आहेअशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

          जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले कीलोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 7 हजार 879 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 82 हजार 590तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 24 हजार 477 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 812 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 15 हजार 958तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 174 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यापर्यंत मतदान कर्मचारी पोहोचले असून त्यांच्याकडून पर्याय भरुन घेण्यात आले आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे.

          उमेदवारी अर्ज भरण्यास 26 एप्रिल 2024 पासून सुरवात होईल. 3 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 मे 2024 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 6 मे 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 मे 2024 रोजी मतदान होईलतर 4 जून 2024 रोजी नेस्कोगोरेगाव व उदयांचल शाळागोदरेज संकुलविक्रोळी येथे मतमोजणी होईल. याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय  आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी एका केंद्रांचे संपूर्ण संचलन महिला कर्मचारीएका मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन तरुण अधिकारी आणि तिसऱ्या मतदान केंद्राचे संपूर्ण संचलन दिव्यांग कर्मचारी करतील. मतदान केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मंगळवार 23 एप्रिल 2024 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

तर मतदारांच्या सोयीसाठी विशेष कलर कोड

          पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र ज्या ठिकाणी असतील तिथे मतदारांच्या सोयीसाठी रंगसंगतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्र मतदारांसाठी सुलभ होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर पाणीवीजसावलीची सुविधा असेल. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी बेस्टसह प्रवासी वाहतुकदारांशी समन्वय साधला जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या मार्गावर ही वाहने मोफत चालविली जातील.

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु

          मुंबई उपनगर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या दिवसापासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. फिरते पथकबैठे पथकव्हीडिओ व्हीजिलिंग पथकव्हीडिओ व्ह्यूइंग पथकखर्च सनियंत्रण पथकासह विविध 550 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या कामाचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारीनिवडणूक अधिकारीजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावर एक खिडकी कक्ष विविध परवानग्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. सी- व्हीजिल ॲपवर 188 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ग्रीव्हन्स ॲपवर 2251 तक्रारीविचारणा करण्यात आली होती. या सर्वांचेही निराकरण करण्यात आले आहेअसेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

0000


 

Featured post

Lakshvedhi