Monday, 22 April 2024

जैसा अन्न वैसा मन

 🚩

जैसा अन्न वैसा मन



🙏🏻 अन्न का शुक्रिया करेंगे


🙏🏻पानी के बाद दूसरी शक्ति अन्न है जो हमारी वाइब्रेशन को कैच करती है और फिर जब हमारे अंदर जाति है तो हमारे शरीर के निर्माण के साथ हमारे संकल्प का भी निर्माण करती है । 


😇पुराने समय पर जब भी लोग खाना खाते थे तो एक साथ बैठकर बिना बात किए खाते थे और कहा जाता था कि खाना खाते हुए बात नही करते क्योंकि अन्न उन बातो को ग्रहण करता है और हम बिना फोन देखे बिना tv देखे खाना नही खा पाते जिसकी वजह से नेगेटिव सीन या खबरों को सुनते हुए खाना खाते हैं तो वो संस्कार सहज ही हमारे बनने लगते हैं। 


😇 आज छोटे बच्चे जब खाना खाते हैं तो मोबाइल फोन के बिना खाना नहीं खा पाते जब वह बच्चा कोई डिफरेंट या नेगेटिव एक्ट करता है तो कहते हैं कि पता नहीं कहां से सीखा है? ऐसा तो हमरे घर में कोई नही करता। 


😇ये सब फोन देखने का या खाने के समय फोन देखने का असर है इसलिए खाना जब भी खाए पॉजिटिव माहौल में ,पॉजिटिव सोच के साथ खाएं। 


😇आज स्कूल में भी खाना खाने से पहले शुक्रिया का एक गीत लगाया जाता है ताकि बच्चे को आदत हो लेकिन बच्चे स्कूल में तो ये कर लेते हैं लेकिन घर में ऐसा नहीं कर पाते क्योंकि बड़े खुद ही फोन देखते हुए बनाते खाते तो सहज ही बच्चो तक खाने में वो वाइब्रेशन मिलती है और हम कह देते हैं कि ये तो बिना फोन देखे खाना खाता ही नहीं । खुद बदलेंगे जग बदलेगा इसलिए अब खाने से पहले तयारी क्या करे ? 


उसके लिए खाना खाने से पहले संकल्प करे और अपने बच्चो को भी सिखाएं जब भी खाना खाये पेहले शुक्रिया करे। 


🪄 शुक्रिया परमपिता परमात्मा का कि मुझे यह अन्न मिला है। 


🪄 शुक्रिया उस किसान का जिसने यह अन्न मेरे लिए तैयार किया ।


🪄शुक्रिया प्रकृति का जिसने इस अन्न को मुझ तक पहुंचाने के लिए अपना पूरा सहयोग दिया।


🪄 शुक्रिया उस सब्जी वाले का जिसने यह मुझ तक पहुंचाया। 


🪄 शुक्रिया उस कमाने वाले का जिसके द्वारा यह मुझे नसीब हुआ है ।


🪄शुक्रिया उन सब आत्माओं का जिन-जिन के हाथों से होकर यह अन्न मुझ तक पहुंचा है आप सबका बहुत-बहुत शुक्रिया।

झाडांची भिशी,दर. यशवंत पेठकर यांचा अभिनव उपक्रा

 दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण *‘झाडांची भिशी’* ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्‍टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.


अशी आहे भिशी

सुरवातीला बारा डॉक्‍टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्‍ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्‍चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.


दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला. हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले. 


झाडांचा वाढदिवस

लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात. डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात, असं हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.’


*(Copy-Paste-Forward)*

तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध

 तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध

            मुंबईदि. 21 : राज्यातील लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 मतदारसंघात 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

       तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदार संघात 21,  बारामती-46, उस्मानाबाद-35लातूर-31सोलापूर-32, माढा-38, सांगली-25, सातारा-21, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-9, कोल्हापूर-27 आणि हातकणंगले मतदारसंघात-32 असे एकूण 317 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

00000

Sunday, 21 April 2024

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

 गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

            गडचिरोली… दुर्गमवनाने वेढलेलाआदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदाखनिजसंपत्तीनद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी.

            येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा-2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 72 टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले. मागील दोन्ही लोकसभा निवडणूकीत देखील हा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर होता. राज्यात इतर मतदार संघापेक्षा येथील मतदानाचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक राहीले आहे. उल्लेखनीय म्हणजे इतर ठिकाणापेक्षा या जिल्ह्यात मतदानाची वेळ तीन तासांनी कमी होतीयासोबत दुर्गम आणि वनांच्छादित भागातील वाहतुकीच्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडखोरांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या या सर्वांना न जुमानता तळपत्या उन्हात नागरिकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने मतदान केले.

            मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद दबावाला बळी न पडता मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याचा नागरिकांचा अढळ निर्धार अधोरेखित करतो. येथील भरीव मतदान हे लोकशाही प्रक्रियेवरील सामूहिक विश्वासालाही पुष्टी देते. गडचिरोलीच्या नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत निवडणूक व्यवस्थेचे पावित्र्य राखले आहे. धमक्यांना धैर्याने झुगारून आणि आपला निवडणूक हक्क सांगून त्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांप्रती आपली अतूट बांधिलकी दाखवून दिली आहे. गडचिरोलीच्या मतदारांनी दाखवलेले धैर्य आणि मतदानाप्रतिची दृढ भूमिका ही प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही टिकून राहण्याचा आणि लोकांचा आवाज भीतीने किंवा जबरदस्तीने बंद करता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते.

            निवडणूक सुरळीतपणे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील दिवस-रात्र राबले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हा निवडणूक अधिकारी श्री संजय दैने हे देखील निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बदलीने येथे आले होते. त्यातच निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी त्यांचे वडील वारले तरी देखील वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले.  त्यांचा पूर्वानुभव दांडगा असल्याने निवडणूक यंत्रणेकडून त्यांनी तत्परतेने कामे करून घेतली. निवडणूक काळात जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान अनुभवी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी लीलया पेलले. गडचिरोलीत आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या शांततापूर्ण वातावरणात निवडणुका कधीच पार पडल्या नव्हत्या. यासाठी श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16 हजार जवानांची फौज येथे जीवाची  जोखीम  पत्करून खडा पहारा देत होती. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी देखील आपल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

            देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्यात गडचिरोलीतील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देऊन निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीवरील विश्वासाचा आणि पर्यायाने लोकशाहीचा विजयच म्हणावा लागेल.

गजानन जाधव,

जिल्हा माहिती अधिकारीगडचिरोली.


मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

 मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

            मुंबई दि.२०भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे,  अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे.

            यांमध्ये सर्वसामान्य माहितीअर्जाची स्थितिगतीमतदार ओळखपत्र प्राप्त न होणेनवीन मतदार नोंदणीमतदार यादीत नाव तपासणेस्थलांतर केल्यानंतर पत्त्यातील बदलविविध दुरुस्त्यानाव वगळणीमतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडणेमतदार ओळखपत्र हरवणेमतदार ओळखपत्राशी मोबाइल क्रमांक जोडणेइत्यादी विषयांच्या अनुषंगाने माहिती विचारणारे फोन आलेले आहेत.            आलेल्या फोनमध्ये सर्वसामान्य माहिती विचारणारे फोन सर्वाधिक होते. असे १३३२ फोन आले. सर्वसामान्य माहितीमध्ये मतदारसंघाचा संपर्क क्रमांक व पत्ताऑनलाइन अर्जाबाबत माहिती विचारली गेली. त्या खालोखाल अर्जाची स्थितिगती जाणून घेण्यासाठी ५०७मतदार यादीत नाव तपासण्यासाठी ५०३मतदार ओळखपत्र प्राप्त न झाल्याबद्दल ४७०नवमतदार नोंदणीसाठी ४५४ फोन आले. उर्वरित फोन संकीर्ण माहितीसाठी विचारण्यात आले.

            महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्यातून सर्वाधिक फोन आलेत्यांची संख्या १५७५ इतकी होती. ठाणे जिल्ह्यातून ९९१मुंबई शहरातून ५२०रायगडमधून १८२ आणि पुण्यातून १६३ फोन आले.

            १८००२२१९५० या मतदार साहाय्यता क्रमांकाशिवाय महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ०२२-२२०२१९८७ आणि ०२२-२२०२६४४२ हे दोन अतिरिक्त क्रमांकही मतदारांना त्यांच्या मनातील शंका व प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे आणि समाधानकारक उत्तरे देण्यात येत आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000

अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

 अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

            मुंबईदि. २० :  अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला.

            १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन् या जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन व विमोचनाचे कार्य करीत असताना मुंबई अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहाचे उ‌द्घाटन राज्यपाल यांच्या शुभहस्ते राजभवन येथे १४ एप्रिल रोजी झाले. या सप्ताहाच्या सांगता समरोहासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालय अग्निशमन सेवा-सिव्हील डिफेन्स व होम गार्डचे महासंचालक विवेक श्रीवास्तवआयपीएस यांनी उपस्थित राहून संचलनाची मानवंदना स्विकारली. याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

            राज्याचे अग्निशमन सेवा संचालक आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांनी अग्निशमन सेवा सप्ताहाबाबत प्रस्तावना केली. राज्यातील विविध महानगरपालिकाविशेष नियोजन प्राधिकरणे तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टभाभा अॅटोमिक रिचर्स सेंटरइत्यादींच्या अग्निशमन सेवांचे प्रमुख अग्निशमन अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

            या सप्ताहामध्ये अग्निशमनाबाबत विविध प्रसार माध्यमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तसेच नियमीत अग्निशमन दलातील जवानांसाठी विविध फायर ड्रिल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यदिन-२०२३ आणि प्रजासत्ताक दिन-२०२४ या प्रसंगी ज्या अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींची अग्निशमन सेवा पदके जाहिर झाली त्यांना प्रमुख अतिर्थीच्या शुभहस्ते सन्मान चिन्हे प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.

            केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने अग्निशमन सेवांची तूट टप्प्या-टप्याने भरुन काढण्यात येत आहे. राज्यात अग्निशमन कायदा सन २००८ पासून अंमलात आला असून यामध्ये काळानुरुप काही सुधारणा करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या सुधारणांमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक इमारतीतसेच गोदामे आणि शीतगृहांच्या इमारतींची उंची वाढविणेअग्निशमन व जीवसंरक्षक लेखा परीक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहेयासारख्या सुधारणा अग्निशमन कायदयात करण्यात येणार आहेत.

000

संधी अजूनही आहे, मतदार यादी मधे नावं नोंदवण्यास ठी

 संधी अजूनही आहे !

            महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो तिथल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करुन प्रत्येकच मतदाराने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करायला हवी. आपल्याला मतदानासाठी कोणत्या ठिकाणी जावे लागेल, ते सुध्दा पाहून ठेवावे. म्हणजे मग ऐन वेळेची धावपळ होणार नाही.

दि.20 मे, 2024 रोजी मतदान होणार असलेले मतदारसंघ

१)    मतदार संघ क्र.2 - धुळे                     

२)    मतदार संघ क्र.20- दिंडोरी

३)    मतदार संघ क्र.21 - नाशिक

४)    मतदार संघ क्र.22-पालघर

५)    मतदार संघ क्र.23-भिवंडी

६)    मतदार संघ क्र.24- कल्याण

७)    मतदार संघ क्र.25-ठाणे

८)    मतदार संघ क्र. 26- मुंबई उत्तर

९)    मतदार संघ क्र.27- मुंबई उत्तर-पश्चिम

१०)  मतदार संघ क्र.28- मुंबई उत्तर- पूर्व

११)  मतदार संघ क्र.29- मुंबई उत्तर- मध्य

१२)  मतदार संघ क्र. 30- मुंबई दक्षिण- मध्य

१३)  मतदार संघ क्र.31- मुंबई दक्षिण

 

            निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्याच्या दृष्टीनेच हा साधारण 10 दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

             पाचव्या टप्प्यात निवडणुकीत या मतदारसंघासाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख 3 मे, 2024 आहे. त्यानुसार या मतदारसंघांमधील पात्र नागरिकांनी म्हणजेच मतदार नोंदणीसाठीची अर्हता दिनांक असलेल्या 1 एप्रिल, 2024 रोजीपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी 22 एप्रिल, 2024 पर्यंत केलेले अर्ज मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसाठी ग्राहय धरले जाऊ शकतील. अशावेळी सर्व पात्र नागरिकांनी उपलब्ध  कालावधीचा लाभ घेण्याकरिता मतदार यादीत आपले नाव तपासून घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव तपासताना आपले नाव त्यामध्ये नाही, हे लक्षात आल्यावर दि.22 एप्रिल, 2024 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने  अर्ज केला पाहिजे.

मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline  ॲपचा वापर करुन मतदार यादीत आपले नाव शोधा.

१)    वैयक्तिक तपशीलाच्या पर्यायाअंतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाआधारे

                               किंवा

२)     मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर त्याआधारे

                               किंवा

३)    मतदार ओळखपत्र क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक जोडला असेल तर त्याआधारे

                               किंवा

४)     Voter Helpline App  वर मतदार ओळखपत्र क्रमांकावरील किंवा क्यू आर कोडद्वारे

 

            मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या दोन पध्दती आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन - सोईप्रमाणे कोणतीही एक पध्दत वापरली तरी चालेल-

            ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline   ॲपचा वापर करुन मतदार नोंदणीचा अर्ज भरता येतो. त्यासाठी युजरनेम पासवर्ड तयार करावा लागेल आणि  त्यासाठीच्या सूचना स्क्रीनवर दिसतीलच.

            आपल्या सर्वसाधारण निवासी पत्त्यानुसार आपला विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य हा तपशील देण्यासाठी ड्रॉपडाऊन मेन्यू उपलब्ध आहे. आपले नाव, लिंग, जन्मतारीख किंवा वय, दिव्यांगत्व, मोबाईल क्रमांक आणि ईमेल (स्वत:चा  किंवा नातेवाईकांचा) यासंबंधीचे वैयक्तिक तपशील भरल्यावर आपल्या सर्वसाधारण निवासाच्या पत्त्याचे तपशिल भरा. आपले छायाचित्र तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेला पुरावा जोडा, त्यासाठी फाईल अपलोड सुविधा उपलब्ध आहे.

            अर्ज दाखल केल्यावर मिळालेला संदर्भ क्रमांक वापरुन वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घ्याथोडक्यात आपल्या अर्जाचे  तुम्ही ट्रॅकींग करु शकता.

ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आपल्या  जवळच्या मतदार नोंदणी  कार्यालयात जावे लागेलआपले छायाचित्रतसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह अर्ज  तिथे सादर करावा लागेलआपल्या मतदार संघातल्या मतदार नोंदणी कार्यालयाचा तपशील ceo Maharashtra  हया वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

मतदार नोंदणी अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    जन्माचा दाखला

२)    भारतीय पासपोर्ट

३)    पॅन कार्ड

४)    ड्रायव्हिंग लायसन्स

५)    आधार कार्ड

६)    दहावी किंवा बारावीचे निकालपत्र

 

            मतदार म्हणून नोंद करण्यासाठी 18 वर्षाच्या वरती वय असणे  आवश्यक आहे. हया निवडणुकीसाठी 1 एप्रिल, 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाची संधी मिळू शकते. म्हणजे, हया 1 एप्रिलला वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला नवमतदार मतदान करु शकतो आणि  आपल्या पहिल्या वहिल्या मतदानाचा आनंद मिळवू शकतो.  मी मतदान केले असे  अभिमानाने सांगू शकतो.

 

मतदार नोंदणी अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी  कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    भारतीय पासपोर्ट,

२)    आधारकार्ड,

३)    राष्ट्रीय,  श्येडयुल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबुक

४)    पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,

५)    नोंदणीकृत भाडे करार,

६)    नोंदणीकृत विक्री करार

*आपल्याकडे यापैकी कोणतेही दस्तऐवज नसतील तर वय किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही दस्तऐवज देता येईल.

 

 

            निवासाचा पुरावा महत्वाचा ठरतो कारण त्यावर कोणत्या मतदारसंघाच्या कोणत्या भागामध्ये मतदार म्हणून नावाची नोंदणी होणार, ते ठरते.  बेघर, देहव्यवसाय करणारे किंवा तृतीयपंथी या प्रवर्गातील अर्जदाराकडे वय किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल, तर असे अर्जदार पुरावा म्हणून स्वत: स्वाक्षरी केलेलं स्व-घोषणापत्र देऊ शकतात. भारत निवडणूक आयोगाने हया समाजघटकांचा विशेष विचार करुन ही सूट दिलेली आहे.

            जर अर्जदाराकडे, वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा यापैकी कोणताही दस्तऐवज नसेल, तर ते त्यांच्याकडे वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून उपलब्ध असलेला इतर दस्तऐवजही देऊ शकतात.

            voters.eci.gov.in   हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline  या ॲपवरुन मतदार नोंदणीचा अर्ज क्र.6 कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या  (ceo Maharashtra) युटयूब वाहिनीवर आणि  सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. उत्साही मतदारांनी जरुर तेथून मार्गदर्शन घ्यावे.

            भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराचे अनमोल देणे आपल्या सगळयांना दिलेले आहे. आपल्या देशाची व्यवस्था आणि भविष्य हयाबाबत निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.  मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी भारत निवडणुक आयोगाने चालू काळाला अनुसरुन तंत्रज्ञानाच्या आधारे सुंदर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  मतदानाच्या दिवशी एखादया मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नसल्याचा साक्षात्कार होणे सजग नागरिकाला शोभणारे नाही. आधीच मतदार यादीतले आपले नाव आणि मतदान केंद्र पाहून ठेवणे सहज शक्य आहे. जाणतेपणाचे ते लक्षण आहे. मतदानाच्या दिवशी आपले मतदान केंद्र शोधत सैरावैरा फिरणारे तांडे आणि त्यांच्या यंत्रणेवर पडणारा ताण ह्याची मुळी आवश्यकताच नाही.  मतदान करण्यास पात्र असूनही आपले नाव मतदार यादीत नसेल तर ही बाब भारतीय  नागरिक म्हणूवन घेणाऱ्याला नामुष्कीची वाटायला हवी. मतदार यादीत नाव असूनही मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या नागरिकांबद्दल काय बोलावे स्वत:चे इतर सारे हक्क गाजवायला सतत उत्सुक असा हा वर्ग हया महत्वाच्या हक्क-कर्तव्याला कसा विसरतो स्वत:ला आणि आजूबाजूच्या मतदारांना मतदान करायचे आहे, अशी आठवण करुन देण्याइतकी सोपी गोष्ट आपल्या साऱ्यांनाच  करता येईल. प्रगल्भ लोकशाहीच्या वाटचालीतले ते एक छोटेसे पाऊल असेल.

 

Featured post

Lakshvedhi