Thursday, 14 March 2024

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

 कारागृहातून बंद्यांना राज्यमाफी

            मुंबईदि. 14 : केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहीत निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा बंद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच बंद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊनते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून कारागृहातून मुक्त होण्याच्यादृष्टीने बंद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे.

            माफी देताना प्रत्येक बंदीच्या साधारण माफी अधिक विशेष माफीही त्याच्या पूर्ण अथवा शिक्षा कालावधीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त होणार नाहीयाची कारागृह प्रशासनाला दक्षता घ्यावयाची आहे. जन्मठेपेची शिक्षा किंवा देहांत शिक्षा फौजदारी दंड प्रक्रियेतील कलम 433 अन्वये जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरीत करण्यात आली असल्यास आणि निव्वळ 14 वर्षांची कारागृहीन शिक्षा भोगली असल्यास अशा बंद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळणार आहे. ज्या जन्मठेप बंद्यांच्या प्रकरणांचा समावेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 433 (अ) मध्ये होत नाहीअशा बंद्यांना या राज्यमाफीचा लाभत्यांची निव्वळ 10 वर्षे शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. तसेच राज्यमाफी आदेशाचा दिनांक व त्यापूर्वी न्यायालयामार्फत जामीन मंजूर केलेल्या बंद्यांनाही या राज्यमाफीचा लाभ मिळणार  आहे.

            संचित किंवा अभिवचन रजेवर असलेल्या शिक्षा बंद्यांना राज्यमाफीचा लाभ लागू असणार आहे. मात्र अनधिकृतपणे कारागृहाबाहेर असलेल्या बंद्यांना राज्यमाफी देण्यात येणार नाही. माफी पुस्तकावर परत घेण्यात आलेल्या अथवा सर्वसाधारण माफीसाठी पात्र असलेल्या बंद्यांना ही राज्यमाफी देय राहील. तर फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 106 ते 110 अंतर्गत कारागृहात असलेले बंदीभारतीय दंड संहितेमधील कलम 121 ते 130 अंतर्गत शिक्षा झालेले बंदीकेंद्रीय अधिनियमान्वये शिक्षा झालेले बंदीमोक्का व पोस्को कायदा अंतर्गत शिक्षा झालेले बंदीदहशतवादी कारवायांमध्ये समाविष्ट बंदीसंचित रजेकरीता अपात्र ठरणारे बंदीदिवाणी बंदीकिशोर सुधारालयातील मुलेकारागृहातील वर्तन बेशिस्तीचे किंवा असमाधानकारक असलेले बंदी यांना ही राज्यमाफी लागू असणार नाही.  याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत झाला आहे. 

शिक्षा कालावधीनुसार अशी असेल राज्यमाफी

            शिक्षेचा कालावधी एक महिना किंवा तीन महिन्यापेक्षा कमी असल्यास राज्यमाफी पाच दिवसतीन महिने किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी असल्यास राज्यमाफी एक महिनासहा महिने किंवा एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तीन महिनेएक वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा कमी असल्यास राज्यमाफी चार महिनेदोन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा कमीसाठी पाच महिनेतीन वर्ष किंवा चार वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता सहा महिनेचार वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा कमी असल्यास सात महिनेपाच वर्ष किंवा सहा वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी आठ महिनेसहा वर्ष किंवा सात वर्षापेक्षा कमी असल्यास नऊ महिनेसात वर्ष किंवा आठ वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता दहा महिनेआठ वर्ष किंवा नऊ वर्षापेक्षा कमी असल्यास अकरा महिनेनऊ वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी बारा महिनेदहा वर्ष किंवा अकरा वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता तेरा महिनेअकरा वर्ष किंवा अकरा वर्षापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा असल्यास राज्यमाफी  चौदा महिनेतर जन्मठेपेसाठी राज्यमाफी पंधरा महिने असणार आहे.

येत्या शनिवारी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा



 सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने

========================

येत्या शनिवारी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी,
*नाशिक येथे परिसंवाद आणि "गाढवाचं लग्न"या अजरामर वगनाट्याचे सादरीकरण*.

मुंबई (प्रतिनिधी )  = वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवार दि 16 मार्च रोजी नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित "दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान"या विषयावर परिसंवाद आयोजित केला  असून यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल आणि दर्शन थियटर निर्मित  "गाढवाचं लग्न"या विनोदी वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे.

राज्यामध्ये विविध भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. समृद्ध अशा लोक परंपरेने  नटलेले राज्य आहे. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती  व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार  बदलत गेलेली दिसून येते. नमन, दशावतार,  तमाशा शाहिरी, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार  अस्तित्वात आहेत. यापैकी तमाशा कलेतील वगनाट्याचा बादशाह म्हणजे दादु इंदुरीकर. महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा. आजवर अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा महान विनोदसम्राट, वगसम्राट दादू इंदुरिकर. गावातला तमाशा शहरातल्या नाकं मुरडणाऱ्या पांढरपेशी लोकांना पाहायला भाग पाडणारा अवलिया म्हणजे दादू इंदुरीकर. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार  येत्या 16 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून यू. एस. जी. जिमखाना हॉल, नाशिक रोड, नाशिक येथे  सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद आयोजन करण्यात आलेले असून  "दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान"  असे या परिसंवादाचे स्वरूप आहे. 
  या परिसंवादामध्ये    प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, श्री.प्रभाकर ओव्हाळ, प्रा.डाॅ.गणेश चंदनशिवे, श्री.सोपान खुडे, श्री.ज्ञानेश महाराव, अँड. रंजना भोसले, श्री.खंडुराज गायकवाड सहभागी होणार आहेत.

तसेच यावेळी  श्री साई फ्रेडं सर्कल व दर्शन थियटर निर्मित दादू इंदुरीकर यांचे अजरामर   "गाढवाचं  लग्न" या वग नाट्याचे सादरीकरण  होणार आहे.  नव्या पिढीसाठी  असणारे हे वगनाट्य निर्माता / दिगदर्शक - श्री.संजय चव्हाण, श्री. सुरेश धोत्रे, श्री.राजेंद्र ( सरोदे) इंदुरीकर यांनी बसवले असून त्याची निर्मिती सकंलन - श्री.वसंत अवसरीकर यांनी केले आहे.  रसिक प्रेक्षकानी शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव मा.विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभिषण चवरे यांनी केले आहे..

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

 अहमदनगर शहराचे नामकरण

अहिल्यानगर करण्यास मान्यता

            अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधीनागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्तनाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हातालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल.

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे; महिला धोरणाची अंमलबजावणी अन मुंडेंनी मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

 धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे; महिला धोरणाची अंमलबजावणी

 अन मुंडेंनी मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

 

            मुंबई, दि. 13 : राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील नियमांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता मंत्री श्री.मुंडे यांचे नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडेअशी नावाची पाटी मंत्रालयात लावण्यात आली आहे.

            मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित दादा तसेच महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे चौथे महिला धोरण नुकतेच घोषित करण्यात आले. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून आईचे आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आले आहे.

            नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

000

युवा पिढीने कौशल्य आधारित शिक्षण प्राप्त करावे लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’

 युवा पिढीने कौशल्य आधारित शिक्षण प्राप्त करावे

                                                    - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’

 

            मुंबईदि. 13 : आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठीदेशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे नाव देण्यात आल्याची  घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू होणार असून या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावाअसे आवाहनही  उपमुख्यमंत्री यांनी केले.

            'मेघदूतया शासकीय निवासस्थानीकौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील 100 महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या 'ऑनलाईनउद्घाटन कार्यक्रमात  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे  उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे 100 महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण  राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. भारत हा जगातील तिसरी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. देशात प्रथम स्थानी येवुन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर शासनाने भर दिलेला आहे. नुकत्याच  झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातराज्यातील 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून

महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची  मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि युवतींना काळाशी सुसंगत असे आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या केंद्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त करून चालणार नाही तर त्यासोबत विविध कौशल्य प्राप्त केले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.

महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य मिळणार

                                                                 - मंत्री मंगल प्रभात लोढा

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, "पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र अतिशय महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात  येईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत आहे. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून महाविद्यालयामध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.

कौशल्य प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रमांची निवड : आयुक्त निधी चौधरी

            आयुक्त श्रीमती चौधरी म्हणाल्या कीनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित  करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रथम ३५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांना निवडले आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये महाविद्यालय  अधिकाधिक सहभाग वाढवला जाईल. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या कौशल्य विकास केंद्रातून २०० ते ६०० तासांपर्यंतचे  सुसंगत अभ्यासक्रमांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे असेही श्रीमती चौधरी म्हणाल्या.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यांनी आभार मानले.

000

सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल

 सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल

-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास

प्रधानमंत्री यांच्या हस्ते देशातील तीन सेमी कंडक्टरच्या सुविधांचा पायाभरणी समारंभ 

            मुंबईदि. 13 : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक चिप खूप महत्वाचे ठरत आहे. भारताचे 1960पासूनचे स्वप्न आता पूर्ण होत असून भारताला सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून ग्लोबल हब बनविण्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य सवांद प्रणालीद्वारे गुजरातमधील दोन आणि आसामधील एका सेमी कंडक्टर सुविधेचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आलात्याप्रसंगी श्री. मोदी बोलत होते. यावेळी गुजरातमधून केंद्रीय रेल्वे तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णवगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलआसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमाटाटा ग्रुपचे नटराजन चंद्रशेखरनसीजी पॉवरचे वेलायन सुबिह तर मुंबईतून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेकीआजचा दिवस ऐतिहासिक असून येणाऱ्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. प्रत्येक सेक्टरला सेमी कंडक्टरची आवश्यकता आहे. देशातील युवकांच्या स्वप्नांचा हा कार्यक्रम असून लाखो युवकांना सेमी कंडक्टरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाचे पूर्ण सेक्टर खुले केल्याने प्रगतीच्या वाटा निर्माण होतील. पहिल्या ते तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्यावेळी भारत विविध कारणाने मागे होता. चौथ्या औद्योगिक क्रांतीने भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. दोन वर्षात सेमी कंडक्टरचे स्वप्न होत आहे. भारत सेमी कंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन करणारा वैश्विक शक्ती (ग्लोबल पॉवर) बनेल. देशात गुंतवणूकदार येण्यासाठी परकीय थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमात बदल केले. इज ऑफ डुईंग बिझनेस वाढविला. इलेक्ट्रॉनिक इको सिस्टीमला प्रोत्साहन दिले. भारत स्टार्ट अप इको सिस्टीममध्ये जगातील तिसरा देश बनल्याचा अभिमान आहे.

            देशातील गरिबी कमी करण्यासोबत आधुनिक पायाभूत सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येत असून संशोधनासाठी लाखो रूपये खर्च केले जात आहेत. युवा पिढीने एआयच्या माध्यमातून भाषांतरकार तयार केल्याने माझे भाषण आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ऐकू शकता. युवकांच्या सामर्थ्याला संधीमध्ये रूपांतर करण्याची ताकद निर्माण करीत आहेविकसित भारताच्या निर्माणामध्ये सेमी कंडक्टरचे योगदान लाभणार असल्याचा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

            यावेळी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णवगुजरातचे मुख्यमंत्री श्री. पटेलआसामचे मुख्यमंत्री श्री. सरमाटाटाचे श्री. चंद्रशेखरनसीजी पॉवरचे श्री. सुबिह यांनी विचार व्यक्त केले. गुजरामध्ये ढोलेरियासानंद तर आसाममध्ये मोरीगाव येथे सेमी कंडक्टर उत्पादन होणार आहे. भारतातून 60 हजार महाविद्यालयेविद्यापीठशैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सामील झाले होते तर महाराष्ट्रातून 4892 महाविद्यालयेशैक्षणिक संस्थांचे 6 लाख 86 हजार 972 विद्यार्थी सामील झाले होते.

००००

स्वयंम'च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी

 'स्वयंम'च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी

- मंत्री चंद्रकांत पाटील

पाच विद्यापीठांसमवेत सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी

सुरुवातीच्या टप्प्यात कमी क्रेडिट चे अभ्यासक्रम विद्यार्थांना उपलब्ध करणार

           

            मुंबईदि. 12 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रमांसह पोर्टलची निर्मिती करावीअसे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

            आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमुंबई विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई या 5 विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीतंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकरउच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्करउपसचिव अशोक मांडेमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णीप्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरेसावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणेश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ प्रतिनिधी डॉ.जयश्री शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकणे या मुद्दा समाविष्ट असून यासाठी केंद्र शासनाने स्वयंम हे पोर्टल सुरू केले आहे. तथापि त्याचे शुल्क अधिक असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात आणि त्यांच्या शैक्षणिक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कमी क्रेडिटचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह मुंबई विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठशिवाजी विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठ यांनी त्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे समन्वयन मुक्त विद्यापीठ करणार आहे. चारही विद्यापीठातील तज्ज्ञ यासाठीचा अभ्यासक्रम तयार करून तो पोर्टल वर उपलब्ध करून देणार आहेत. दृकश्राव्य स्वरूपातही हा उपलब्ध असेल. त्याच अनुषंगाने आज या विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला.

            सुरुवातीला भारतीय ज्ञान प्रणाली वरील कमी कालावधीचे आणि कमी क्रेडिटचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार असे अभ्यासक्रम शिकवणे बंधनकारक आहे.  विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना क्रेडिट दिले जाईल आणि त्याची नोंद त्यांच्या बँक क्रेडिट मध्ये घेतली जाणार आहे.

0000

Featured post

Lakshvedhi