Saturday, 9 March 2024

हातकणंगले येथील 'शिवराज्य भवन' बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 हातकणंगले येथील 'शिवराज्य भवनबहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 

            कोल्हापूरदि. 8(जिमाका):  हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून 4कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या "शिवराज्य भवन" या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार धैर्यशील मानेखासदार संजय मंडलिकजिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अन्य मान्यवरग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रात 2 हजार 600 चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या शिवराज्यभवन बहुउद्देशीय सदनाचा वापर परिसंवादकार्यशाळायोग प्रशिक्षणअभ्यासिकाशिबिरलग्नसमारंभआध्यात्मिक प्रवचने अशा विविध कारणांसाठी करण्यात येणार आहे.

      या इमारतीसमोर प्रवेश मार्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणाऱ्या या इमारतीमध्ये गेस्ट रुम प्रस्तावित आहेत. या इमारतीच्या वास्तू संकल्पनेतून विविध प्रकारे शिवराज्यामधील पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेअशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

            कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल मराठा समाज तसेच अन्य संस्थासंघटना व नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारली व अन्य निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयातील जनकल्याण कक्षाकडे स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.

 

*

असे धाडस नको रे बाबा

 



Friday, 8 March 2024

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

 

§  12 मार्च रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन

§  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडुन पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे अभिनंदन

 

 

मुंबई. दि.8: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य  करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारकर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहुफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

 पुरस्करासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व प्राप्त व्यक्ती व संस्थाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगेसमाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अभिनंदन केले आहे

राज्यातील एकूण 393 पुरस्कार्थी यांची निवड या चार वर्षाच्या पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहेत्यामध्ये 300 व्यक्ती व 93 संस्थांचा समावेश आहेत्यामध्ये सन 2019-20 मध्ये 78 व्यक्ती व 23 संस्था, 2020-21 मध्ये 66 व्यक्ती व 16 संस्था, 2021-22  मध्ये 78 व्यक्ती व 27 संस्था व 2022-23 मध्ये 78 व्यक्ती व 27 संस्था यांचा समावेश आहे. मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस, जमशेद भाभा नाट्यगृहएनसीपीए मार्गनरीमन पॉइंटमुंबई येथे दि. मार्च, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्यात समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षणआरोग्यअन्याय निर्मुलनजनजागरण क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव शासनाचे वतीने करण्यात येत आहे.

या पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना मुंबई येथे कार्यक्रम ठिकाणी घेऊन जाणे यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत पुरस्कारार्थी यांची  निवास, भोजन व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. एका पुरस्कारार्थी सोबत एक व्यक्ती असे दोन जणांना विशेष निमंत्रित म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सर्व पुरस्कारार्थी यांचे राज्यातील समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रत्यक्ष पुरस्कारार्थी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करीत आहेत.  कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता मुंबईमध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांचे पुरस्कार वितरण सोहळयाचे नियोजन काटेकोर पद्धतीने होण्यासाठी विभागाचे सचिव, सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे. सचिव सामाजिक न्याय व आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली विभागाचे सह सचिवसोमनाथ बागुल, उपसचिव रविंद्र गोरवेमुंबई प्रादेशिक विभागाच्या उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, समाधान इंगळे व त्यांच्या टीमकडून नियोजन करण्यात येत आहे.

 

पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था याची माहिती खालील प्रमाणे.

पुरस्काराचे वर्ष सन 2019-20

पुरस्काराचे स्वरुप

.

क्र.

पुरस्काराचे नाव

व्यक्तींची संख्या

संस्थांची एकूण संख्या

एकूण संख्या

व्यक्ती

संस्था

1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार.

51 

10

61

एकुण 51 व्यक्तींना प्रत्येकी रु.15000/-

एकूण 10 संस्थांना

प्रती संस्था रु.25000/-

2

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

25

6

31

 एकुण 25 व्यक्तींना प्रत्येकी रु.25000/-

एकूण 6 संस्थांना

प्रती संस्था रु.50000/-


 

3

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव  गायकवाड पुरस्कार

1

0

1

 एकूण 1 व्यक्तींला  रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

4

संत रविदास पुरस्कार

1

0

1

 एकूण 1 व्यक्तींला  रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

5

शाहुफुलेआंबेडकर पारितोषिक

0

7

7

एकूण 12 संस्थेला 6 महसुली विभागानूसार प्रत्येकी दोन संस्था रु.7.50 लक्ष सन्मानपत्र , मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल,स्मृतीचिन्ह , शालव श्रीफळ

6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार

0

0

0

राज्यस्तर 3 पुरस्कार प्रथम पुरस्कार 5 लक्षद्वितीय पुरस्कार -3 लक्ष व तृतिय पुरस्कार -2 लक्ष  विभागीय स्तरावर पुरस्कार संख्या 18,प्रत्येकी रु.1.00 लक्ष.

 

एकूण

78

23

101

 

 

 

पुरस्काराचे वर्ष सन 2020-21

पुरस्काराचे स्वरुप

.

क्र.

पुरस्काराचे नाव

व्यक्तींची संख्या

संस्थांची एकूण संख्या

एकूण संख्या

व्यक्ती

संस्था

1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार.

51

10

61

एकुण 51 व्यक्तींना

प्रत्येकी रु.15000/-

एकूण 10 संस्थांना

प्रती संस्था रु.25000/-

2

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

13

-

13

 एकुण 25 व्यक्तींना

प्रत्येकी रु.25000/-

एकूण 6 संस्थांना

प्रती संस्था रु.50000/-

3

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव  गायकवाड पुरस्कार

1

0

1

 एकूण 1 व्यक्तींला

 रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

4

संत रविदास पुरस्कार

1

0

1

 एकूण 1 व्यक्तींला

 रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

5

शाहुफुलेआंबेडकर पारितोषिक

0

6

6

एकूण 12 संस्थेला 6 महसुली विभागानूसार प्रत्येकी दोन संस्था रु.7.50 लक्ष सन्मानपत्र , मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल,स्मृतीचिन्ह , शालव श्रीफळ

6

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार

0

0

0

राज्यस्तर 3 पुरस्कार प्रथम पुरस्कार 5 लक्षद्वितीय पुरस्कार -3 लक्ष व तृतिय पुरस्कार -2 लक्ष  विभागीय स्तरावर पुरस्कार संख्या 18,प्रत्येकी रु.1.00 लक्ष.

 

एकूण

66

16

82

 

 

पुरस्काराचे वर्ष सन 2021-22

पुरस्काराचे स्वरुप

.

क्र.

पुरस्काराचे नाव

व्यक्तींची संख्या

संस्थांची एकूण संख्या

एकूण संख्या

व्यक्ती

संस्था

1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार.

51

9

60

एकुण 51 व्यक्तींना

प्रत्येकी रु.15000/-

एकूण 10 संस्थांना

प्रती संस्था रु.25000/-

2

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

25

5

30

 एकुण 25 व्यक्तींना

प्रत्येकी रु.25000/-

एकूण 6 संस्थांना

प्रती संस्था रु.50000/-

3

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव  गायकवाड पुरस्कार

1

1

2

 एकूण 1 व्यक्तींला

 रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

4

संत रविदास पुरस्कार

1

1

2

 एकूण 1 व्यक्तींला

 रु.21000/-

एकूण 1 संस्थेला

संस्था रु.30000/-

5

शाहुफुलेआंबेडकर पारितोषिक

0

10

10


दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त' उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

 दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तउपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

          मुंबईदि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तभारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्षमुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत मुलाखत प्रसारित होणार आहे.

          जगभरात दरवर्षी 8 मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिनखास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतीय वन सेवेतील कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि वन सेवेत कांदळवन कक्षामध्ये काम करत असतांना कांदळवनांचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्व तसेच कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठीचे प्रयत्न याबाबत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

          'दिलखुलासकार्यक्रमात श्रीमती पाटील यांची मुलाखत शनिवार दि. 9 आणि सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 9 मार्च 2024  रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

हातकणंगले येथील 'शिवराज्य भवन' बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 हातकणंगले येथील 'शिवराज्य भवनबहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

 

            कोल्हापूरदि. 8(जिमाका):  हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून 4कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या "शिवराज्य भवन" या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार धैर्यशील मानेखासदार संजय मंडलिकजिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अन्य मान्यवरग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      हातकणंगले नगरपंचायत क्षेत्रात 2 हजार 600 चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या शिवराज्यभवन बहुउद्देशीय सदनाचा वापर परिसंवादकार्यशाळायोग प्रशिक्षणअभ्यासिकाशिबिरलग्नसमारंभआध्यात्मिक प्रवचने अशा विविध कारणांसाठी करण्यात येणार आहे.

      या इमारतीसमोर प्रवेश मार्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणाऱ्या या इमारतीमध्ये गेस्ट रुम प्रस्तावित आहेत. या इमारतीच्या वास्तू संकल्पनेतून विविध प्रकारे शिवराज्यामधील पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेअशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

            कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल मराठा समाज तसेच अन्य संस्थासंघटना व नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारली व अन्य निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयातील जनकल्याण कक्षाकडे स्वीकारण्याच्या सूचना दिल्या.

 

महिला सशक्तीकरण अभियानातून 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल

 महिला सशक्तीकरण अभियानातून 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल


                                               -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


▪️कोल्हापूर जिल्हयासाठी 4 हजार 50 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांची घोषणा


 


▪️ महिला मेळाव्यात 15 कोटींच्या विकासकामांचे ऑनलाईन लोकार्पण


 


            कोल्हापूर, दि.08 : राज्यात ‘माविम’ अंतर्गत 10हजार 500 गावात, 295 शहरात एकुण 1 लाख 65 हजार बचत गटांमार्फत 20 लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2 कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


             कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे 35 हजारहून अधिक उपस्थिती असलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आमदार सुरेश हाळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महाव्यवस्थापक माया पाटोळे यांच्यासह 600 महिला सरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 


          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराणी ताराबाई यांनी आपल्या अतुलनीय शौर्यातून माताभगिनींचे रक्षण केले. जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्याबाई होळकर यांनी आपला ठसा उमटवला तर सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि आपण त्यांचेच वारसदार आहोत याचा सार्थ अभिमान आहे. सर्वच क्षेत्रात महिला भक्कमपणे उभ्या आहेत. आता शासनाने महिला धोरणही जाहीर केले आहे. राज्यातील महिला अधिक सक्षम होत असून महिला बचतगट हे 100 टक्के कर्जांची परतफेड करणाऱ्या महिलांचा गट आहे. म्हणूनच महिला बचतगटांचे खेळतं भांडवल दुप्पट केले. सीआरपींचे मानधनही दुप्प्पट केले. अंगणवाडी व मदतनीसांची रिक्त पदे भरली जात आहेत. त्यांचे मानधन वाढीसह अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जात आहे. आशा सेविकांनाही लवकरच न्याय मिळेल. महिला व बालविकास विभागासाठी 3 हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगून महिलांसाठी एसटी प्रवासासाठी 50 टक्के सूट देणारे आपले पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.


          महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला शेतकरी, शेतमजूर, उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाला महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी उत्पादन, ब्रँडींग, विक्रीसाठी मदत करण्याच्या सूचना देऊन महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व पीडीतांसाठी समुपदेशन याबाबत निर्णय घेतले असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 4 कोटी महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या केल्या. महिलांना समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून 35 टक्के अनुदानाच्या योजनेतून जास्तीत महिलांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


 


            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांना बसमधे 50 टक्के सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी भरीव कार्य करीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिलांमधे संघर्षाचे संस्कार केले. त्यातूनच अन्यायाविरूद्ध वचक निर्माण झाला महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगतात मागील काही वर्षांपासून महिलांच्या राहणीमानात बदल झाला असून आता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारताला महासत्ता बनविण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री तसेच राज्यात मुख्यमंत्री यांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले. खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हयातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.  


 


कोल्हापूर जिल्हयासाठी 4 हजार 50 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांची घोषणा


 


            जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंचगंगा पूर नियंत्रणासाठी 3200 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यातील निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 750 कोटी रूपयांचा प्रकल्प आराखडा सादर झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरोत्थानमधून इचलकरंजी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली. इचलकरंजीमधील साध्या यंत्रमागांसाठी 1 रूपया व ऑटोलूमसाठी 75 पैसे वीजबिलात सूट देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घोषित केला. तर कोल्हापूर मधील शेतकऱ्यांसाठी केलेल्या 200 पट पाणीपट्टीच्या वाढीला त्यांनी स्थगिती दिली. कोल्हापूर येथे खंडपीठही लवकरच सुरू करणार असून त्यासाठी उच्चस्तरावर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मागणी केल्यानूसार कोल्हापूर मधील उर्वरीत एसटी वाहतूकीतही महिलांसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमात हाकणंगले येथे एमआयडीसी जाहीर झाली आहे त्यांचा परवाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार धैर्यशील माने यांचेकडे सुपूर्द केला. कोल्हापूर मधील 4050 कोटी रूपयांच्या विकासकामांची घोषणा त्यांनी यावेळी केली.


            मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हयात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते विविध महिला लाभार्थींना साहित्याचे व अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. महिला मेळाव्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत उपस्थित महिलांनी टाळयांच्या गजरात केले.


             राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह थोर महिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. 35 हजारहून अधिक महिलांच्या विराट महामेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या व महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.


                                                       


15 कोटी रूपयांच्या विकासकामांचे महिला मेळाव्यात ऑनलाईन लोकार्पण


 


            कोल्हापूर जिल्हयातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी (MH-51) या कार्यालयाचा आरंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. तसेच एकूण 13.50 कोटी रूपयांच्या इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. एकूण रू. 1.44 कोटी किंमतीच्या जिल्ह्यातील महसूल विभागातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना 14 वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री. भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित येथील नवीन इमारत व मोफत उपचार योजनेचे ऑनालाईन उद्घा

टन एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले.


***


मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या दुवा’ चा वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 

        कोल्हापूरदि.8 (जिमाका): मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या "दुवा" या चिमुकलीचा महिलादिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या 'शिवराज्य भवनकोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

            यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेजिल्हाधिकारी अमोल येडगेजिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखेसाई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या 'शासन आपल्या दारीकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव दुवा असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले होते.

            आज याच "दुवा" चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.

**


Featured post

Lakshvedhi