Tuesday, 5 March 2024

शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत

 शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत

- राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटचा दीक्षांत समारंभ

            पुणे दि. ४ : जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरूवातीस एक नवकल्पना होतेप्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळविले. आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारेत्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक घडविण्याची गरज आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटच्या 14 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला वीकफील्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी. एस. सचदेवाआयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्रीपीआयबीएम गुपचे अध्यक्ष रमण प्रीत आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणालेनव्या पिढीने नवोन्मेषकउद्योजकनवप्रवर्तक आणि आव्हाने स्वीकारणारे व्यावसायिक व्हावे. त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकेरबर्ग दडलेला असेल. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल.

            देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या परिवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकांने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखा परिक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात. जागतिक दर्जाच्या कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात. संपत्ती निर्माण करणारे आणि स्टार्ट अप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडावेतअशी अपेक्षा राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

            देशातील 50 टक्क्यापेक्षा अधिक रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषीपशुसंवर्धनदुग्धव्यवसायमत्स्यपालनफलोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षणआरोग्य आणि इतर सेवा क्षेत्रांना प्रभावित करणारे आहे. व्यवस्थापन स्नातक आणि व्यवसाय व्यवस्थापकांनी देशाच्या विकासासाठी एआय शक्तीचा उपयोग करण्यात भारताला अग्रेसर ठेवावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            पदवीदान समारंभात एमबीएच्या 323 व पीजीडीएमच्या 359 अशा एकूण 682 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात  सुवर्णपदक  आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

            प्रारंभी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रमन प्रीत यांनी प्रास्ताविकात संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील प्राध्यापकपालकअधिकारी-कर्मचारीविद्यार्थी उपस्थित होते.

****

 


लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन

 लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी

ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड

बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन


            मुंबईदि. 4 : देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल,  असे प्रतिपादन  वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेलअसे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळजिल्हा प्रशासनएमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 - इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.

            त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवारचंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडासीईओ विवेक जॉन्‍सनमनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडेलॉईडचे मधूर गुप्‍ताकुमार वारराकेश प्रसादराजेश झंझाडजी. डी. कामडेआलोक मेहताके. जी. खुबाटामधुसूदन रुंगटा  उपस्‍थ‍ित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेचंद्रपूर हे आतापर्यंत कोळसासिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्टरेल्‍वेरस्‍ते आदी पायाभूत सुविधाकौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रमसंशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

            मंत्री श्री. लोढा यांनी श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिकऔद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले. ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 संदर्भात एक चित्रफीत दाखवण्यात आली.

            ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 साठी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

50 वर्षांचे व्हिजन तयार करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

            चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या  विकासासाठीजिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन तयार करावेअशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्सवॉटर स्‍पोर्टसपर्यटनपर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्यारिसॉर्टसबांबू लागवडमत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार - अलोककुमार मेहता

            लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपचे संचालक (मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट) अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट स्‍थापन करण्‍यात येणार असून त्‍या माध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईलअसे ते म्‍हणाले. मधुसुदन रुंघटा यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

19 सामंजस्‍य करार75 हजार 721 कोटींची गुंतवणूक

            अॅडव्‍हांटेज चंद्रपूरच्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह एकुण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. यामध्ये सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांचे करार करण्‍यात आले ज्‍या द्वारे या भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केली. या विविध करारांवर आर्सेलर मित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहतान्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडेलॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ताचंद्रपूर सोलारचे राजेश ओसवालअंबुजा सिमेंट के. सुब्‍बलक्ष्‍मणनअरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय मिश्राराजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍तासनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यरअल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयलवेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातारअल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसनडेस्टीनो मिनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडेएसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

            मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनामध्‍ये कोळसा खाणी, खनिज, लोह – पोलाद, बांबू, मत्स्यव्यवसाय, पर्यटन सोबतच पुरवठा, डेअर, ग्रीन एनर्जी, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत. मान्‍यवरांनी यावेळी या प्रदर्शनाची पाहणी करून कौतुक केले.

0000

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत

९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

 

            मुंबईदि. ४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी राज्यातील  ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला आपल्या ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याबाबत आवाहन केले होते.

            राज्यात एकूण ८९,२९९ बुथ व ट्रान्झिंट टिम २७,५५३ फिरती पथक १५,४३० व रात्रीचे पथक ६४२ याद्वारे ० ते ५ वर्ष वयोगटातील ९५,६४,६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस (आय.पी.पी.आय.) राबविण्यात येणार असून घरोघरी जाऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

            राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करुन त्यांच्या मार्फत सर्व जिल्हा व मनपा या मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली व त्यांच्यामार्फत मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. सर्व शासकीय विभागअशासकीय संस्थाजागतिक आरोग्य संस्थायुनिसेफजे. एस.आय.आय.एम. आय. आय. ए.पी. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी मदत झाली.

            देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यांत येत आहे. दिनांक ३ मार्च २०२४ रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्यामध्ये राबविण्यात आली.

            या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. दि. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो. यासाठी पोलिओ निर्मुलनाकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणणे आवश्यक आहे.

००००

लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित

 लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. ४  मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी " ही योजना सुरु करण्यांत आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.

            एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयनवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरीत करण्यांत आले याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

            आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

            या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपयेइयत्ता पहिलीत ६ हजार रुपयेसहावीत ७ हजार रुपयेअकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

            ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहीलतसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

0000

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ

 मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रमचार कोटी लोकांना मिळाला लाभ



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुक्ताईनगर पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी देणार

            जळगाव दि. 4 (जिमाका) :  महाराष्ट्र शासनाचा " शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजनाएस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या  पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील  पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआ. किशोरआप्पा पाटीलआ. संजय सावकारेआ. चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलमाजी आ. चंद्रकांत सोनवणेमाजी आ. दशरथ भांडेजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.

             मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

              यावेळी मुख्यमंत्री म्हणालेराज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायतकोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंयकोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

            संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी  रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

            मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणालेमुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे.

            यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन

              संत निवृत्तीनाथसंत ज्ञानेश्वरसंत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी ज्या मुक्ताईनगरमध्ये आहे त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली.

००००

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

 जिल्हास्तरीय वारकरी भवनाचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            जळगाव दि. 4 (जिमाका ) : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            आज त्यांच्या हस्ते या 'वारकरी भवनचे भूमिपूजन खेडी ( जळगाव )येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखा. उन्मेष पाटीलखा  रक्षा खडसेआ. राजुमामा भोळेआ किशोरआप्पा पाटीलआ.चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकितह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि  मनाला खुप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या  'वारकरी भवनचे भूमीपूजन होत  आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून  शुभेच्छा देतो.  

             पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू  या सर्वात महत्वाचे असे 'वारकरी भवनबांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून या 'वारकरी भवनप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातूनत्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करुन मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.   पंढरपुरचा विकास होत असतांना  राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेतत्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 'वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची  तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वारकरी भवन

            प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन            पहिल्या टप्प्यात  सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.


कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श न

 कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या

जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्श

            मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी चित्ररथाचे प्रदर्शन ०५ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.


            हा चित्ररथ कोल्हापूरमधील महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करणार असून या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


            मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन चित्ररथ निर्मिती कामी लाभले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


000

Featured post

Lakshvedhi