Tuesday, 27 February 2024

औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठ pl कृती आराखडा तयार करावा

 औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठ pl

कृती आराखडा तयार करावा


- विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


            मुंबई, दि. 26 : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.


            विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात होणाऱ्या औद्योगिक दुर्घटना विषयी उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस देविदास गोरे, संचालक, औद्यागिक सुरक्षा विभाग, मुंबई, डॉ अविनाश ढाकणे सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, पुणे शहर, प्रदीप जांभडे पाटील, अति आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा, संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड, रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प पुणे ,कैलास केंद्रे मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद, संतोष वारीस, संचालक फायर ब्रिगेड सेवा महाराष्ट्र, कळसकर उपायुक्त परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.


            औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महानगर पालिका, औद्योगिक सुरक्षा, गृह, पर्यावरण विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या धोकादायक पदार्थांचे नियमन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त रसायन साठा ठेऊन होणाऱ्या दुर्घटनावर काही प्रमाणात बंधन आणणे शक्य होईल, तसेच या रसायनांचा मर्यादित साठा व आवश्यक तो योग्य वापर होत असल्याबाबत खात्री करता येईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने उद्योगांमध्ये अंतर्गत भागात सी.सी.टी.व्ही बसवावेत, उद्योगांपर्यंत जाणारे रस्ते अग्निशमन यंत्रणा पोहचेल असे असावेत. ग्रामीण भागासाठी लहान अग्निशमन यंत्रणा खरेदी कराव्यात,लहान अग्निशमन केंद्रे स्थापन करावीत. सर्व जिल्ह्यांनी त्यांची आपत्ती व्यवस्थापन कार्य प्रणाली संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.


            उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १०८ रुग्णवाहिका धर्तीवर अग्निशमन यंत्रणा उभी करण्याबाबत आराखडा तयार करावा. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात यावे. सुरक्षेबाबत महिला कामगारांमध्ये जनजागृती करावी. महिला बचत गटही अनेक प्रकारचे उत्पादन घेत असतात. त्यांच्यामध्येही जनजागृती करावी. मोठ्या गृहनिर्माण संस्था, मोठे उद्योग यांनी आपल्या परिसरासाठी अग्नी शमन यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या यंत्रणांचा आपत्कालीन परिस्थिती मध्ये नक्की फायदा होऊ शकतो. राज्यातील असुरक्षित औद्योगिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून बेकायदेशीर कारखान्यांची माहिती संकलित होईल. यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग कोणत्या क्षेत्रात जास्त आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते याची परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणातून तयार होईल. त्याचा फायदा कृती आराखडा तयार करता होणार आहे. वाढत्या शहरांमध्ये तसेच विकास प्राधिकरणांमध्ये उद्योगांच्या नियमनासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही समावेश कृती आराखड्यामध्ये असावा.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, प्रत्येक उद्योग आस्थापना यांना त्यांचे उद्योगामध्ये महिला कामगारांच्या लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा, सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडीट करावे, सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावा, अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ कारखान्याने आर्थिक मदत करावी. अपघातबाधित मुलांचे व मुलींचे शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.


------

कल्याण –शिळ रस्त्यास वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव

 कल्याण शिळ रस्त्यास

वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव

 

            मुंबई दि. 26 : कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

            भिवंडी-कल्याण-शिळफाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करून तो सहापदरी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे.  या रस्त्यांपैकी कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत येत असलेल्या कल्याण शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात झालेली वाढ तसेच रस्त्याचे डांबरीकरणा ऐवजी क्राँक्रीटीकरणाने सहापदरीकरण करणे यानुषंगाने या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुधारित बांधकाम खर्चापोटी रु.५६१.८५ कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सध्या रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

71 व्या मिस वर्ल्ड टीमचे ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन विश्व सुंदरीने पाठिंबा दिल्याने जगभरात वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती

 71 व्या मिस वर्ल्ड टीमचे सेव्ह द टायगर’ मोहिमेला समर्थन

विश्व सुंदरीने पाठिंबा दिल्याने जगभरात

वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागृती

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 26 : जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ताडोबा फेस्टिव्हल’ दिनांक १ ते ३ मार्च दरम्यान होत आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला. ११२ देशातून आलेल्या विश्व सुंदरीनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईलअशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

            मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीमिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली,  २०२३ या वर्षाची मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिनाजमिल सैदी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेवाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होतीजी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटतेजेणे करून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वाघाच्या संवर्धनासाठी ताडोबा अभयारण्यात झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली म्हणाल्याआम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या ॲम्बेसेडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आलेयाचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाहीतर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.

            या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणेत्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ताडोबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.

000

1 ते 3 मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन

 1 ते 3 मार्च या कालावधीत ताडोबा महोत्सव

वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी महोत्सवाचे आयोजन

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

2 मार्च रोजी होणार वृक्षारोपणाचा विश्व विक्रम

            मुंबईदि. 26 : वन्यजीव संरक्षणशाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1955 साली झाली.  ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

            पर्यटनाला चालना देणेऔद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले

            या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रेदुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

            निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरणलघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.

            कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीफोटोग्राफी कार्यशाळाचॅरिटी रनचर्चासत्रेआणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.

            कार्यक्रमाच्या ऱ्या दिवशीसहभागींना ट्रेझर हंट स्पर्धासायक्लोथॉनचित्रकला स्पर्धावन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी  यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

000

*विनंती साखर सोडा

 *विनंती साखर सोडा*

डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.

 "त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."

*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*

(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*

(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*

(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*

(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.* 

(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*

(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*

(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.*

(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*

(१०)  साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*

(११)  साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.

(१२)  साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.

(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*

*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹

*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*🙏🇮🇳

Monday, 26 February 2024

मना-मनात रुंजी घालणारा गझलचा

 मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली

 

            मुंबईदि. २६ :- रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झालाअशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

             ‘चिठ्ठी आयी है..चिठ्ठी आयी या सदाबहार गझलच्या माध्यमातून पंकजजींनी रसिकांच्या मनांचा ठाव घेतगझल गायनाच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवले. गझलांमधील तरल भावनांना सुरेल आवाज देणारा हा कलावंत तितकाच विनम्र होता. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय गझल गायकीला घरा-घरात आणि मना-मनात पोहचवणारा आवाज शांत झाला आहे. ते स्वररुपात अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्र एका ज्येष्ठ मार्गदर्शकालाही मुकले आहेअसे शोकसंदेशात नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००००

वृत्त क्र. 760

रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 26 :  ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होतीत्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात,  पंकज उधास यांनी अनेक चित्रपटांसाठी विविध प्रकारची गाणी गायली. त्यांनी गायिलेल्या गजलांनी तीन पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले. आजही ‘चिठ्ठी आयी है’ हे गाणं लागतं तेव्हा मन कातर होतं. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती. मैफीलीत त्यांचे गाणे अधिक खुलून यायचे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून कुटुंबियांना या दु:खातून सावरण्याचे बळ देवोअशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

००००


भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे

  भाषा गौरव दिनानिमित्त

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे प्रकाशन

मुंबईदि. 26 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी 27 फेब्रुवारीमराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या 39 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यन्त 666 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मागील वर्षभरात छपाई झालेल्या 39 पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉ.अरुणा ढेरे लिखित भारतीय विरागिणी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या ग्रंथामध्ये भारतीय पातळीवरील काव्यविश्वातील कवयित्रींची- संत आणि भक्त अशा स्त्रियांची कालसंबद्ध पार्श्वभूमीत्यांनी निवडलेले भक्तिमार्गत्यांचा परमार्थविचारलौकिकाविषयीची त्यांची दृष्टीत्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षत्यांची जीवनसाधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन होते. तर, ‘चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा माय धुरपता’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ संजीव भागवत यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. मातृदेवता आणि त्यांचे अस्तित्व सर्वसामान्यांमध्ये अजूनही कसे अबाधित आहे याचा दाखला हा ग्रंथ देतो. लोकसाहित्याचे अभ्यासकसंशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ दिशादर्शक असा आहे.

मंडळामार्फत प्रकाशित होत असलेल्या अन्य महत्त्वपूर्ण पुस्तकांमध्ये महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषासाहित्यकलाकल्पनावस्त्रप्रारणेखाद्याभिरुचीनितीसंकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास मांडणारा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ (खंड-2) 1901-1950 (भाग-1 व भाग-2) हा रमेश वरखेडे यांनी लिहिलेला ग्रंथकै.प्राचार्य रामदास डांगे व कार्यकारी संपादक श्रीमती सुप्रिया महाजन यांनी संपादित केलेल्या मराठी व्युत्पत्तिकोश’ हे पुस्तकश्रीमती मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या अक्षरबालवाङ्मय’ या प्रकल्पातील तिसरा खंड भ्रमणगाथा’ हा खंडश्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून डॉ.विश्वास पाटील यांनी संपादन केलेल्या या प्रकल्पातील खंड-3 आणि खंड-4 चा समावेश आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत यापूर्वी प्रकाशित झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुनर्मुद्रित चरित्रगोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्रयापूर्वी प्रकाशित झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुनर्मुद्रित चरित्र, ‘कस्तुरबा गांधी जीवन चरित्र’, जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे चरित्रश्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्रडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रडॉ.पतंगराव कदम यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारे चरित्र, ‘गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’ या त्रिखंडात्मक प्रकल्पांतर्गत भाग-2 ‘अष्टांगांचा अभ्यास’ व भाग-3 'गोदा संस्कृतीहे दोन महत्त्वपूर्ण खंडयाचबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेली माणसाचा मेंदू व त्याचे कार्य’, खगोलशास्त्राचे विश्वस्वातंत्र्याविषयीअभिनय साधनाबोस्तानयशोधनमराठी शब्दकोशपोर्तुगीज-मराठा संबंधतमिळ भाषा प्रवेशगजाआडच्या कविता व उर्दू-मराठी शब्दकोश इत्यादी अशी मुद्रित व पुनर्मुद्रित मिळून 39 मौलिक पुस्तके वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मंडळाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून एकूणच मौलिक ग्रंथऐवज वाचकांना उपलब्ध होत असल्याची भावना डॉ.मोरे यांनी व्यक्त केली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

Featured post

Lakshvedhi