Thursday, 22 February 2024

निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

  निविष्ठा सुधारणा विधेयक

सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 21 : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            अप्रमाणितभेसळयुक्त व बनावट बियाणेकीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.

            या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरीडॉ. मनीषा कायंदेसमीर कुणावरसंजय रायमुलकर, कैलास पाटीलबाबासाहेब पाटीलदिलीप बनकर, प्रकाश आबिटकरकृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमारकृषी आयुक्त प्रवीण गेडामविधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.

            या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजेत्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

            बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तूबियाणेकीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.


कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी

 कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावी

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धा

 

            मुंबईदि. 21 : छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा राज्य शासनामार्फत आयोजित करण्यात येते.  यावर्षी ही स्पर्धा ठाणे येथे 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंची उत्तम व्यवस्था करावीअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले. 

             सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरतडेजिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्केकबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी  उपस्थित होते.

             या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची बक्षीसांची रक्कम वाढविण्यासाठी तातडीने क्रीडा विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. देसाई म्हणालेया स्पर्धेत पुरूषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहे. खेळाडूंची निवासभोजन तसेच वाहतूकीची उत्तम व्यवस्था करावी. स्पर्धा ठिकाणी स्वच्छतापार्किंग आदींची व्यवस्थाही असावी. महिला खेळाडूंच्या बाबत सुरक्षानिवासाच्या व्यवस्थेचे विशेष लक्ष ठेवावे. ही स्पर्धा ठाणे (पश्चिम) भागातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जवळील मैदानावर होणार आहे.  स्पर्धेसाठी निधी वाढवून मिळण्याबाबत विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

               बैठकीस कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

००००

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा

 खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र उभारणीचा प्रस्ताव सादर करावा

उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

            मुंबईदि. 21 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे उभारण्यासाठी विद्यापीठ कार्यकारी समितीचा अहवाल सकारात्मक आहे. तसेच शासकीय जागाही उपलब्ध आहे. खानापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीमुळे सातारासांगली या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असून उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावाअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उपकेंद्र आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसुहास बाबर आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू दिगंबर शिर्केकुलसचिव व्ही. एन शिंदेप्राचार्य व्ही. एम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            विद्यापीठाने खानापूर येथील उपकेंद्राचा सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणालेखानापूर येथे शासकीय गायरान जमिन उपलब्ध आहे. तसेच जलसंपदा विभागाची जमीनही आहे. आवश्यकता असल्यास जलसंपदा विभागाच्या जमिनीचाही उपयोग करता येईल. सांगली येथे तात्पुरते उपकेंद्र सुरू न करता खानापूर येथेच कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करावे. प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

००००

टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट..."दीपक राग"

 तानसेन दरबारात गात होता .. गाणे रंगत चालले .. संथ आलाप संपून तेजाळ काजव्यांसारखे ,वणव्यात वाऱ्याने उडणाऱ्या ठिणग्यांसारखे भेदक सूर लय तालांतून गिरक्या घेऊ लागले ... तसतसे दिल्लीच्या हिवाळ्यातले ते थंड वातावरण उबदार होऊ लागले ... अनेकांनी लपेटलेल्या आपापल्या उंची शाली सैल केल्या .. विचित्र काहीतरी घडत होते ... गायनाची तीव्रता वाढत होती तसतशी कणाकणाने उष्णता वाढत होती ... एकीकडे मनाला संमोहित करून पकडून ठेवणारे सूर तर दुसरीकडे या उष्णतेने बैचैन होणारे शरीर या घालमेलीतून सगळेजण जात असतानाच .. गायनाचा परमोच्च बिंदू आला ... जवळ कुठेतरी आगीचा लोळ उसळला आहे असे वाटले आणि अचानक महालातले तेल वात घालून ठेवलेले सगळे दिवे पेटले.. तानसेनाच्या बाजूचा किनखापी पडदा देखील पेटून धडधडा जळू लागला.. तानसेन गाणे थांबवून गलितगात्र होऊन बाजूच्या गिरदीवर कलंडला... बादशाहासहित सगळे दरबारी अवाक होऊन एक दोन क्षण पाहतच राहिले आणि नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट..."दीपक राग" 


    तानसेनाला अनेक बक्षीस मिळाली ... चारी दिशांना कीर्ती पोहोचली... पण या गोष्टीचा आनंद एक व्यक्ती उपभोगू शकत नव्हती आणि ती म्हणजे स्वतः तानसेन ... दीपक राग गायिल्यामुळे तानसेनाच्या अंगात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती ..खरंतर ऐरागैरा दीपक रागाने भस्मच होऊन जायचा पण गुरु हरिदासांच्या कृपेने जीवावरचं निभावल पण अंगाची लाहीलाही काही थांबत नव्हती .. आणि हलाहल विष पिऊन कंठात विष राहिलेल्या महादेवाप्रमाणे तानसेनच्या कंठात त्या उष्णतेचा परिणाम होऊन सूर निघणेच कठीण झाले ... तानसेन मनातून कोसळला


   तानसेनचे गाणे थांबले... बादशाहासहित सगळे हळहळले .. यावर उपाय काय .. अनेक वैद्य हकीम झाले ..जादू मंतर झाले . मग कुणीतरी सांगितले.. अग्नीला तोड म्हणजे पाणी .. याच्या तोलामोलाच्या कुणी गायकाने मल्हार राग ऐकवला तर कदाचित याचे दुःख दूर होईल.. .. आता तानसेनाच्या तोलामोलाचा गायक सापडणार कुठे ... सगळ्या साम्राज्यात शोध सुरु झाला ..अनेक दिवस गेले आणि एक दिवस बातमी आली .. गुजरातमध्ये वडनगर गावात दोन जुळ्या मुली राहतात .दिव्य निर्मल सुरांत गातात .. त्यांचे नाव "ताना" आणि "रीरी". 


   तानसेन वडनगरला पोहोचला.. ताना-रीरीच्या घरी .. त्यांच्या घरच्यांना विनंती केली .. पण आम्ही घरंदाज आम्ही कोणासमोर गाणार नाही असा त्यांचा ठाम निश्चय .. समोर सापडलेली सुरगंगा पण अजूनही दुर्लभ ... अनेकदा विनंती केल्यावर शेवटी दोघी बहिणी गावातील देवीच्या मंदिरासमोर पडद्याआड राहून देवीसाठी गाणार आणि तानसेन पडद्याच्या पलीकडून ऐकणार असे ठरले .. 


तो दिवस उगवला .. ताना रीरी देवीसमोर मल्हार गाऊ लागल्या .. पहिला सूर कानी पडताच तानसेनाच्या कानात अमृताचे थेंबच पडले ... डोळ्यातून अश्रू वाहू लागले .. हा स्वर्गीय सूर ..आणि हे सुरांचे पावित्र्य .. वातावरण बदलू लागले .. कुंद झाले ... ढग भरून येऊ लागले .. आणि काही वेळाने आवेगाने बरसू लागले ... तानसेन पावसात आणि मल्हारच्या सुरांत मनसोक्त भिजू लागला ... अहंकार ढेकळासारखा फुटून वितळून गेला .. .. दीपक रागाने पेटलेला वणवा मल्हारच्या वर्षावाने विझला .. अंतर्बाह्य थंडावा ... 


   इकडे दिल्लीला खबर पोहोचली .. तानसेनपेक्षा चार पाऊले पुढे असणाऱ्या दोन कन्या ..दोन गायिका .. आपल्या दरबारात कशा नाहीत ... बादशहाने विनन्तीचा निरोप पाठवला .. पण "आम्ही फक्त अंबा मैया समोर गाणार दरबारात गाऊ शकत नाही" म्हणून ताना रिरिने उत्तर पाठवले ... असं कसं चालेल?.. या अकबराच्या दरबारात सगळी रत्ने पाहिजेतच .. मग बादशहाने दरखास्त सोडून हुकूम पाठवला ... तरीदेखील पुन्हा नकार ... आता बादशाहाने कैफात येऊन सैनिक पाठवले , ताना रीरीला काहीही करून घेऊन या आणि नाही आल्या तर गाव उध्वस्त करा ... 


   ताना रीरी धर्मसंकटात सापडल्या .. जावे तर मर्यादेचा भंग ..न जावे तर सगळे गाव हकनाक बळी जाणार .. शेवटी त्यांनी तो मधला मार्ग काढला ... रात्री सगळे गाव आणि घरातले लोक झोपेत असताना .. घरासमोरच्या खोल काळ्याकभिन्न विहिरीला त्यांनी आपलंसं केलं .. 


    बादशाह अपराधी भावाने अहंकाराच्या आणि लोभाच्या कैफातुन भानावर आला .. ताना रीरीचे स्मारक वड नगरला बांधण्यात आले .. तानसेन दुःखाने उन्मळून पडला .. आपल्या काही संगीतरचनांमधून त्याने ताना रीरीच्या स्मृतीला स्थान दिले ... 


   आज देखील गुजरात सरकारतर्फे ताना रिरीच्या स्मरणार्थ ताना रीरी संगीत महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील दोन लोकांना सोबत पुरस्कार दिला जातो.


   गुजराती भाषेतील लोकगीते आजही ताना रीरीची गोष्ट सांगतात .. आणि वडनगरच्या वाऱ्यात पाऊस पडत असताना मल्हारचे फिकट सूर ऐकू येतात...

ध्यानपूर्वक वाचा कदाचित आवडेल ...🙏🌹✍️only ज्येष्ट

 ध्यानपूर्वक वाचा कदाचित आवडेल ...🙏🌹✍️


 वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा ते टोमणे मारतात, परंतु डॉक्टर ते वरदान मानतात: डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्याचे रोखण्याचा कोणताही मार्ग नाही.  अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे.  अति बोलण्याचे किमान तीन फायदे ज्येष्ठ नागरिकांना होतात.

 *_प्रथम:_* बोलणे मेंदूला सक्रिय करते आणि मेंदू सक्रिय ठेवते, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: जेव्हा पटकन बोलले जाते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांची गती जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते.  जे ज्येष्ठ नागरिक बोलत नाहीत त्यांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

 *_दुसरा:_* जास्त बोलल्याने तणाव दूर होतो, मानसिक आजार टळतो आणि तणाव कमी होतो.  आपण अनेकदा काही बोलत नाही, परंतु आपण ते आपल्या हृदयात दडपतो आणि गुदमरल्यासारखे वाटते आणि अस्वस्थ वाटते हे खरे आहे, म्हणून, वरिष्ठांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले होईल.

 *_तिसरा:_* बोलण्यामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो तसेच घशाचा व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता वाढते, तसेच डोळे आणि कानांना होणारा हानीचा धोका कमी होतो आणि चक्कर येणे, डोके चढणे आणि बहिरेपणा यासारखे सुप्त धोके कमी होतात.

 *_थोडक्यात,_* सेवानिवृत्त, म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही शक्य तितके बोलणे आणि लोकांशी सक्रियपणे संवाद साधणे.  याला दुसरा कोणताही इलाज नाही.

      शक्य तितक्या वरिष्ठांना पाठवा....🙏🙏🙏

सातारा शहरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट विकसित करावे

 सातारा शहरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट विकसित करावे


- उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचना


 


            मुंबई, दि. 21 : सातारा शहरातील नगर पालिका हद्दीत पोवई नाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई बेट (आयलँड) विकसित करण्याची कार्यवाही करून शहराच्या सौंदर्यात भर घालावी. याठिकाणी जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे करावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.


               सह्याद्री अतिथीगृह येथे याविषयी आढावा बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी प्रदीप डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी चर्चेत सहभाग घेतला.


                बाळासाहेब देसाई आयलँड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या आयलँडवरील बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे डिझाईन अंतिम करावे. आचासंहितेपूर्वी काम सुरू करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. सातारा येथील जिल्हा लोकल बोर्ड इमारत हेरीटेज दर्जा असलेली इमारत आहे. या इमारतीचा पुनर्विकास हेरीटेज दर्जानुसार करावयाचा असून त्यासाठी अशा प्रकारचे काम करणारा कंत्राटदार असावा. हेरीटेज कामाला कुठेही धक्का न लागता दुरूस्तीचे काम करावे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम करून काम सुरू करावे, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.   

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे

 कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या

पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे

- उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

            मुंबईदि. 21 : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांचे विविध  प्रश्न सोडविण्यासाठी शासन संवेदनशील आहे. यासंदर्भातील न्यायालयीन लढा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्याने याबाबत समन्वयक मंत्र्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून सीमावर्ती मराठी भाषिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  संवेदनशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली शासन सीमावर्ती भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेअसे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

            महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकसहसचिव (विधी) प्रशांत सदाशिवउपसचिव रा. दि. कदम – पाटीलमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेएकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकरसमितीचे दिनेश ओऊळकरप्रकाश मरगाळेॲड एम. जी पाटील आदी उपस्थित होते.

            सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले,  सीमावर्ती भागातील 865 गावांमधील मराठी भाषिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनामुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तहसिलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला असून शिनोली (ता. चंदगडजि. कोल्हापूर) येथे कार्यालय असणार आहे. कायदेशीर पातळीवर लढा देण्यासाठी समन्वयक मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे जावून नियुकत केलेल्या विधीज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत आग्रही असून सातत्याने त्यांच्या स्तरावरही पाठपुरवा करण्यात येत आहे.

            सीमावर्ती भागात नागरिकांचे प्रशासनातील काम जलद गतीने होण्यासाठी मराठी भाषा समजणाऱ्या दुभाषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कर्नाटक शासनाला पत्र देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र ताकदीने ही लढाई लढणार असून त्यासाठी आणखी दर्जेदार विधिज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. राज्य शासनाने या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तीन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.  कर्नाटक शासनानेही समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी, यासाठी शासनाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.  

            बैठकीत कायदेशीर बाबीसीमावर्ती भागातील मराठी भाषिकांसाठी आरोग्य योजनांचा लाभद्विभाषक अधिकारी नियुक्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला समितीच्या शिष्टमंडळातील पदाधिकारीतसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

***

निलेश तायडे/विसंअ/


 


Featured post

Lakshvedhi