Saturday, 10 February 2024

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!! ____________________________

 डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती  उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!

____________________________


🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏


🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹 


😊स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा.. 

ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.. 


भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन.. 


🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल.. 

सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत.. 


सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत?? 


🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो.. 


🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.. 


लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.. 


🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही?? 


कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो.. 


तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.. 


विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो??? 


लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.. 


लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते.. 

या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : 


जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.. 


लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.. 


आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.. 


🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा.. 

तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.. 


 🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏 

                 आनंदवन 


कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही

श्री कालभैरव प्रतिमा

 


महा खादी एक्स्पो’ लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा

 ‘महा खादी एक्स्पो’ लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा

मुख्य कार्यकारी अधिकारीआर.विमला

'दिलखुलास', ‘जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'मध केंद्र योजनाव 'महा खादी एक्स्पो 2024' विषयावर मुलाखत

            मुंबईदि.:महाराष्ट्र खादी व  ग्रामोद्योग मंडळामार्फत मुंबईत 'महा खादी एक्स्पो 2024'  चे आयोजन 16 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून मुंबईतील नागरिकांना वस्त्रवस्तूस्वाद आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येणार असून हा 'महा खादी एक्स्पो 2024' लघु उद्योजक व ग्राहकांना जोडणारा दुवा ठरणार असल्याचे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात सांगितले.

            राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जिटेक्स ग्राऊंड 5 येथे 'महा खादी एक्स्पो 2024' चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात लघु उद्योग विकास महामंडळउद्योग संचालनालय व भारतीय लघु उद्योग विकास बँक तसेच एक जिल्हा एक उत्पादन यातील उद्योजकांचा सहभाग असणार आहे. मुंबईत परपडणाऱ्या 'महाखादी एक्स्पो 2024' चे नियोजन, यातील बाबींचा समावेश, मंडळाच्या 'मध केंद्रयोजनेला मिळालेली मान्यता, ही योजना, योजनेची अंमलबजावणी याबाबत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात आर.विमला यांची मुलाखत सोमवार दि.12, मंगळवार दि.13 आणि बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000


नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे

 नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार

            मुंबई,दि. 9, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.            

            5 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दी तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम 2024 अस्तित्वात आणण्यास मान्यता देण्यात आली. या अधिनियमाबाबात काही संस्था व व्यक्ती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पणया अधिनियमातील तरतूदीनुसार व्यवस्थापकीय समितीमधील सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातील असणार आहेत. शीख समुदायाचे अधिकारीतज्ज्ञविचारवंत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या व्यक्तींचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. शीख (केशधारी) समुदायाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असणार नाही.            

            तसेच या समितीच्या अध्यक्ष निवडीबाबतही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील. तसेच शीख समुदायाच्या नियमानुसारच या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात येणारी व्यक्ती केशधारी असेल. नवीन समितीमध्ये एकूण 17 सदस्य असतील. त्यामध्ये सदस्य निवडणुकीने निवडले जातील. दोन सदस्य शिरोमणी व्यवस्थापन समिती, अमृतसर यांच्याकडून तर राज्य शासनाद्वारे नियुक्त सदस्यही असतील.            

            या अधिनियमाबाबतचे विधेयक लवकरच विधानसभेमध्ये मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तरी या अधिनियमाबाबत पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या प्रचारास बळी न पडता शीख समुदायातील नागरिकांनी कोणतीही शंका मनात धरू नयेअसे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

 कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

          मुंबईदि. ९: कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखकलघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.

          या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालयपुणे यांनी दिली आहे.

0000

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

 उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            ठाणेदि. 09 (जिमाका) :- राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन व "मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा"  (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ आज हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतमाजी आमदार रविंद्र फाटकमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मासहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारीविजय राठोडएमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेरस्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेराज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेतयासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक 1 चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.

      महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीसीतील अधिकारीकर्मचाऱ्यांच्या 8 वी ते 10 वी च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारीकर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारीकर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.

      राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 8 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन त्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेएकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नकोयासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत 2.5 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

      यावेळी उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले कीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. गेले 16 महिने महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे. अधिकारीकर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी व ट्रॅफिक पासून मुक्ती मिळावीयासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ व्हावेहा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी 34 कोटी रुपये खर्च करुन हे बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण  करण्यात आले आहे.

      यावेळी मंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या काही पाल्यांना प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी 8 वी ते 10 वी मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले.औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारीकर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारीकर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना" (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.

       कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळा विषयी माहिती दिली.     कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दिपप्रज्वलनाने झाली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारीकर्मचारीत्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000000


 

सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा, सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

 सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा,

 सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

 

            मुंबई‍‍दि.९ : सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जातात. सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयात याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. विविध योजनांसाठी आलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना सचिव श्री. भांगे यांनी दिल्या.

            सचिव श्री. भांगे म्हणालेसन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने विभागांतर्गत सर्व महामंडळेसमाज कल्याण आयुक्तालयप्रादेशिक उपायुक्तसहायक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व दिव्यांग कल्याण विभागाने त्यांचे स्तरावरुन मंजूर निधी खर्चाबाबत नियमानुसार विहीत वेळेत कार्यवाही करावी. त्यासंबंधी तातडीने प्रस्ताव सादर करावे.

            दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्याचे निर्देश ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी'  अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. आमदार श्री. कडू हे दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

            या  बैठकीमध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी अखर्चित निधीबाबतचे प्रस्तावविशेष शाळांमधील रिक्‍त पदांच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्तावविशेष शाळांना अनुदान देण्याबाबत धोरणदिव्यांग शाळांचा बृहत आराखडानमो दिव्यांग शक्ती अभियान तसेच मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृहे स्थापन करणेबाबतचे प्रस्ताव याबाबत चर्चा करण्यात आली.

            या बैठकीस समाज कल्याण आयुक्त  ओम प्रकाश बकोरियाबार्टीचे महासंचालक सुनील वारेसमाज कल्याण आयुक्तालयातील सर्व उपायुक्तराज्याचे सर्व प्रादेशिक उपायुक्तसहाय्यक आयुक्त ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंदूस्थान ॲग्रोचे अध्यक्ष डॉ.ढोकणे पाटील,   सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कपुणे चे महासंचालक डॉ.राजेंद्र जगदाळेतसेच सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग  कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

Featured post

Lakshvedhi