Saturday, 27 January 2024

तीन महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

  तीन महिलांना

 जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

 

            नवी दिल्ली, 25 : देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार  2023 साठी मान्यता प्रदान केली असूनयात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे.

            प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदकसात उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 पराक्रमी व्यक्तींना जीवन रक्षा पदकाचा समावेश आहे. यात तीन पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येतील.

            जीवन रक्षा पदकासाठी राज्यातून आदिका राजाराम पाटीलप्रियंका भारत काळे व सोनाली सुनील बालोडे या तीन महिलांची निवड झाली आहे.

            एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदकउत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तर देखील दिले जातात.

            या पुरस्काराचे स्वरुप  (पदककेंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) पुरस्कार विजेत्याला केंद्रीय मंत्रालय/ संस्था/ राज्य सरकारद्वारे प्रदान केले जातात.

000000000


बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

 बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला  बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबवून उन्नतीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोडग्रामविकास  विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शंकर पवार, गोद्री कुंभ प्रमुखराज्य धर्मादाय समिती प्रमुख रामेश्वर नाईकअरूण चव्हाण, संत गोपाल चैतन्य बाबाजी पालकबीर दास महाराज, श्याम चैतन्य महाराजसुंदर महाजनदिनेश चव्हाण उपसचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभागश्रीकृष्ण पवार उपसचिव,सहकार, पणनपंडित जाधव उपसचिव ग्रामविकास आदी सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी गोद्री येथील कुंभ मेळ्यास वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने आज समाजातील वेगवेगळ्या समस्यांबाबतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            समाजातील वेगवेगळ्या भागातील तांड्याला जोडण्यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला गती देण्याबरोबरच तांड्याला महसुली गाव म्हणून मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.

बंजारा -लबाना समाजातील मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मध्यप्रदेशआणि उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

            तसेच समाजातील कला परंपरासंस्कृती आदी बाबींचे जतन करण्यासाठी विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

000

निवडणूक गीत मतदारांना प्रेरित करेल -मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे राज्याच्या पहिल्या निवडणूक गीताचे लोकार्पण

 निवडणूक गीत मतदारांना प्रेरित करेल

-मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

राज्याच्या पहिल्या निवडणूक गीताचे लोकार्पण

 

            मुंबईदि. २५ : राज्यातील मतदारांना 'ये पुढे मतदान करअसे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक गीताचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. हे गीत राज्यातील मतदारांना आपला मताधिकार बजावण्यासाठी प्रेरित करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज मुंबईतील जयहिंद महाविद्यालात झालेल्या कार्यक्रमात या गीताचे आणि त्याच्या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन झाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्वीप’ उपक्रमाअंतर्गत या गीताची निर्मिती केली आहे. गीतकार स्वानंद किरकिरे अध्यक्षस्थानी होते. अभिनेते सुबोध भावेसंगीतकार मिलिंद इंगळेगायक राहुल सक्सेनागायिका वैशाली माडेरॅपर जे. सुबोध आणि कस्तुरी आफळे उपस्थित होते.

            २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आगोयाची स्थापना झाली. यानिमित्त सन  २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तरुण मतदारांना प्रोत्साहित करून त्यांचा सत्कार करून आणि मतदार नोंदणी वाढवून निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. याचा उपयोग मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि निवडणूक प्रक्रियेत माहितीपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील केला जातो. हा दिवस राष्ट्रीयराज्यजिल्हामतदारसंघ आणि मतदान केंद्रस्तरावर साजरा केला जातोअशी माहिती यावेळी देण्यात आली.

            आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे देशातील लोकशाही व्यवस्थेमुळेच आहे. ते टिकावे यासाठी मतदारांनी आपला मताधिकार बजावून या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवेअसे आवाहन श्री. किरकिरे यांनी केले. देशात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये मताधिकाराचा योग्य वापर करू याज्यांनी अजूनही मतदार म्हणून नोंदणी केलेली नाहीत्यांनाही नोंदणी करायला लाऊ याअसे अभिनेते श्री. भावे यांनी सांगितले. ते म्हणाले कीदेशाचे सामान्य नागरिक हेच देशाचे खरे मालक आहेत. त्यांनी मतदानाच्या दिवशी आपला मताधिकार बजावायला हवा.

            या गीताच्या लोकार्पणासोबतच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मतदारांना शपथही देण्यात आली. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मतदारांना दिलेल्या संदेशाची ध्वनीचित्रफितही दाखविण्यात आली.

            प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना आणि गायिका वैशाली माडे यांनी या गीताला आवाज दिला आहे. गीतकार समीर सामंत यांनी ते लिहिले आहे. संगीतकार मिलिंद इंगळे यांनी या गीताला संगीत दिले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप’ उपक्रमातील कर्मचारी निलीश कुंजीर यांनी या गीताच्या

            ध्वनिचित्रफितीचे दिग्दर्शन केले आहे. या निवडणूक गीतासाठी भवदीप जयपूरवाले यांनी संगीत संयोजकाचीसुरेल इंगळे यांनी संगीत तंत्र संयोजकाची आणि यश पांडे यांनी ताल तंत्र संयोजकाची जबाबदारी  सांभाळली.

नागरिकांनी कर्तव्याने आपला मताधिकार बजावावाकोणतीही प्रलोभने किंवा दबावाला बळी न पडता आपले मत द्यावेअसा संदेश या निवडणूक गीतामधून दिला आहे. हे गीत लोकशाहीतील सामाजिक धार्मिक वैविध्यतेचं प्रतिनिधीत्व करते. वर्णभेद आणि लिंगभेदाला दूर सारून लोकशाहीतील सर्वसमावेशकतेला चालना देते आणि त्यासोबतच मतदानाचा अधिकार हा समाजातल्या प्रत्येक घटकाला एकसमानतेच्या पातवळीवर आणणारा अधिकार असल्याचा संदेश या गीताच्या माध्यमातून देण्यात आला आाहे. या निवडणूक गीताला रॅप साँगचीही जोड दिली आहे. त्यातून युवकांना लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्यासाठीआणि त्यात स्वतःचा सक्रिय सहभाग देण्यासाठी प्रोत्साहन मिळेलअसा विश्वास यावेळी करण्यात आला. रॅपर जे. सुबोध आणि कस्तुरी आफळे यांनी या गीतातील रॅप साँगचा भाग गायिला आहे. या गीतासाठी जितेश कदम यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

एहसास, शायरी आणि गजलचा कार्यक्रम संपन्न

    एहसासशायरी आणि गजलचा कार्यक्रम संपन्न

 



            मुंबई दि. 27 : अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया येथे एहसासशायरीगजलसुफी या कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी  अल्पसंख्याक विकास  मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 

            यावेळी आमदार रईस शेखअल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व राज्यगीतच्या गायनाने करण्यात आली. प्रधान आय. ए. कुंदन सचिव यांनी  मंत्री श्री. सत्तार यांचा सत्कार केला. तसेच श्री. सत्तार यांनी इतर मान्यवरांचा  सत्कार यावेळी केला. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांनी त्यांचे कलेचे सादरीकरण केले. उर्दू संस्कृतीसाहित्य आणि वारसा असा एक अप्रतिम मिलाप पाहण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या  संख्येने नागरिक उपस्थित होते.

000

 

मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण

 मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण 

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत. या संमेलनात खान्देशी संस्कृतीचे दर्शन घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


दि.३ रोजी दुपारी २.३० ते ४.३० वा. सभामंडप ३ - बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात लोककला / लोकसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे संयोजन बापू हटकर व रमेश धनगर करणार आहेत. या कार्यक्रमात खान्देशी वीरनृत्य, बंजारा नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासींची पावरी नृत्य, नंदीबैल नृत्य, डोगऱ्यादेव वळीत  नृत्यांबरोबरच खान्देशी वन्हे, तमाशा बतावणी, टिंगरी वाला, गोंधळ, भारूड, शाहिरी, संबळ, पावरी,  खान्देशातील लोकगीते ज्यात आखाजी, कानबाई, गौराई, लग्नाची गाणी आदी लोकगीते देखील सादर होणार आहेत.


यात 'कर्ण जन्मानी कहानी' हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण हे खास आकर्षण राहणार आहे. या सर्व लोककला प्रकारातून जवळपास दीडशे लोककलाकारांना संधी मिळणार आहे, असे संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ अविनाश जोशी, आयोजन समितीचे रमेश पवार, संयोजक बापूसाहेब हटकर, रमेश धनगर, वसुंधरा लांडगे यांनी सांगितले.


खान्देशी संस्कृतीचे दर्शन

याच दिवशी सभामंडप क्र. २  कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० वा खान्देशी बोलीभाषांवर परिसंवाद  आयोजित करण्यात आला असून यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावीत (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) हे सहभागी होतील. रात्री रात्री ८ ते १० वा. सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित "अरे संसार संसार" हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात 'परिवर्तन' गृपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पत्रकारांसाठी असलेला विशेष व्हॅट्सऍप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://chat.whatsapp.com/HUWA36CWSyWFmwFTM9AEvH


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7


बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

 बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला  बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबवून उन्नतीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोडग्रामविकास  विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शंकर पवार, गोद्री कुंभ प्रमुखराज्य धर्मादाय समिती प्रमुख रामेश्वर नाईकअरूण चव्हाण, संत गोपाल चैतन्य बाबाजी पालकबीर दास महाराज, श्याम चैतन्य महाराजसुंदर महाजनदिनेश चव्हाण उपसचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभागश्रीकृष्ण पवार उपसचिव,सहकार, पणनपंडित जाधव उपसचिव ग्रामविकास आदी सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी गोद्री येथील कुंभ मेळ्यास वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने आज समाजातील वेगवेगळ्या समस्यांबाबतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            समाजातील वेगवेगळ्या भागातील तांड्याला जोडण्यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला गती देण्याबरोबरच तांड्याला महसुली गाव म्हणून मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.

बंजारा -लबाना समाजातील मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मध्यप्रदेशआणि उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

            तसेच समाजातील कला परंपरासंस्कृती आदी बाबींचे जतन करण्यासाठी विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

बृहन्मुंबई हद्दीत 9 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 बृहन्मुंबई हद्दीत 9 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 

            मुंबईदि. 25 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमीत केले आहे.

           या आदेशानुसार शस्त्रेअग्निशस्त्रेबॅटनतलवारीभालेदंडुकेविना परवाना बंदुकाचाकूकाठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारिरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकतेअशी हत्यारे बाळगणेस्फोटके वाहून नेणेप्रेतआकृतीपुतळे यांचे प्रदर्शनसार्वजनिक टिकाकरण उच्चारगाणी गाणेसंगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

         कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेतनोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखाचौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहेअसे पोलिस उपआयुक्त, (अभियान) विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

००

Featured post

Lakshvedhi