Saturday, 27 January 2024

बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

 बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शासन कटिबध्द

मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला  बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना राबवून उन्नतीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोडग्रामविकास  विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शंकर पवार, गोद्री कुंभ प्रमुखराज्य धर्मादाय समिती प्रमुख रामेश्वर नाईकअरूण चव्हाण, संत गोपाल चैतन्य बाबाजी पालकबीर दास महाराज, श्याम चैतन्य महाराजसुंदर महाजनदिनेश चव्हाण उपसचिव इतर मागास व बहुजन कल्याण विभागश्रीकृष्ण पवार उपसचिव,सहकार, पणनपंडित जाधव उपसचिव ग्रामविकास आदी सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी गोद्री येथील कुंभ मेळ्यास वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने आज समाजातील वेगवेगळ्या समस्यांबाबतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

            समाजातील वेगवेगळ्या भागातील तांड्याला जोडण्यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेला गती देण्याबरोबरच तांड्याला महसुली गाव म्हणून मान्यता देण्याबाबत चर्चा झाली.

बंजारा -लबाना समाजातील मोठ्या प्रमाणावर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मध्यप्रदेशआणि उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

            तसेच समाजातील कला परंपरासंस्कृती आदी बाबींचे जतन करण्यासाठी विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi