Friday, 26 January 2024

मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रण, महिला सक्षमीकरणाची माहिती

 मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रणमहिला सक्षमीकरणाची माहिती

            मुंबई दिनांक 26: आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणाचैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आज झालेल्या चर्चेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधागृहनिर्माण विकास सुरु आहे तो देखील चकित करणारा आहे असे ते म्हणाले. 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत वर्षा या शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्र अधिकारी व प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आज दुपारी एक बैठक झाली.

            प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी डेनिस फ्रान्सिस यांना गणपतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या बैठकीस संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंभोजस्टीव्हन फिलिपकैशा मॅकग्वेरेस्नेहा दुबेस्टीव्हन फिलिपशॉम्बी शार्पहम्मा मरियम खान उपस्थित होते. तर राज्य शासनातर्फे मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीराजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकरमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहपरराष्ट्र मंत्रालयाचे राजेश गावंडेमनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे हे देखील बैठकीत सहभागी झाले होते.

            यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या त्रिनिदाद आणि टोबैगो देशाच्या भारताशी पूर्वापार असलेल्या संबंधाला उजळणी दिली. ते म्हणाले कीत्रिनिदाद असेंब्लीमध्ये असलेले सभापतींचे आसन हे भारताने भेट म्हणून दिलेले असून या आसनाच्या साक्षीने अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत.

मुंबईत चैतन्य

            मी भूगोलाचा विद्यार्थी असून भारत हा माझा अभ्यासाचा विषय होता असे सांगून डेनिस फ्रान्सिस यांनी भारतात मुंबईचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले कीमुंबईत चित्रपटसृष्टी आहे आणि मी देखील काही चित्रपट पहिले आहेतमात्र यावेळी मुंबईत ज्या प्रमाणात गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत ते चकित करण्यासारखे आहे. महाराष्ट्र हे देशातले एक मोठे औद्योगीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे मुंबईचे एक वेगळे महत्व आहे असेही ते म्हणाले.

            प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित असतांना विशेषत: तरुण मुलेमुलीलहान मुलं यांच्यामध्ये असलेली देशप्रेमाची झलक आणि त्यांच्यातले चैतन्य पाहून मी प्रभावित झालो असे सांगून ते म्हणाले कीआज शांतता आणि सुरक्षेचे जगात महत्त्व असून सध्याच्या अस्थिर अशा जागतिक वातावरणात भारताची भूमिका मोठी आणि निर्णायक आहे. मी महासभेचा अध्यक्ष म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांत विश्वास वाढीस लागावा आणि विविध प्रश्नांवर तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतोयत्यात महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा भारतासारखा देश मला महत्त्वाचा  वाटतो.

प्रदूषणावर मातमहिला सक्षमीकरण – मुख्यमंत्र्यांनी मांडले मुद्दे

            प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले कीसंयुक्त राष्ट्राच्या दृष्टीने प्राधान्याचा असलेला हवामान बदलाचा विषय महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा आहे. आमचे शासन पर्यावरण पूरक विकासावर भर देणारे असून शाश्वत विकास हेच ध्येय आहे. प्लास्टिकवर बंदीबांबू लागवडग्रीन हायड्रोजन धोरण तसेच मुंबईत सुरु असलेली डीप क्लिनिंग मोहीम अशी पाउले टाकून पर्यावरण संरक्षण करीत आहोत असे ते म्हणाले. महिलांच्या बचत गटांना अधिक सक्षम करीत आहोत तसेच लेक लाडकीसारख्या योजनेतून मुलींचे कल्याण करण्यात येत आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

वडापावजिलेबीचा मेन्यू

            आजच्या या बैठकीसाठी चहापानाबरोबर खास मुंबईचा वडा पाव आणि जिलेबी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना या पदार्थांच्या लोकप्रियतेविषयी सांगितले व आग्रह केला. संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर प्रतिनिधी यांनी या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि याविषयीही जाणून घेतले.

प्रारंभी राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.

000

मुंबईतले चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला विकासाचा वेग चकित करणारा

 मुंबईतले चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला

विकासाचा वेग चकित करणारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठकीत संयुक्त राष्ट्र संघ महासभा

अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी व्यक्त केली भावना

आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्ट फोन

 आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्ट फोन

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती विनंती

            मुंबई दि. 26: आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून स्मार्ट फोन मिळाला. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते. 

            मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती देतांना, अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून त्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन्सचे वितरण झाले तर एक बहुमान मिळेल असे सांगितले. डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लगेचच समिती कक्षात बोलावून घेऊन फोन्सचे वाटप करण्यात आले.

            संयुक्त राष्ट्रसारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते हा स्मार्ट फोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला तसेच आनंदही झाला. डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली तसेच कार्यक्रमानंतर या सेविकांच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्धल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

            यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनस्वी मोहन काते, कविता बाबु व्हटकर, संगिता कुकरेती, शीतल लोखंडे, प्रेमा घाटगे, रजनी घाडगे,सुजाता जावळे, सीमा शिंदे यांना स्मार्ट फोन्स देण्यात आले.

1 लाख 14 हजार 974 स्मार्ट फोन देणार

            पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24 मध्ये 110486 अंगणवाडी सेविका, 3899 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14 हजार 974 स्मार्ट फोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. Take Home Ration Software & Migration Tracking Software तसेच राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम स्मार्ट फोनद्वारे लागू करता येतील. पोषण ट्रॅकर अॅप्लीकेशनद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी स्मार्ट मोबाईल फोनद्वारे रियल- टाईम मॉनिटरींग पध्दतीने करण्यात येणार आहे.

            यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी स्मार्ट फोनद्वारे घेण्यात येणार असून संनियंत्रणासाठी केंद्र शासनामार्फत डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रारंभी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल (ICDS) यांनी या

 उपक्रमाची माहिती दिली.

मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट

 मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट

-   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        मुंबई,दि.२५ : मुंबई शहराच्या सर्व अद्वितीय गुणांचं दर्शन 'मुंबई फेस्टिव्हल २०२४च्या निमित्ताने घडेल. मुंबईकरांमध्ये जगण्याचे 'स्पिरीटनिर्माण करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचा होणारा सत्कार सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल 2024आयोजित केला  आहे आहे. या महोत्सवामध्ये  गेट वे ऑफ इंडिया येथे 'मुंबई वॉकया कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजनमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रामुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरपर्यटन सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील हे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबई काळासोबत धावणारे शहर आहे. प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे कोळीवाडेऐतिहासिक किल्लेजुनी चाळसंस्कृतीब्रिटिशकालीन इमारतींचे वास्तूवैभवसर्वांची स्वप्ने पूर्ण करणारेजीवाला जीव देणाऱ्यांचे हे शहर आहे. मुंबईच्या हवेत संकटांशी लढण्याचे सामर्थ्य आहे. मुंबईकरांमध्ये जगण्याचं 'स्पिरीटआहे. सर्वसामान्य नागरिकमाथाडी कामगारडब्बेवालेउद्योजक ते सिने तारे - तारका असे सर्वांचे शहर आहे.

        मुंबई पोलीस आयुक्त श्री. फणसळकर म्हणाले कीपोलिस दल २४ तास सेवेत असते. जबाबदारी सोबतच  हे काम करणे म्हणजे भाग्याचे आहे.

           'मुंबई वॉकहे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो डबेवालापोलिस हवालदारबेस्ट बस चालक आणि वाहक तसेच सफाई कामगारसफाई कर्मचारी  यांचा सत्कार  करण्यात आला. गायक अवधुत गुप्तेअमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम पार पडला.

            इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज चे प्रमोशन अभिनेता विवेक ओबेरॉयसिद्धार्थ मल्होत्रा,अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी  यावेळी केले.

            या कार्यक्रमाला अभिनेता समीर कोचरपर्यटन विभागाच्या सदिच्छा दूत नवेली देशमुख, अभिनेता चंकी पांडेकबीर बेदीचित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेते पंकज त्रिपाठीसुप्रसिद्ध शेफ संजीव कुमार  या सर्वांनी 'मुंबई वॉकमध्ये सहभाग घेतला.

भाडेकरूंच्या सर्व तपशिलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी

 भाडेकरूंच्या सर्व तपशिलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी

पोलीस उपआयुक्त (अभियान) यांचे आवाहन

             मुंबईदि. 25 : समाजविरोधी घटकांकडून सार्वजनिक शांततामानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खासगीसार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. भाडेकरूच्या वेशात दहशतवादीसमाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्येदंगलीभांडणे आदी घडू नयेत म्हणून घरमालकभाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घरमालमत्ताहॉटेललॉजगेस्ट हाऊसमुसाफीर खाना  हा व्यवसाय करणाऱ्या  जागा मालकाने कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे. अशा भाडेकरूंचे सर्व तपशील त्वरित www.mumbaipolice.gov.in/TenantForm?ps_id=0 या सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंद करावीअसे आवाहन पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी एका आदेशान्वये केले आहे. 

            भाडेकरू व्यक्ती परदेशी असेलतर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्याचे नावराष्ट्रीयत्वपासपोर्ट तपशीलठिकाणजारी करण्याची तारीखवैधता सादर करावी. व्हिसाबाबत व्हिसा क्रमांकश्रेणीठिकाण आणि जारी करण्याची तारीखवैधतानोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहेअसेही आदेशात स्पष्ट केले आहे.  हा आदेश 8 मार्च 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे.

      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

                                                            ००००

निलेश तायडे/विसंअ

एअर मिसाईल, पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

 एअर मिसाईलपॅराग्लाइडर्समायक्रोलाइट

एअर क्राफ्टड्रोनच्या वापरावर बंदी

            मुंबईदि. 25 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक (जसे एअर मिसाइलपॅराग्लाइडर्सरिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्टड्रोनपॅरा मोटर्सहॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून) च्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहेअसे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाहीसामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाहीअति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाहीसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेतअसेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

      या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक,

 महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक,

18 पोलीस जवानांना शौर्य पदके,

40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकगृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी सात पदक तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके जाहीर

अग्निशमन सेवेसाठी महाराष्ट्रातील सहा अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवेसाठी पदक जाहीर

• प्रजासत्ताक दिन-2024 निमित्त पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील 1132 जवानांना शौर्य/सेवा पदके जाहीर

            नवी दिल्ली, 25: भरताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील  एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठीसहा पदके अग्निशमन सेवेसाठीसात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिका-यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

            केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण 78 पोलिस अधिका-यांना तर सहा अग्निशमन विभागातील सहा अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाला आहे.

            केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यातदोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिका-यांना पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’  (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असूनयामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.

            यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतरप्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत.

            विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची  संपूर्ण पदक व्यवस्था  तर्कसंगत करण्यासह त्यात  परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्यानेया अनुषंगाने सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक दल  आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून  चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)

शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली  आहेत.

पदक प्राप्त महाराष्ट्रातील अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे:

प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी पुरस्‍कारार्थींची यादी- 2024

1.         श्री संकेत सतीश गोसावीउपविभागीय पोलीस अधिकारी.

2.         श्री कमलेश निखेल नैतामनाईक पोलीस हवालदार

3.         श्री शंकर पोचम बचलवार,नाईक पोलीस हवालदार

4.        श्री मुन्शी मासा मडावी ,नाईक पोलीस हवालदार

5.        श्री सूरज देविदास चौधरीपोलीस हवालदार

6.         श्री सोमय विनायक मुंडेभारतीय पोलीस सेवा (IPS) अतिरिक्त पोलिस अधीक्षक (SP)

7.        श्री मोहन लच्छू उसेंडीहेडकॉन्सटेबल

8.        श्री देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम,नाईक पोलीस हवालदार

9.         श्री संजय वट्टे वाचामीनाईक पोलीस हवालदार

10.       श्री विनोद मोतीराम मडावीनाईक पोलीस हवालदार 

11.       श्री गुरुदेव महारुराम धुर्वेनाईक पोलीस हवालदार

12.       श्री दुर्गेश देविदास मेश्रामनाईक पोलीस हवालदार

13.       श्री हिराजी पितांबर नेवारेपोलीस हवालदार

14.      श्री ज्योतिराम बापू वेलाडीपोलीस हवालदार

15.       श्री माधव कोरके मडावीनाईक पोलीस हवालदार 

16.       श्री जीवन बुधाजी नरोटे,नाईक पोलीस हवालदार 

17.      श्री विजय बाबूराव वड्डेटवारपोलीस हवालदार 

18.       श्री कैलास श्रावण गेडामपोलीस हवालदार

विशिष्ट सेवा (PSM) प्रजासत्ताक दिन 2024 साठी राष्ट्रपती पदक

1.         श्री निकेत रमेशकुमार कौशिकअतिरिक्त पोलीस महासंचालक.

2.         श्री मधुकर पांडेपोलिस आयुक्तमीरा भाईंदर वसई विरार.

3.         श्री दिलीप रघुनाथ सावंतविशेष पोलीस महानिरीक्षक .

4.        श्री मधुकर शिवाजी कडपोलीस निरीक्षक.

 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) पोलीस सेवा

1.         श्री सत्य नारायण इंद्रजराम चौधरीसह पोलीस आयुक्त (L&O).

2.         श्री संजय भीमराव पाटीलअतिरिक्त पोलीस आयुक्त.

3.         श्री दीपक श्रीमंत निकमसहाय्यक पोलीस आयुक्त.

4.        श्रीमती राधिका सुनील फडकेपोलीस उपअधीक्षक (गृह).

5.        श्री प्रदीप रामचंद्र वारंगपोलीस निरीक्षक.

6.         श्री सुनील रामदास लाहिगुडेपोलीस उपअधीक्षक.

7.        श्री विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाडउपविभागीय पोलीस अधिकारी .

8.        श्री माणिक विठ्ठलराव बेद्रेपोलीस निरीक्षक.

9.         श्री योगेश मारुती चव्हाणपोलीस निरीक्षक.

10.       श्री संजय राजाराम मोहितेपोलीस निरीक्षक.

11.       श्री सुरेश दिनकर कदमपोलीस निरीक्षक.

12.       श्री रणवीर प्रकाश बायसपोलीस निरीक्षक.

13.       श्री वसंतराव दादासो बाबरपोलीस निरीक्षक.

14.      श्री. जयंत वासुदेवराव राऊतपोलीस निरीक्षक.

15.       श्री महेशकुमार नवलसिंग ठाकूरपोलीस निरीक्षक.

16.       श्री सुनील भिवाजी दोरगेपोलीस निरीक्षक.

17.      श्री सचिन राजाराम गावसपोलीस निरीक्षक.

18.       श्री मिलिंद यशवंत बुचकेपोलीस बिनतारी निरिक्षक.

19.       श्री सुशीलकुमार सुरेशराव झोडगेकरपोलीस उपनिरीक्षक.

20.       श्री हरिश्चंद्र विठोबा जगदाळेपोलीस उपनिरीक्षक.

21.       श्री सुहास सखाराम मिसाळपोलीस उपनिरीक्षक.

22.       श्री किशोर शांताराम नलावडेपोलीस उपनिरीक्षक.

23.       श्री विनय राजाराम देवरेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

24.      श्री राजेंद्र श्रीरंग शिरतोडेउपविभागीय पोलीस अधिकारी.

25.      श्री उत्तम राजाराम सोनवणेपोलीस उपनिरीक्षक.

26.      श्री किशोर राजाराम सुर्वेपोलीस निरीक्षक.

27.      श्री प्रकाश महादेव परबपोलीस उपनिरीक्षक.

28.      श्री सदाशिव आत्माराम साटमपोलीस उपनिरीक्षक.

29.       श्री अशोक लक्ष्मण काकडसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

30.       श्री प्रमोद रामभाऊ आहेरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

31.       श्री राजेंद्रभाऊ घाडीगावकरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

32.       श्री दिलीप शिवाजी तडाखेपोलीस निरीक्षक.

33.       श्री नंदू रामभाऊ उगलेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

34.      श्री नितीन विश्वनाथ संधानपोलीस हेड कॉन्स्टेबल.

35.      श्री संदीप अर्जुन हिवाळकरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

36.      श्री सुनील हिंदुराव देटकेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

37.      श्री शाबासखान दिलावरखान पठाणसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

38.      श्रीमती सीमा अप्पा डोंगरीटोटमहिला  हेड  कॉन्स्टेबल.

39.       श्री विजय भास्कर पाटीलपोलीस हेड कॉन्स्टेबल.

40.      श्री देवाजी कोट्टूजी कोवासेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

अग्निशमन सेवा

1. श्री अनिल वसंत परबउपमुख्य अग्निशमन अधिकारी.

2.श्री हरिश्चंद्र रघु शेट्टीउपमुख्य अग्निशमन अधिकारी.

3.श्री देवेंद्र शिवाजी पाटीलविभागीय अग्निशमन अधिकारी .

4.श्री. राजाराम निवृत्ती कुदळेउप अधिकारी.

5.श्री किशोर जयराम म्हात्रेलिडिंग फायरमनमहाराष्ट्र.

6.श्री मुरलीधर अनाजी आंधळेलिडिंग फायरमनमहाराष्ट्र.

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण

1.डॉ. रश्मी प्रकाशचंद्र करंदीकरवरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशासन आणि धोरण)

2.श्री संजय यशवंत जाधवनागरी संरक्षण अतिरिक्त नियंत्रकबृहन्मुंबई

3.श्रीमती राजेश्वरी गंगाधर कोरीकमांडंटवरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण)

4.श्री रवींद्र प्रभाकर चरडेप्लाटून कमांडर

5.श्री अरुण तेजराव परिहरकेंद्र कमांडर

6.श्री अमित शंकरराव तिमांडेहोम गार्ड सार्जंट

7.श्री योगेश एकनाथ जाधवहोम गार्ड

सुधारात्मक सेवा

1. श्री रुक्माजी भुमन्ना नरोडजेलर ग्रुप I

2. श्री सुनील यशवंत पाटीलजेलर ग्रुप I

3. श्री नामदेव संभाजी भोसलेहवालदार

4. श्री संतोष रामनाथ जगदाळेहवालदार

5. श्री नवनाथ सोपान भोसलेहवालदार

6. श्री बळिराम पर्वत पाटीलसुभेदार

7. श्री सतीश बापूराव गुंगेसुभेदार

8. श्री सूर्यकांत पांडुरंग पाटीलहवालदार

9. श्री विठ्ठल श्रीराम उगलेहवालदार

००००

Featured post

Lakshvedhi