Friday, 26 January 2024

मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट

 मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट

-   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        मुंबई,दि.२५ : मुंबई शहराच्या सर्व अद्वितीय गुणांचं दर्शन 'मुंबई फेस्टिव्हल २०२४च्या निमित्ताने घडेल. मुंबईकरांमध्ये जगण्याचे 'स्पिरीटनिर्माण करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचा होणारा सत्कार सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल 2024आयोजित केला  आहे आहे. या महोत्सवामध्ये  गेट वे ऑफ इंडिया येथे 'मुंबई वॉकया कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री गिरीश महाजनमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रामुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरपर्यटन सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील हे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबई काळासोबत धावणारे शहर आहे. प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारे कोळीवाडेऐतिहासिक किल्लेजुनी चाळसंस्कृतीब्रिटिशकालीन इमारतींचे वास्तूवैभवसर्वांची स्वप्ने पूर्ण करणारेजीवाला जीव देणाऱ्यांचे हे शहर आहे. मुंबईच्या हवेत संकटांशी लढण्याचे सामर्थ्य आहे. मुंबईकरांमध्ये जगण्याचं 'स्पिरीटआहे. सर्वसामान्य नागरिकमाथाडी कामगारडब्बेवालेउद्योजक ते सिने तारे - तारका असे सर्वांचे शहर आहे.

        मुंबई पोलीस आयुक्त श्री. फणसळकर म्हणाले कीपोलिस दल २४ तास सेवेत असते. जबाबदारी सोबतच  हे काम करणे म्हणजे भाग्याचे आहे.

           'मुंबई वॉकहे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो डबेवालापोलिस हवालदारबेस्ट बस चालक आणि वाहक तसेच सफाई कामगारसफाई कर्मचारी  यांचा सत्कार  करण्यात आला. गायक अवधुत गुप्तेअमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम पार पडला.

            इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीज चे प्रमोशन अभिनेता विवेक ओबेरॉयसिद्धार्थ मल्होत्रा,अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी  यावेळी केले.

            या कार्यक्रमाला अभिनेता समीर कोचरपर्यटन विभागाच्या सदिच्छा दूत नवेली देशमुख, अभिनेता चंकी पांडेकबीर बेदीचित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीअभिनेते पंकज त्रिपाठीसुप्रसिद्ध शेफ संजीव कुमार  या सर्वांनी 'मुंबई वॉकमध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi