Thursday, 25 January 2024

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कामे तातडीने पूर्ण करावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा

 जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कामे तातडीने पूर्ण करावी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा

 

            मुंबई, दि. 24 : ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे),मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीजलयुक्त शिवार अभियानासाठी  निधीची कमतरता  पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेलत्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूरभंडारासोलापूरसांगलीपुणे या 5 जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा  वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत.

             जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेताराज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ चा दुसरा टप्पा  सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहेयामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

             गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करूनशेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल.  या वर्षातआत्तापर्यंत565 तलावातून  सुमारे 83.39 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहेज्यामुळे जवळपास 6000 लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी  शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही  उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

             कृषी मंत्री श्री. मुंडे आणि श्री. मुथा यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या. त्यांचीही कृषी व जलसंधारण विभागाने दखल घ्यावी असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

             यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 च्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादरीकरणाव्दारे सादर केला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमारग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीकृषी आयुक्त प्रवीण गेडाम,मृद व जलसंधारण आयुक्त प्रकाश खपलेकोकण विभागीय आयुक्त डॉ. ‌महेद्र कल्याणकर, श्री. मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच  विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

रोजगार संधी उपलब्धतेसाठी लातूर येथे लवकरच ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन

 रोजगार संधी उपलब्धतेसाठी लातूर येथे

 लवकरच ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन

- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

            मुंबई दि. २४ :  मराठवाड्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच लातूर येथे ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घेण्यात येईलअसे महसूलपशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

            लातूर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबत महसूल मंत्री श्री. विखे-पाटील आणि कौशल्यरोजगारउद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस माजी कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकरकौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की‘एज्युकेशनल हब’ म्हणून मराठवाड्यातील लातूर जिल्हा ओळखला जाते. येथील तरुणांना शिक्षणासोबतच रोजगार मिळावायासाठी शासन प्रयत्नशील आहे.  त्यामुळे नुकताच नागपूर येथे नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्याप्रमाणे लातूर येथे असा नमो महारोजगार मेळावा घेऊन मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. भविष्यात कौशल्य विकासातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने कौशल्य विकासआयटीआयडीआयसी व व्यवसाय शिक्षण विभागाने यापुढे एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

            लातूर येथील महारोजगार मेळाव्यास निधी उपलब्ध करून देणे आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

०००००

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन 2022-23 चे जिल्हास्तरीय निकाल जाहीर

 भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन 2022-23 चे जिल्हास्तरीय निकाल जाहीर

 

    मुंबई, दि. 24 : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा  स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे.   

      लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणेजलसुरक्षा आराखडा तयार करणे  त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणेराज्य  केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणेयासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

      भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत

 त्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत

- क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबई२५:- आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश क्रीडायुवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले. 

            उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री श्री. बनसोडे यांनी आढावा घेतलात्यावेळी ते बोलत होते. बैठकीला बंदरे विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैनराज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मातसेच आमदार श्री. दळवीकिरण सामंत उपस्थित होते.

            भगवती क्रूझ टर्मिनल विकास प्रस्तावास  सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून प्रस्ताव नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाल्यामुळे वित्त विभागाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. राजीवाडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामाबाबत मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर बंदर जोड रस्तेजेट्टी दुरुस्तीकुरणवाडी जेट्टी ते मांडवा रस्ता तयार करणे आदी कामांच्या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन यांनी सांगितले.

रत्नागिरीत अद्यावत क्रीडा संकुल उभारावे

            रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे एमआयडीसी येथे जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा निर्मितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यात अद्ययावत व दर्जेदार  क्रीडा संकुल उभारावे. येथील क्रीडापटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील अशारितीने काम करावेअशा सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 

            संकुलातील उपहारगृहप्रसाधनगृहचेंजिग क्यूबिकल्सकार्यालय इमारतवसतिगृहाचे जोत्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असून त्यावर चार कोटी ६१ लक्ष ९० हजार रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील खुले प्रेक्षागृह४०० मीटर धावनपथप्रेक्षकांसाठी गॅलरीफुटबॉल आर्टिफिशियल टर्फ मैदानड्रेनेज बांधकामइनडोर हॉलमुला मुलींचे वसतिगृहक्रीडा संकुलातील अंतर्गत रस्तेसंरक्षक भिंतमुख्य गेटवॉचमन कॅबिनइत्यादी उर्वरित कामांकरिता २० कोटी १६ लक्ष ३० हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात आले असून पूर्वीचे ७ कोटी ४० लक्ष असे दोन्ही मिळून २७ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या कामास क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी लवकरच वितरित करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            त्याचबरोबर एनसीसी भवन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. यासाठी ६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यावर पंधरा कोटी खर्च झालेला आहे. उर्वरित कामे करण्यासाठी  निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. 

००००

राजभवन येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस' साजरा 'प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू

 राजभवन येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा

'प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू श्री रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू श्री राम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहेतअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. उभय राज्यातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपालांनी सांगितले.   

            राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत यावर्षी राजभवनात 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आला.

            महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्षे काशी हे अध्ययन केंद्र होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते. उत्तर प्रदेशाने देशाला प्रधानमंत्री दिले आहेत. तसेच कलासंस्कृतीसाहित्यरंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व दिले आहेत.

            देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल. त्यामुळे प्रधानमंत्र्यांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे, असे नमूद करून, 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी तसेच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पाहावे असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

            आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केली. धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने लोक भाषाबोलीसंस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेलाअसे सांगून 'एक भारत श्रेष्ठ भारतहा केवळ शासकीय कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे, असे राज्यपालांनी सांगितले.    

            कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकरकौशल्यरोजगारउद्यमशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसेच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थीशिक्षक व कलाकार उपस्थित होते.

            यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथक नृत्यकजरीब्रज की होली व रामलीला सादर केले. तेजल चौधरी हिने यावेळी कथक नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिकसांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखविण्यात आला. 

उदगीर, जळकोट ‘एमआयडीसी’ च्या कामाला गती द्यावी

 उदगीर, जळकोट ‘एमआयडीसी’ च्या कामाला गती द्यावी

- क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

            मुंबई24 :- लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमिनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन्ही ठिकाणी ‘एमआयडीसी’ निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी, असे निर्देश क्रीडायुवक कल्याण व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            उदगीर ‘एमआयडीसी’ साठी  जागा अंतिम करण्यात आली असून प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती देता येईल. त्याचबरोबर जळकोट येथे ‘एमआयडीसी’ साठी पथकाने पाहणी केली आहे. याठिकाणी ‘एमआयडीसी’ पर्यंतचा मुख्य रस्ता जिल्हा प्रशासन करून देईल. या दोन्ही एमआयडीसी ची कामे तातडीने मार्गी लावावीतअशा सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांना केल्या.

००००

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा

 राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विमानतळांच्या संपूर्ण कामाचा समग्र आढावा

 

            मुंबईदि. 24- राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

सोलापूरकोल्हापूरछत्रपती संभाजीनगरअमरावतीअकोलारत्नागिरीपुरंदरगोंदियागडचिरोलीसह अन्य विमानतळ विकासकामांचा समग्र आढावा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

            बैठकीस अपर मुख्य सचिव (विमान चालन) दीपक कपूरउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            सोलापूर येथील बोरामनी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करावा. होटगी विमानतळ विकासाकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा किंवा सरळ खरेदी पर्यायाची व्यवहार्यता तपासून एका पर्यायाचा उपयोग करीत भूसंपादन पूर्ण करावे. पुरंदर विमानतळ करिता आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन एकदाच करावे. पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये. त्यासाठी अधिग्रहणाचा योग्य आराखडा तयार करावा.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीछत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाकरिता आधी जमीन अधिग्रहण करण्यात यावे. त्यासाठी 600 कोटी रुपये लागणार आहेत. अमरावती विमानतळावर नाइट लँडिंग सुविधांची कामे सुरू आहेतही कामे मार्चपर्यंत पूर्ण करून सुविधा सुरू करावी. अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन या कामाला गती द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोरवी  विमानतळाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे. या ठिकाणी धावपट्टी वाढविण्याला वाव असून त्यानुसार धावपट्टी वाढविण्यात यावी. धुळे येथील विमानतळ धावपट्टीचे पुनर्पृष्ठीकरण पूर्ण करावे. कराड विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण करावे. विमानतळ विकासासाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक बोलवावीअसेही निर्देश त्यांनी दिले.

            यावेळी जळगावगोंदियाबारामतीयवतमाळनांदेडधाराशिवलातूरचीपीशिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेण्यात आला. बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi