Thursday, 25 January 2024

उदगीर, जळकोट ‘एमआयडीसी’ च्या कामाला गती द्यावी

 उदगीर, जळकोट ‘एमआयडीसी’ च्या कामाला गती द्यावी

- क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

            मुंबई24 :- लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमिनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन्ही ठिकाणी ‘एमआयडीसी’ निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी, असे निर्देश क्रीडायुवक कल्याण व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

            उदगीर ‘एमआयडीसी’ साठी  जागा अंतिम करण्यात आली असून प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती देता येईल. त्याचबरोबर जळकोट येथे ‘एमआयडीसी’ साठी पथकाने पाहणी केली आहे. याठिकाणी ‘एमआयडीसी’ पर्यंतचा मुख्य रस्ता जिल्हा प्रशासन करून देईल. या दोन्ही एमआयडीसी ची कामे तातडीने मार्गी लावावीतअशा सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा यांना केल्या.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi