Thursday, 25 January 2024

राजभवन येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस' साजरा 'प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू

 राजभवन येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा

'प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू श्री रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू श्री राम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहेतअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. उभय राज्यातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपालांनी सांगितले.   

            राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत यावर्षी राजभवनात 'उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवससाजरा करण्यात आला.

            महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्षे काशी हे अध्ययन केंद्र होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते. उत्तर प्रदेशाने देशाला प्रधानमंत्री दिले आहेत. तसेच कलासंस्कृतीसाहित्यरंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व दिले आहेत.

            देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल. त्यामुळे प्रधानमंत्र्यांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे, असे नमूद करून, 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी तसेच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पाहावे असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

            आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केली. धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने लोक भाषाबोलीसंस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेलाअसे सांगून 'एक भारत श्रेष्ठ भारतहा केवळ शासकीय कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे, असे राज्यपालांनी सांगितले.    

            कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकरकौशल्यरोजगारउद्यमशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसेच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थीशिक्षक व कलाकार उपस्थित होते.

            यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथक नृत्यकजरीब्रज की होली व रामलीला सादर केले. तेजल चौधरी हिने यावेळी कथक नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिकसांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखविण्यात आला. 

००००


मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो

 मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            सातारा दि. 24 :- मातीचा गंध आपल्याला शेतीकडेआपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतातअशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

            महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यात्रेनिमित्त आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले.

            शेतात औषधी हळद,  स्ट्रॉबेरीआंबेकाजूचिकूबटाटा सफरचंद,  अव्हॅकॅडो अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव शेती, गावाकडची माणसे यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेलाकितीही मोठा झाला, तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल, आपल्या गावाबद्दल,  गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनीआर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावेअसे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत असून जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबूबरोबरच रेशीम,  सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

            कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न  आहे. या खोऱ्यात वासोटा किल्लाउत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. दरेता. महाबळेश्वर या ठिकाणी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त "भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर सादर होणार यंदाचा दिल्लीतील चित्ररथ

 ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त

"भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज"

 या संकल्पनेवर सादर होणार यंदाचा दिल्लीतील चित्ररथ

 

            मुंबईदि. २४: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही सहभागी होणार आहे.

            सन २०२४ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात २८ राज्य व सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित ‘भारत व भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवर विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री शिवराज्याभिषेकाचा ३५० वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचेही चित्ररथाच्या मांडणीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

             छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही  सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आलेले आहेत.

            या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे.  तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकार पथकाच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

000

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उदघाटन

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते

 आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उदघाटन

 

            मुंबईदि. 24 : केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत  0 ते 6 महिने वयोगटातील मुलेगरोदर व स्तनदा माता यांना घरपोच आहार देण्यात येतो. विभागामार्फत आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीचे उद्धाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

            मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            या प्रणाली अंतर्गत लाभार्थ्याना वेळेवर आहार पोचतो का हे तपासता येणार आहे. तसेच आहाराची गुणवत्ता याबाबतही माहिती मिळणार आहे. याचबरोबर घरपोहोच आहार(THR ) ची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहे. तसेच ‘टीएचआर’ कोणत्या अंगणवाडीत किती तारखेला पोचला याबाबत विभागाचे सचिवआयुक्तजिल्हा कार्यक्रम अधिकारी हे ऑनलाईन पाहू शकणार आहेत.

            टीएचआर पुरवठा अंगणवाडी स्तरावर करण्यात आला आहे का नाही याची खात्री करण्यासाठी या प्रणालीमार्फत लाईव्ह ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. टीएचआर उशिरा पोचल्यास किती दिवस उशिरा पोचला, त्याच्या दंडाची परिगणना करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे टीएचआर पुरवठ्याचे मॉनिटरिंग योग्य रितीने करण्यात येणार आहे.

            टीएचआर आहार पुरवठ्याचे चलन मोबाईलवर QR कोडद्वारे स्कॅन करून मागणी करण्यात आलेला टीएचआर विहित वेळेत अंगणवाडीला  पुरवठा झाला का नाही  याची खात्री करता येणार आहे. यामुळे जवळपास70 लाख लाभार्थ्याना विहित वेळेत आहार पुरवठा करण्यास प्रणाली ही उपयुक्त ठरणार आहे

  हे ॲप्लिकेशन अंगणवाडी सेविका त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.awzpact.icdsmh.fsms या लिंक चा वापर करू शकतील.

राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनासह शिकवणुकीवर विद्यार्थी करणार लेखन

 राज्यभरातील शाळांमध्ये महावाचन उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनासह

 शिकवणुकीवर विद्यार्थी करणार लेखन

 

            मुंबईदि. 24 : विद्यार्थ्यांना वाचनाची तसेच लिहिण्याची आवड निर्माण व्हावीत्यासोबतच महान व्यक्तींची एैतिहासिक कामगिरी कळावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि शिकवणुकीवर आधारित लेखन करतीलअशी माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिली आहे.

            राज्य शासनयुनिसेफ आणि रीड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राज्यभरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यावर विद्यार्थी जास्तीत जास्त एका पानाचे लेखन करतील. याबाबत विद्यार्थ्यांनी केलेले लेखन दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इतरांकडून पडताळणी केली जाईल.

वाचन चळवळीची उद्दिष्टे

            वाचनाचे महत्व सांगणे आणि इयत्ता तिसरीपर्यंत प्रत्येक मुलाला कुशलतेने वाचायला शिकविणे. मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसहभागातून कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन व्यापक लोकवाचन चळवळ उभी करणे. मुलांमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे. वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडविणे. रसग्रहण दृष्टी प्राप्त होणाऱ्या कथाकविताकादंबरीनाटके यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे. मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण करणे आदी या चळवळीची उद्दिष्टे आहेत.

00000

पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा तयार होणार एकत्रित पर्यटन आराखडा

 पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा तयार होणार एकत्रित पर्यटन आराखडा

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

·       वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड

·       एकिकृत "वंदे मातरम वनसेवा केंद्रां"ची निर्मिती करणार

            मुंबईदि. 24 : राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावाअसे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे "वनामृत" हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही श्री. मुनगंटीवार यांनी जाहीर केला.

            राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाली. त्यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव  बी. वेणूगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता यांच्यासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पपेंच-बोर व्याघ्र प्रकल्पमेळघाट व्याघ्र प्रकल्पसह्याद्री व्याघ्र प्रकल्पआणि नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकइतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री वन श्री. मुनगंटीवार म्हणाले कीपाचही व्याघ्र प्रकल्पाचा पाच वर्षासाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल कायाचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्याठिकाणी राहीलहे पाहावेअशा सूचना त्यांनी केल्या.

            राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधासेल्फी पॉईंटसची निर्मिती करावी. तेथील परिसरातील गावातील घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवून अधिकाधिक वातावरण निर्मिती करावी. स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेयेथील महिला- युवक यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेलयासाठी प्रयत्न करणेव्याघ्र प्रकल्पाद्वारे निर्मित वस्तू्ंचे योग्य ब्रॅंडिंग होईलत्यामध्ये एकसमानता असेलयाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

            या प्रकल्पातील बांबू झाडांच्या फुलोऱ्याचे व्यवस्थापन करणेबीज साठवणअग्नी संरक्षण या बाबींकडे अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले कीप्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने त्यांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्यूआर कोड तयार करावा. ज्याठिकाणी नदीतलाव आहेततेथे हाऊसबोट सारखी संकल्पना राबवावी.

            पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पात वंदे मातरम वनसेवा केंद्र सुरु करण्यात यावे. ज्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळतेत्याप्रमाणे वन  विभागाच्या योजनांची माहिती आणि सेवा या केंद्रातून सुरु करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. विविध व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. ते त्याच प्रकल्पापुरते मर्यादीत न राहता त्याची अंमलबजावणी इतरही प्रकल्पात करण्यात यावीयासाठी एक समिती नेमून त्याआधारे अभ्यास करुन एका महिन्यात त्यासंबंधी कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            सध्या सर्व व्याघ्र प्रकल्पांना त्यांच्या कामाबद्दल केंद्रीय यंत्रणेने अधिक चांगला शेरा दिला आहे. हा शेरा कायम उत्कृष्ट राहीलयासाठी सर्वांनी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘वनामृत’ हा होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड

            वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंची आता वनामृत या एकाच ब्रॅण्डनेमद्वारे प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. विविध व्याघ्र प्रकल्पात वस्तू / उत्पादन  निर्मित होत असले तरी ते जगभर एकाच नावाने ओळखले जावेयादृष्टीने प्रयत्न करावेतअशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

            यावेळी व्याघ्र प्रकल्पांच्या सर्व क्षेत्रसंचालकांनी सादरीकरण करुन त्याठिकाणी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

000

Wednesday, 24 January 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

  वरदान

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

       शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे, मदतीसाठी मार्गदर्शन, तंत्रज्ञान, अनुदान उपलब्ध करुन देणे यासाठी जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्याने सुरु केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) निवडक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसून येत आहेत. अशा या योजनेची माहिती देणारा हा लेख...       

            जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्याच्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान-अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांची शेती किफायतशीर करण्यासाठी राबविण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात राज्यातील अकोलाअमरावतीछत्रपती संभाजीनगरबीडनांदेडहिंगोलीलातूरधाराशिवपरभणीवर्धावाशीमयवतमाळबुलडाणाजळगाव,  जालना व नाशिक या १६ जिल्ह्यांमधील ५2२० अवर्षणप्रवण गावांचा समावेश असून यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यातील ९३२ खारपाण गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाची मंजूर किंमत रु. 4000 कोटी होती. मात्र प्रकल्पाची यशस्विता व थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांच्या दायित्वाच्या अनुषंगाने रु. 5469 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूरभंडारागोंदियाचंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये रु. ६००० कोटी किंमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली असून गाव निवड समितीच्या बैठकीत प्राप्त निर्देशांनुसार हवामानास अधिक संवेदनशील गावसमूह व त्यामधील गावे यांची निवड करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.

प्रकल्प उद्देशक्षेत्र व व्याप्ती

         प्रकल्प उद्देश : महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या  परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे.

प्रकल्पामध्ये  छत्रपती संभाजीनगर (405)बीड (391)जालना (363)जळगाव (454)लातूर (280)धाराशिव (283)परभणी (275)नांदेड (384)हिंगोली (236)अमरावती (516)अकोला (487)बुलडाणा (428)वाशीम (149)यवतमाळ (302)वर्धा (125) व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका (१४२ गावे) अशा एकूण १६ जिल्ह्यातील  5220 गावे समविष्ट आहेत.

                 प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक व गरजांवर आधारित कार्यपद्धती  गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोकसहभागीय नियोजन करणे. ग्रामपंचायतीच्या उपसमितीकडे (ग्राम कृषी संजीवनी समिती) निर्णय प्रक्रिया, प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत  कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व - महिला ५० टक्के, कृषी विभागाच्या तांत्रिक सहकार्याने प्रकल्प समिती गावचा विकास आराखडा तयार करते. प्रकल्पाच्या सहाय्याने बदलत्या हवामानात  शेतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा आराखडा पाण्याचा ताळेबंदशेतीसाठी पाणीजमिनीचे आरोग्य व्यवस्थापनपिकांसाठी नवीन तंत्रज्ञानकृषी व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर. मागणी नुसार लाभ या तत्वावर अंमलबजावणी. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे नामनिर्देशन. ऑनलाईन व कागदविरहित (paperless) प्रणालीचा वापर.

            प्रकल्पाची वित्तीय स्थिती जागतिक बँकेच्या करारानुसार मूळ प्रकल्पाची किंमत रु. ४ हजार कोटी असून राज्य शासनाने घेतेलेल्या निर्णयानुसार सुधारित प्रकल्प किंमत रु. ५हजार ४६९ कोटी इतकी आहे. शासनाकडून आजअखेर रु. 4 हजार 870.58 कोटी प्राप्त झाला असून आज अखेर रु.  ४  हजार ६७८ कोटी खर्च करण्यात आला आहे. जागतिक बँकेकडून ७० टक्के हिश्श्याप्रमाणे रु. 2757.49 कोटी (356.43 दशलक्ष डॉलर) इतका परतावा प्राप्त. जागतिक बँकेकडून उचलेल्या कर्जाची परतफेड करावयाचा कालावधी  मे२०२४ पासून १८ वर्षांचा आहे. प्रकल्पातून दिलेले लाभ प्रकल्प गावातील ४ लाख ८५ हजार ३६० वैयक्तिक शेतकऱ्यांच्या ६ लाख ९६ हजार ०९७ अर्जांपोटी रु. ३ हजार ८१६ कोटी रुपये  अनुदान वर्ग. प्रकल्प जिल्ह्यातील  शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या ४ हजार ७०२ कृषी व्यवसाय प्रस्तावांना ५०२  कोटी रुपये अर्थसहाय्य. मृद व जलसंधारणाच्या ३ हजार ५९२ कामांवर ८१  कोटी रुपये निधी खर्च केला.

            बदलत्या हवामानासाठी शेतकऱ्यांना दिलेले तंत्र : शेतीशाळा अंतर्गत बीबीएफ तंत्राचा अवलंबलिंबोळी अर्काचा वापरकापूस पिकाकरिता ‘एक गाव एक वाण’जैविक खताची बिज प्रक्रियाफळ पीक लागवडीचे वेळी मुळाच्या परिघात सिंचन पद्धतीचा अवलंब या हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर भर.

            शून्य मशागत व रुंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन : बदलत्या हवामानामध्ये जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी व जमिनीतील कर्ब ग्रहण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक म्हणून "शून्य मशागत" व बीबीएफ या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे.        

            प्रकल्पाची डिजिटल अंमलबजावणी : प्रकल्पाचे लाभ,  सूक्ष्मनियोजन,  शेतीशाळा ,  मनुष्यबळ व्यवस्थापनकृषी हवामान  सल्ला-सेवा संकेतस्थळफ़ार्मर अॅप द्वारे शेतकऱ्यांना कृषी-हवामान सल्लाहवामान अनुकूल तंत्रज्ञान, बाजारभावगोदाम उपलब्धता विषयक माहिती मोबाईल अॅप द्वारे उपलब्ध करून दिलेली आहे.        

            राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी धोरणात्मक भागीदारी : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA), भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबईराष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोगिता नियोजन संस्था (NBSS & LUP), नागपूरमहाराष्ट्रातील कृषि विद्यापीठेकेंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (ICAR), हैदराबादयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) पुणेगोखले अर्थशास्त्र संस्था (GIPE) पुणेटाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) मुंबई या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे.

प्रकल्पाद्वारे निर्माण झालेली अतिरिक्त संसाधने

            फळबाग लागवड क्षेत्र :  २९ हजार २७०  हेक्टर ,   बिजोत्पादन क्षेत्र (खरीप व रबी) :  1,

लाख 5 हजार 620 हेक्टर ,  शेततळी निर्मिती व बळकटीकरण अकरा हजार,पाणी साठवण क्षमता 30 हजार 181 टी. एम.सी., सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र :  ३ लाख ५० हजार ८०० हेक्टरसंरक्षित लागवड १ हजार ५०० हेक्टर, गोडावून साठवण क्षमता २ लाख मे.टन आहे.

            प्रकल्पाचा टप्पा २ : प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूरभंडारागोंदियाचंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित रु.६ हजार कोटी किंमतीचा प्रकल्पाचा टप्पा- २ राबविण्यास शासनाची तत्वत: मान्यता देण्यात आलेली  आहे. यासाठी गावनिवड प्रक्रिया प्रगतीत आहे.

               शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, तुषार सिंचन, नवीन विहीर, पॉली हाऊस/ पॉली टनेल, बिजोत्पादन, वैयक्तिक शेततळे, मधुमक्षिका पालन, सामुदायिक शेततळे, खारपाण (शेततळे/ तुषार सिंचन/ पंप संच), कृषि यांत्रिकीकरण, लागवड साहित्य, शेततळे अस्तरीकरण, पाईप, पंप संच, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा प्रोत्साहन, वृक्षलागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, बंदिस्त शेळीपालन, रुंद वाफा व सरी प्रोत्साहन, विहिरींचे पुनर्भरण आणि परसातील कुक्कुटपालन.

               तसेच शेतकरी गट व कंपन्यांना पुढील बाबींचा समावेश होतो. काढणी पश्चात /प्रक्रिया केंद्र, गोदाम साठवणूक केंद्र, इतर कृषी व्यवसाय भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्रांची निर्मिती करणे आदिंचा समावेश होतो.

 

Featured post

Lakshvedhi