Monday, 22 January 2024

सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती

 सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहेत्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना  अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेतयाचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील रे नगरकुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुल प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण शुक्रवार १९ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहेहा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहेया प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दि.जानेवारी 2019 रोजी झाले होतेया निमित्त हा लेख...

 

             सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)' राबविण्यात येतेराज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नागरी प्रकल्पांना गती देलाभार्थ्यांना विह मुदतीत घरे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेप्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण भागात मोठा लाभ नागरिकांना मिळत आहेत्याच पद्धतीने शहरी भागातील नागरिकांना देखील अधिकाधिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहेप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील रे नगर  येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी हा प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडाराबवत आहेत्याला केंद्र सरकारच्या पीएमएवायचे देखील सहाय्य आहे.

कामगारांचे शहर सोलापूर

कामगारांचे शहरअशी सोलापूरची ओळख आहेआधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योगविडी उद्योगबांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करतातसंपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न या प्रकल्पातून साकार होताना दिसत आहेदेशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे.

रे नगर गृहप्रकल्पाविषयी माहिती

देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा हा गृहप्रकल्प आहे.  हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर विकसित होत आहेया प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती असून प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेतकचरा उचलणारेविडी कामगारबांधकाम कामगारवस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील  लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेतकेंद्र  राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा  बीज भांडवलाकरिता राज्य शासनाने अर्थसाहाय्य दिले आहेपाणीपुरवठावीजपुरवठासांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार  डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेतया प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठामलशुध्दीकरण केंद्र (STP) स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणाशाळाअंगणवाडीखेळाचे मैदानरुग्णालयकौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, फटॉप सोलर योजनारेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित करून या घरकुलांचे हस्तांतरण करण्यात येत आहे.

योजनेची सुरूवात

सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आलीया योजनेअंतर्गतशासन सर्व पात्र कुटुंबांना आणि लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UTS) आणि केंद्रीय नोडल एजन्सी (CNAs) मार्फत अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करतेशहरीकरण आणि वाढत्या आर्थिक प्रकल्पांमुळे शहरी भागात परवडणाऱ्या घरांच्या समस्या निर्माण झाल्या आहेतआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मदत करणे आणि त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)

देशातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीशौचालयाची व्यवस्था२४ तास वीज  पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवेअसे विचारात घे प्रधानमंत्री यांच्या सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहेकेंद्र शासनाच्या गृहनिर्माण  शहरी दारिद्रय निर्मूलन मंत्रालयाने दि२५ जून २०१५ रोजी सर्वासाठी घरे या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याया मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने " प्रधानमंत्री आवास योजनेची " राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडून  डिसेंबर२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित कर ही योजना राज्यामधील ४०९ शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे.

योजनेची सद्यस्थिती

प्रधानमंत्री आवास योजना (नागरीमध्ये केंद्रीय मान्यता  सनियंत्रण समितीने (CSMC) आतापर्यंत १६४२ प्रकल्पांतील ,८०,९९७ घरकुलांना मान्यता दिलेली आहेआर्थिकदृष्टया दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती (CLSS) अंतर्गत ,२५,०५० घरकुले विचारात घेताराज्यात एकूण १५,०६,०४७ घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुरी प्राप्त आहेप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरीता (EWS) ,००,०९८ घरकुलांना मंजरी असून त्यापैकी ,२७,५८१ घरकुले केंद्र हिश्श्याचा निधी मिळण्यास पात्र आहेतया योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) ,२७,५८१ मंजूर घरकुलांपैकी पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या जवळपास .०३,०४७ आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्टये

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक

सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुल प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण शुक्रवार १९ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा गृह प्रकल्प देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दि.9 जानेवारी 2019 रोजी झाले होते. या निमित्त हा लेख...

 

             सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन 'प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)' राबविण्यात येते. राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या नागरी प्रकल्पांना गती देऊन, लाभार्थ्यांना विहीत मुदतीत घरे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण भागात मोठा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्याच पद्धतीने शहरी भागातील नागरिकांना देखील अधिकाधिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी हा प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) राबवत आहे, त्याला केंद्र सरकारच्या पीएमएवायचे देखील सहाय्य आहे.

कामगारांचे शहर सोलापूर

कामगारांचे शहर, अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करतात. संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न या प्रकल्पातून साकार होताना दिसत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे.

रे नगर गृहप्रकल्पाविषयी माहिती

देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा हा गृहप्रकल्प आहे. हा प्रकल्प ३६५ एकर जागेवर विकसित होत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण ८३३ इमारती असून प्रत्येक इमारतीत ३६ घरे आहेत. कचरा उचलणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार इत्यादी असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी ही घरकुले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त पायाभूत सुविधा व बीज भांडवलाकरिता राज्य शासनाने अर्थसाहाय्य दिले आहे. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच सोलार व डिजिटल पत्ता या सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये उजनी जलाशयातून पाणी पुरवठा, मलशुध्दीकरण केंद्र (STP) स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, शाळा, अंगणवाडी, खेळाचे मैदान, रुग्णालय, कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रुफटॉप सोलर योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित करून या घरकुलांचे हस्तांतरण करण्यात येत आहे.

योजनेची सुरूवात

सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत, शासन सर्व पात्र कुटुंबांना आणि लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UTS) आणि केंद्रीय नोडल एजन्सी (CNAs) मार्फत अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करते. शहरीकरण आणि वाढत्या आर्थिक प्रकल्पांमुळे शहरी भागात परवडणाऱ्या घरांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मदत करणे आणि त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)

देशातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन प्रधानमंत्री यांच्या सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मूलन मंत्रालयाने दि. २५ जून २०१५ रोजी सर्वासाठी घरे या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने " प्रधानमंत्री आवास योजनेची " राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडून ९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन ही योजना राज्यामधील ४०९ शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे.

योजनेची सद्यस्थिती

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) मध्ये केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने (CSMC) आतापर्यंत १६४२ प्रकल्पांतील ८,८०,९९७ घरकुलांना मान्यता दिलेली आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती (CLSS) अंतर्गत ६,२५,०५० घरकुले विचारात घेता, राज्यात एकूण १५,०६,०४७ घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुरी प्राप्त आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरीता (EWS) ८,००,०९८ घरकुलांना मंजुरी असून त्यापैकी ६,२७,५८१ घरकुले केंद्र हिश्श्याचा निधी मिळण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) ६,२७,५८१ मंजूर घरकुलांपैकी पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या जवळपास ४.०३,०४७ आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्टये

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक

 

महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन मुंबई फेस्टिव्हल २०२४ सह काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन

 महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई फेस्टिव्हल २०२४ सह काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन

 

















            मुंबईदि. २० : राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनाराऐतिहासिक गड - किल्लेअजिंठावेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीजैवविविधतेने समृद्ध वनेतेथील वन्य प्राणीधार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी ठरेलअसा विश्वास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.

            राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीतर्फे आयोजित मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आणि काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन आज सायंकाळी क्रॉस मैदान गार्डनचर्चगेट येथे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रापर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्माकाळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक ब्रिंदा मिलेकरअभिनेता जॅकी श्रॉफअभिनेता आदिनाथ कोठारेएक्झिम बँकेच्या हर्षा भंडारीतरुण शर्मा आदी उपस्थित होते.  

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीदेशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले. त्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देतानाच त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमुंबई शहराची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील खाद्यसंस्कृतीला चालना मिळणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावेअसेही त्यांनी आवाहन केले.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीमुंबई फेस्टिवलची मूळची संकल्पना माझी होती. दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजनउद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई फेस्टिव्हल उत्कृष्टपणे पार पडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मुंबई फेस्टिवल समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले कीमुंबई फेस्टिवलच्या आयोजनात राज्य शासनाने पूर्णपणे सहकार्य केले. धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. मुंबई शहर एक उत्सव आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून मुंबईत विविध पायाभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

            काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक श्रीमती मिलेर म्हणाल्या कीगेल्या २५ वर्षापासून काळा घोडा महोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई शहरात अनेक एतिहासिक वास्तू आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            सुरवातीला शारदा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच मुंबई फेस्टिव्हलवर आधारित गीत सादर करण्यात आले. संगीतकार श्री. टंडन यांनी संगीत दिले आहेतर नृत्य दिग्दर्शन रेमो डिसुझा यांनी केले आहे. याशिवाय संगीतकार अशोक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गीते आणि नृत्य सादर करण्यात आली. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री मिनी माथूर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी लोकप्रतिनिधीवरीष्ठ अधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी दि. १ फेब्रुवारी रोजी कलानंद बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी दि. १ फेब्रुवारी रोजी कलानंद बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. news-photo- प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यशाळा पार पडली. बाल मेळाव्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या मुला-मुलींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.


दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार आहेत.


बाल मेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन, कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश आदींसाठी निवड झालेल्या मुलामुलींसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्याची कशी तयारी झाली आहे? काय बदल केला पाहिजे? याबाबत बाल मेळावा समितीचे सदस्य संदीप घोरपडे, प्रा.प्रकाश धर्माधिकारी, गिरीश चौक, वसुंधरा लांडगे, मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख, ॲड. सारांश सोनार, ॲड. कौस्तुभ पाटील, प्रा.पी.जे.जोशी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. भैय्यासाहेब मगर यांनी सूत्रसंचालन केले तर स्नेहा एकतारे यांनी आभार मानले. म.वा.मंडळातर्फे प्रा.शीला पाटील यावेळी उपस्थित होत्या.


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पत्रकारांसाठी असलेला विशेष व्हॅट्सऍप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://chat.whatsapp.com/HUWA36CWSyWFmwFTM9AEvH


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7





Featured post

Lakshvedhi