Monday, 22 January 2024

महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन मुंबई फेस्टिव्हल २०२४ सह काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन

 महाराष्ट्रातील पर्यटन वृद्धीसाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई फेस्टिव्हल २०२४ सह काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन

 

















            मुंबईदि. २० : राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनाराऐतिहासिक गड - किल्लेअजिंठावेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीजैवविविधतेने समृद्ध वनेतेथील वन्य प्राणीधार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल पर्वणी ठरेलअसा विश्वास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.

            राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीतर्फे आयोजित मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आणि काळा घोडा कला महोत्सवाचे उदघाटन आज सायंकाळी क्रॉस मैदान गार्डनचर्चगेट येथे पर्यटन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा उद्योगपती आनंद महिंद्रापर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्माकाळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक ब्रिंदा मिलेकरअभिनेता जॅकी श्रॉफअभिनेता आदिनाथ कोठारेएक्झिम बँकेच्या हर्षा भंडारीतरुण शर्मा आदी उपस्थित होते.  

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीदेशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले. त्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देतानाच त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

            मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमुंबई शहराची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जोपासली आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथील खाद्यसंस्कृतीला चालना मिळणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावेअसेही त्यांनी आवाहन केले.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीमुंबई फेस्टिवलची मूळची संकल्पना माझी होती. दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजनउद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई फेस्टिव्हल उत्कृष्टपणे पार पडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मुंबई फेस्टिवल समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्रा म्हणाले कीमुंबई फेस्टिवलच्या आयोजनात राज्य शासनाने पूर्णपणे सहकार्य केले. धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. मुंबई शहर एक उत्सव आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून मुंबईत विविध पायाभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

            काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक श्रीमती मिलेर म्हणाल्या कीगेल्या २५ वर्षापासून काळा घोडा महोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई शहरात अनेक एतिहासिक वास्तू आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. आगामी नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            सुरवातीला शारदा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. तसेच मुंबई फेस्टिव्हलवर आधारित गीत सादर करण्यात आले. संगीतकार श्री. टंडन यांनी संगीत दिले आहेतर नृत्य दिग्दर्शन रेमो डिसुझा यांनी केले आहे. याशिवाय संगीतकार अशोक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गीते आणि नृत्य सादर करण्यात आली. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री मिनी माथूर यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी लोकप्रतिनिधीवरीष्ठ अधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi