Sunday, 21 January 2024

टाटा मुंबई मॅराथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

 टाटा मुंबई मॅराथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून

                              सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

 





            मुंबईदि.२१:  आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळग्रामविकास मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलारपोलीस आयुक्त विवेक फणसाळकरदेवेन भारतीमुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल, पश्चिम नौसेना मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय सिंहमहाराष्ट्रगुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल एच. एस. काहलों, यांनी उपस्थित राहून या मॅरेथॉनमध्ये मध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला. 

 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेटाटा मॅरेथॉन ही जगातील अतिशय प्रतिष्ठित मॅरेथॉन असून गेली १९ वर्षे तिचे यशस्वी आयोजन होत आहे. यंदा या स्पर्धेत ५९ हजाराहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आपल्या वयाच्या आणि शारीरिक मर्यादांचा विचार न करता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात हे या स्पर्धेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. 

 

            या मॅरेथॉनमध्ये एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी भाग घेतला असून राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय धावपटू सहभाग आहे. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे.

टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन विनर (२१.०९७ किलो मीटर)

प्रथम क्रमांक : सावन बरवाल - १ तास ५ मिनटे ७ सेकंद

द्वितीय क्रमांक : किरण म्हात्रे - १ तास ६ मिनटे २३ सेकंद

तृतीय क्रमांक : मोहन सैनी - १ तास ६ मिनटे ५५ सेकंद

विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत.

महिला हाफ मॅरेथॉन विजेते 21.97 किमी

प्रथम क्रमांक : अमरीता पटेल - १ तास १९ मिनटे २० सेकंद

द्वितीय क्रमांक : पूनम दिनकर - १ तास १९ मिनटे २० सेकंद

तृतीय क्रमांक : कविता यादव - १ तास २० मिनटे ४५ सेकंद

४२.१९५ किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती.

२१.०९७ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता माहीम रेतीबंदरमाहीम कॉजवे इथून सुरू झाली होती. तर १० किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली.

 

०००

मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यशसंपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार

                                                           वृत्त क्र.            मुंबईतील प्रदूषणाची पातळी घटली हे स्वच्छता मोहीमेचे यशसंपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबविणार

                                                       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुर्ला येथील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

 

          मुंबई दि. 21 - मुंबई शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून संपूर्ण स्वच्छता मोहीमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण स्वच्छता मोहीमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहीमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी 350 वरून 100 ते 80 पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

                मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आज कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिरश्री. नंदिकेश्वर मंदिरश्री हेरंब मंदिरसिद्धेश्वर सहकारी गृह निर्माण संस्थाश्री शनैश्वर मंदिरचेंबुर येथे सपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळेआमदार मंगेश कुडाळकरमाजी आमदार तुकाराम कातेअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासूउपायुक्त (परिमंडळ - 5) हर्षद काळेउपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन) संजोग कबरेसहायक आयुक्त धनाजी हेर्लेकरअलका ससाणे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेसंपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जन चळवळ झाली आहे. टप्प्या टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छसुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या आयोध्या येथील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहीमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

            मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देशविदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिप क्लिन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेच्या माध्यमातून सिडकोएमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहीमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीविविध सामाजिक संस्थासफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उर्त्फूतपणे प्रतिसाद देत आहेत.

            यावेळी परिसरातील नगरिकतरुण मंडळांचे कार्यकर्तेमंदिरांचे विश्वस्तविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहीमेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारीपरिसरातील नागरिक आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.

दरम्यानकुर्ला पूर्व भागात स्वच्छता मोहीम आटोपून परतत असताना रस्त्याच्या कडेला जाणारी दोन लहान मुले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिसली. या मुलांच्या हातात गदा होती. रस्त्याने आपल्या आईसोबत चालत जाणारी ही गदाधारी मुले पाहून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला. स्वतः त्या लहान मुलांना जवळ बोलावले. त्या लहानग्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या आपुलकीच्या वागणुकीने ही लहान मुले भारावून गेल्याचे यावेळी दिसले.

मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावेमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आवाहन

            मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावेअसे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.

                                                                  00000

मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

 मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

 

यंत्रणा सज्ज ठेवागावोगावी दवंडी द्यानागरिकांना माहिती द्या

अचूककालबद्धपणे काम व्हावे

---------------------------

चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

            मुंबई, दि२० : मराठा समाजाचे सामाजिकआर्थिकशैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्यासूचना फलकांवर माहिती द्यालोकांना या सर्वेविषयी कळू द्या, असे निर्देशही त्यांनी दिले.  

            ते आज वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

            या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसलेनिवृत्त न्या. मारोती गायकवाडनिवृत्त न्या. संदीप शिंदेमहसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेनगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराजइतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हाविधि व न्याय सचिव श्री कलोते यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव ( साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

            मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल. अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युटआयआयपीएस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

 

सामाजिक भावनेने काम करण्याचे आवाहन

 

            मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून प्रशासनाने सुध्दा या अतिशय महत्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  

 

गावोगावी दवंडी द्यासूचना फलकांवर माहिती द्या

 

            मुख्यमंत्री म्हणाले कीहे सर्वेक्षण अतिशय महत्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्याग्रामपंचायतीच्या फलकांवर सुचना द्या  तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे, म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यायचा आहे.  

 

२४ तास कॉल सेंटर सुरु ठेवा

 

            यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षकग्रामसेवकअंगणवाडी सेविकातलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत, असे ते म्हणाले. ३६ जिल्हे२७ नगरपालिका७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरु झाले आहे.

            यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले कीप्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्रबैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की२००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा  संकलित करण्यात येत आहे, हे व्यवस्थित तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा

 

 

            कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञतहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत, तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवादवंडी द्यातसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा, असे मुख्यमंत्री म्हणाले.   

 

ऑक्टोबरपासून १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरीत

 

            निवृत्त न्यासंदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे संबंधिताना वितरीत करण्यात आले आहेत. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या संदीप शिंदे समितीने लातूरमराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे  अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली.

 

0000


मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी

 मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम्‌ आदी कार्यक्रम प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात दररोज दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान होतील.


दि.२९ रोजी  आर्या शेंदुर्णीकर कथ्थक नृत्य, तेजल जगताप एकल तबला वादन तर सुनिल वाघ व त्यांचे सहकारी 'मराठी पाऊल पडते पुढे' हा कार्यक्रम सादर करतील. दि. ३० रोजी नयना कुलकर्णी आणि समूह 'आमची माती आमची संस्कृती', अमळनेर महिला मंच 'सूर तेच छेडीता' तर कानुश्री संगीत विद्यालय, धुळे येथील चमू भरतनाट्यम्‌ सादर करतील. दि. ३१ रोजी मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम्‌, जळगाव येथील नेहा जोशी यांचा शिष्य परिवार भरतनाट्यम्‌ सादर करतील. यज्ञेश जेऊरकर एकल तबला वादन तर स्वरांजली, अमळनेरचा चमू 'अशी पाखरे येती' या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.


दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समिती व बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे यांनी दिली.


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पत्रकारांसाठी असलेला विशेष व्हॅट्सऍप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://chat.whatsapp.com/HUWA36CWSyWFmwFTM9AEvH


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7


आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली

 आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली


कहाणी !

(मेघालय डायरी)

आशिया खंडातील स्वच्छ गाव कसं असेल?... मेघालयाला जाताना याबाबत बरीच उत्सुकता होती. चेरापुंजीमधून ‘मॉलिनाँग’ या गावात गेलो आणि हे गाव पाहिले तेव्हाच ही उत्सुकता शमली. हे गाव अगदी बांगलादेशच्या सीमेपासून काही अंतरावर. चेरापुंजीपासून मस्त दाट झाडी असलेल्या जंगलातून वळणा-वळणाचा घाट रस्ता या गावात जातो. या रस्त्याने आपण बरेच खाली उतरतो. मॉलिनाँग गावापासून आणखी खाली गेले की बांगलादेशच्या पातळीवर म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या मैदानावर पोहोचतो.

पोहोचायला रात्र झाल्याने सकाळी उठून गावात फेरफटका मारला. रस्त्यावर कचरा सोडाच, साधा कपटासुद्धा नाही. जागोजागी कचरापेट्या. त्यासुद्धा बांबूने विणलेल्या. इतक्या आकर्षक की त्यात कचरा टाकायचं मन होत नाही. गावातील प्रत्येकाला स्वच्छतेची इतकी सवय झालीए की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण स्वच्छतेची काळजी घेतो. घरे सजवलेली. झाडांवर विविधरंगी फुले येणारे ऑर्किड बांधलेले. गटारे तुंबलेली दिसत नाहीत, लोकही हसरे. रस्त्यावर पडलेलं पानसुद्साधा उचलून कचरापेटीत टाकतात. ‘मी कचरा केला नाही, तो मी उचलणार नाही...’ असा बाणा नाही. शाळकरी मुलं असोत वा मोठे, सर्वांचीच ही वर्तणूक... असे हे गाव. त्याला स्वच्छ किताब मिळाला नाही तरच नवल!

या छोट्याशा गावाने हे कसे साध्य केले, याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पूर्वीचे शिक्षक Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते आता सत्तरीत आहेत. त्यांची पिढी तारुण्यात असताना याची सुरुवात झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकणे हा आनंद होता. या कहाणीचा सार असा की, तिथे गावागावात जनावरे पाळली जातात. त्यात डुकरांचे प्रमाण सर्वाधिक. हे प्राणी आणि वस्ती एकाच ठिकाणी असेल तर त्यांचे खाद्य, विष्ठा, परिसरात वावरणे यामुळे दुर्गंधीला आमंत्रण. हे समजून गावाने महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे- जनावरे पाळण्याचे ठिकाण गावापासून दूर हलवले. सर्वांची जनावरे गावापासून दूर एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गाव स्वच्छ व्हायला मदत झाली. आपोआपच संसर्ग, आजार, रोगराई यांचे प्रमाण कमी झाले.

याशिवाय स्वच्छतेबाबत शाळांमधून मुलामुलांमध्ये जागरुकता केली. त्यासाठी गावकऱ्यांनाही तयार केले. हळूहळू त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. लोकांना हुरूप आला. एका नियतकालिकाने गावाच्या प्रयोगाची दखल घेतली. हे माहीत झाल्यावर माध्यमांनी गावाला उचलून धरले. पर्यटक यायला लागले. हळूहळू मॉलिनाँग हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आणि आशियातील स्वच्छ गाव म्हणून नावाजले गेले. त्याने पर्यटकांना आणखी आकर्षित केले. आता तर स्वच्छता ही बाब लोकांमध्ये भिनली आहे. गावात फिरताना त्याचा प्रत्यय येतो.

पण या स्वच्छतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते म्हणतात, ‘या स्वच्छ गावाच्या किताबामुळे आमचे प्राधान्यक्रमच बदलले आहेत. आता आम्हाला बाकी सारी कामे सोडून गावाची स्वच्छता टिकवून ठेवावी लागते. पर्यटकांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आमची शेतीची कामे, काही रिती, प्रथा, परंपरागत कामे हे सारे मागे पडले आणि गावाचे नाव टिकवण्यासाठी हे करावे लागते.’

गावात आम्हाला जाणवलेला बदल म्हणजे, जो तो पर्यटकांना राहण्यासाठी कॉटेजेस बांधू लागला आहे. पूर्वी विरळ असलेली वस्ती आता दाट बनते आहे. स्थानिक लोकांशी बोललो तर त्यांनीही तेच बोलून दाखवले. पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यांना होम-स्टे उपलब्ध करून देण्यासाठी कॉटेजेस्, विविध बांधकामे बनत आहेत. हे सारे एकाच गावात होत असल्याने गर्दी एकवटत आहे. त्यात गावाची पूर्वीची ओळख आणि गावपण टिकणार का? हे आव्हान उभे राहिले आहे. ते गावाला पेलणार का आणि त्याला गाव कसे सामोरे जाणार? १०-१५ वर्षांनंतर गावाचे स्वरूप कसे असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. गावातील काही रहिवाशांनीही ती बोलून दाखवली... आशियातील स्वच्छ गावाची कहाणी आणि त्याची माहीत नसलेली दुसरी बाजू समजून घेताना हा प्रदेश उलगडत जातो.

नेहमीच्या गोष्टींपलीकडचा मेघालय समजून घेण्यासाठी,

चलो मेघालय...

(Exclusive Meghalaya - Kaziranga)
26 Feb - 4 Mar 2024

9545350862 / bhavatal@gmail.com

(मोजक्याच जागा शिल्लक)

- अभिजित घोरपडे

................

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi