Saturday, 20 January 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर

 

            मुंबई दि. 19 : भाऊसाहेब फुंडकर  फळबाग लागवड योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

              महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

            सन 2023-24 या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीकरिता अनुसूचित जाती प्रवगासाठी रु.40.00 लाख (रुपये चाळीस लाख फक्त) निधी आयुक्त (कृषी)कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्यपुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध  करून देण्यात आला आहे .

अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

 अंतिम मतदार यादी  २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार


            मुंबईदि‌२० : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी२०२४ (सोमवार) असा होता. तथापिराज्य शासनाने १९ जानेवारी२०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारी२०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी२०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेतअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

 


मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार

 मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार


 जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर



            मुंबईदि. २०  मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होती. राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी   श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

 

            भारत निवडणूक आयोगाच्या २९ मे २०२३ रोजीच्या पत्रान्वये १ जानेवारी२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या २६ डिसेंबर २०२३ पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा २२ जानेवारी२०२४  होता. परंतु राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने मुंबई शहर जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी २३ जानेवारी२०२४ रोजी  प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

            त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी ऐवजी २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री. क्षीरसागर  यांनी कळविले  आहे.

 

मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

 मै अटल हूहा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

            मुंबईदि. 19 : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूहा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेलअसा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केला.

            माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्यावर आधारित 'मै अटल हूया चित्रपटाचा विशेष विशेष खेळ आज सायंकाळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या खेळाच्या समारोपानंतर अध्यक्ष ॲड. नार्वेकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळचित्रपटाचे निर्माते विनोद भानुशालीदिग्दर्शक रवी जाधव आदी उपस्थित होते.

            विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले की, 'मै अटल हूया चित्रपटाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश जाईल. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व होय. त्यांनी आयुष्यात समाजकारणराजकारणलोकसेवा आणि राष्ट्रसेवेचे ध्येय ठेवले होते. दिग्दर्शक श्री. जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.

            मंत्री श्री. भुजबळ यांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरची आठवण सांगितली.  ते म्हणाले कीअटलबिहारी वाजपेयी कवी मनाचे लेखक होते. ते उत्कृष्ट वक्ता होते. त्यांची भाषणे नेहमीच ऐकत होतो. यावेळी विधिमंडळाचे सदस्यअधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००


 

मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘महा मुंबई एक्स्पो’चे उद्घाटन







 मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये महा मुंबई एक्स्पोचे उद्घाटन

महाराष्ट्राच्या भूमीत पर्यटनाच्या अमर्याद संधी

                                                                       पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबईदि. 20 : ‘महा मुंबई एक्स्पो’ मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचे आणि  मुंबई शहराचे बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आले आहे. मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत सुरु असलेल्या महा मुंबई एक्स्पो’ ला सर्वांनी जरुर भेट द्यावीअसे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

            महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य दर्शविणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 मधील महा मुंबई एक्स्पो’ चे उद्धाटन वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करून मुंबई फेस्टिव्हल 2024 ची सुरुवात झाली. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकरजपानच्या ओकायामा विधानसभेचे अध्यक्ष मरियामाराज्याच्या पर्यटन सचिव जयश्री भोजपर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटीलमुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसलेपर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते. 

            याठिकाणी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या महा मुंबई एक्स्पो’ मध्येसोमवार ते शुक्रवार या  दिवशी दुपारी ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि शनिवार-रविवारी दुपारी ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल.या एक्सपोमध्ये महाराष्ट्राची कलावारसा आणि चिरंतन परंपरा यांचे दर्शनपारंपरिक खेळांच्या आनंदाशी पुन्हा कनेक्ट व्हायची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीया महा मुंबई एक्स्पोच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जगासमोर येणार आहे. मुंबईकरांना आणि या महोत्सवात येणाऱ्या प्रत्येकासाठी हा विलक्षण अनुभव असणार आहे.  महाराष्ट्राची सांस्कृतिकसांगितिक श्रीमंती येथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवायला मिळेल. राज्यात पर्यटनाच्या अमर्याद संधी असून देश-विदेशातील नागरिकांनी आवर्जून राज्यातील या स्थळांना भेट द्यावी. यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.           

             शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले कीमुंबई फेस्टिव्हल पुन्हा सुरु झाला असून या फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबई शहराची विविधता मांडण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. हा फेस्टिव्हल सर्वांचा असून प्रत्येकाचा सहभाग यात महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

           पर्यटन सचिव श्रीमती भोज म्हणाल्या कीआपल्या परंपरा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यांचा समन्वय साधत महा एक्स्पो’ ची उभारणी करण्यात आली आहे. महा मुंबई एक्स्पो’ ला प्रत्येक मुंबईकरांनी आवर्जून भेट द्यावीअसे आवाहन त्यांनी केले.

          महामुंबई एक्स्पो 2024 मध्ये मुंबईतील विविध आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये येथे येणाऱ्या नागरिकांना अनुभवायला मिळतील. भेलपुरीपाणीपुरीगोलाकुल्फी यासह मुंबई चौपाटी सारख्या स्टॉलवर मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा विविध पदार्थांची लज्जत  आणि आस्वाद घ्यायला मिळेल. मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये "टेस्ट ऑफ मुंबई" या नावाने खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. मुंबईतील विविध हॉटेलच्या स्टॉल्समधून स्वादीष्ट पदार्थ आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. गेम झोनमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्सबंपर कारएअरलिफ्ट्सकोलंबिया बोट्स आणि लाइफ साइज चौपर आणि स्नेक्स अँड लॅडर सारख्या पारंपरिक खेळांसह इमर्सिव्ह थ्रीलचा समावेश आहे. रिटेल झोनमध्ये रिटेल थेरपी असणार आहे. विविध 26 प्रकारचे खाद्यपदार्थविविध कलाकुसरीच्या वस्तूलहान मुलांसाठी खेळणी आदींच्या वस्तूंचे स्टॉल्सही याठिकाणी असणार आहेत.

 

0000

                                                                                      


मराठा समाज 'मिशन सर्वेक्षण' मोहीम युध्द पातळीवर

 मराठा समाज 'मिशन सर्वेक्षणमोहीम युध्द पातळीवर

                                                        - महसूलमंत्री विखे पाटील

मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षणास पुण्यातून प्रारंभ

 

            मुंबईदि. २० :  महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज 'मिशन सर्वेक्षणमोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहेअसे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी आज केले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने पुणे येथे गोखले इन्स्टीट्युटमध्ये मास्टर ट्रेनर्संना प्रशिक्षण कार्यक्रमास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी माध्यमांना दिली.

            पुणे येथे गोखले इन्स्टीट्युटमध्ये प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स हे जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर संबंधित प्रगणक (इन्म्युरेटर) यांना दिनांक 21 व 22 जानेवारी, 2024 या दोन दिवसात प्रशिक्षण देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची दृकश्राव्य माध्यम प्रणालीद्वारे महत्वाची बैठक घेण्यात आली.

            हे प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडावे यासाठी सदर प्रशिक्षणार्थी हे एका बॅचमध्ये 75 पेक्षा जास्त नसतील. सर्वेच्या अनुषंगाने जिल्हा/तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना डॅशबोर्ड देण्यात येईल. त्यामध्ये सर्वेक्षणाची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. त्याआधारे या सर्वेक्षणाच्या प्रगतीची अद्ययावत माहिती / अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगास उपलब्ध होणार आहे. तद्नंतर सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम हे दिनांक 23.1.2024 ते 31.1.2024 या कालावधीत युध्द पातळीवर होणार आहे.  या कामासाठी महसूलस्थानिक स्वराज्य संस्थानगर विकास संस्थाशिक्षण विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत राहतील. 

            सर्वेक्षण करताना ऑनलाईन माहिती भरत असताना खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असेल तर 121 प्रश्न संच असलेला फॉरमॅट आवश्यक माहिती भरण्यासाठी कार्यरत होईल. सदर सर्वेक्षणाची माहिती भरताना ती चार भागामध्ये पुढीलप्रमाणे असणार आहे. पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मुलभूत माहिती जसे- आधार कार्डपॅनकार्ड इ.दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहितीतिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक माहिती व चौथ्या भागात संबंधित व्यक्तीची आर्थिक माहिती असणार आहे. याप्रमाणे 121 प्रश्नसंचाची माहिती पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमवर कॅमेरा ऑन होवून संबंधित व्यक्तीचा फोटो व स्वाक्षरी घेण्यात येवून त्याची ही माहिती संगणक प्रणालीवर जमा होणार आहे.

            कुणबी मराठा-कुणबीकुणबी-मराठा जाती संदर्भात आढळुन आलेल्या नोंदीच्या आधारे संबधित पात्र व्यक्तींना कुणबी,मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा‍धिकारी यांच्या स्तरावर जिल्हयात शिबिरांचे आयोजन करुन पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

            तसेच ज्यांच्या कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत, त्या संबधित नागरिकांना निदर्शनास येण्याच्या अनुषंगाने त्यांच्या याद्या सर्व तलाठी यांच्या मार्फत गाव स्तरावर मोहिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहेजेणेकरून पात्र नागरीकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील. युध्दपातळीवर होणाऱ्या सर्वेक्षणाच्या प्रगतीवर आपण स्वत: लक्ष ठेवून असणार असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा - नंदकुमार काटकर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

 नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या

नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा

- नंदकुमार काटकर

दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'अभय योजनाया विषयी नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ग्राहकांना नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळावी यासाठी मुद्रांक सवलतीची 'अभय योजनालागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सन 1980 ते 2000 या कालावधीतील तसेच 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील जुने दस्तऐवज आणि दंडामध्ये सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत दोन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 31 जानेवारी 2024 पर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सवलत देण्यात येणार आहे.  ग्राहकांना ही सवलत कशा स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे. याचबरोबर भारतीय नोंदणी कायदा आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम काय आहेयाबाबतची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमात सह नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधीक्षक श्री. काटकर यांनी दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. काटकर यांची मुलाखत सोमवार दि. 22मंगळवार दि. 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

Featured post

Lakshvedhi