Saturday, 20 January 2024

मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार

 मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार


 जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर



            मुंबईदि. २०  मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होती. राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी   श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

 

            भारत निवडणूक आयोगाच्या २९ मे २०२३ रोजीच्या पत्रान्वये १ जानेवारी२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या २६ डिसेंबर २०२३ पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा २२ जानेवारी२०२४  होता. परंतु राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने मुंबई शहर जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी २३ जानेवारी२०२४ रोजी  प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

            त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी ऐवजी २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री. क्षीरसागर  यांनी कळविले  आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi