Friday, 19 January 2024

'नवी पिढी हिंदी, मराठी लिहू - वाचू शकत नाही ही चिंतेची बाब'

 'नवी पिढी हिंदीमराठी लिहू - वाचू शकत नाही ही चिंतेची बाब'

- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते वाग्धारा सन्मान प्रदान

 

            मुंबई, दि. १८ : भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करताततसेच विचारशीलताज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठीहिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जागविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.     

            साहित्यसंस्कृतीशिक्षणकला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी (दि. १८) राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते 'वाग्धारा नवरत्न', 'स्वयंसिद्ध', 'यंग अचिव्हर्सव जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह, अंधेरी, मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मनफ्रेंचमँडरिन या भाषा देखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

            आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे संवाद हरवत चालला. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हाट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाहीयास्तव वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.

            ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना 'वाग्धारा जीवन गौरवपुरस्कार प्रदान करण्यात आला.  छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना 'वाग्धारा नवरत्नसन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकरअभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना 'वाग्धारास्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला.    

            यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख,  'वाग्धारा'चे अध्यक्ष डॉ वागीश सारस्वतकार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह 'महक',  ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.

            सुदर्शन द्विवेदीसंगीता वाघेमंगला वाघेडॉ मुस्तफा युसूफ अली गोमइकबाल ममदानीवीरेंद्र सक्सेनाडॉ राजीव मिश्राडॉ जीवन संखे यांना  देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

0000

 

Maharashtra Governor presents 'Vagdhara' awards

in literature, art, journalism, social work

 

            Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Vagdhara Samman 2024' to 48 eminent personalities from across the country at a function held at Andheri, Mumbai. The Awards were instituted by 'Vagdhara' an organisation working in the area of Literature, Culture, Education, Art and Social Work.  

            Well known writer Nandlal Pathak (Literature) was presented the 'Vagdhara Jeevan Gaurav Samman'. Well-known Pandwani presented from Chhattisgarh Ritu Verma and senior journalist Rajesh Badal were given the 'Vagdhara Nav Ratna' Samman. Journalist and Editor Narendra Kothekar and actor Seema Biswas were presented the 'Vagdhara Swayamsiddh' Samman by the Governor.

            Head of the Selection Jury Jayant Deshmukh, President of 'Vagdhara' Dr. Vageesh Saraswat, Executive President Durgeshwari Singh 'Mehak', senior journalist Vimal Mishra were present.

0000


निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

  निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

 

            मुंबई, दि. १८ : मुक्तनिष्पक्षसर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी उत्कृष्ट योगदान देत राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले. 

            मुंबई येथे भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच आणि राज्यातील आगामी लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा, नितेश व्यास यांच्या नेतृत्वाखाली,  हिरदेश कुमार आणि  अजय भादूदोन्ही उप-निवडणूक आयुक्तांसह तसेच मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्यकायदा अंमलबजावणी संस्थांचे नोडल अधिकारीजिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारीपोलिस आयुक्त आणि सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत १६ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत ही आढावा बैठक झाली.

            यावेळी आयोगाच्या वरिष्ठ अधिका-यांनी राजकीय पक्षांसह सर्व संबंधित भागधारकांचा समावेश असलेल्या मुक्तनिष्पक्षसर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विशेषतः अपंग व्यक्तीट्रान्सजेंडर आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसह उपेक्षित गटांकडून मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यावर भर दिला. तसेच महिलातरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही दिले. क्षेत्र भेटीद्वारे गंभीर आणि असुरक्षित मतदान केंद्रे ओळखण्याचे आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना देण्यात आले. विशेषतः त्रुटीमुक्त मतदार यादी आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अत्यंत पारदर्शकतेने करण्याबाबत तसेच सर्व तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या.

            भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिवपोलीस महासंचालककाही प्रशासकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव यांची भेट घेतली आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळपायाभूत सुविधा इत्यादींची खात्री करण्याबाबत काही निर्देश दिले.

            सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, अधीक्षक यांच्यासह आयोजित केलेल्या विशेष बैठकीत लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीबाबत भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर त्यांचे तपशीलवार सादरीकरण केले. पोलीस आयुक्त/अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीप्रतिबंधात्मक कारवाई आणि रोख रक्कमदारू आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्याबाबतची अंमलबजावणी स्पष्ट केली. पोलिस विभाग आणि इतर अंमलबजावणी संस्थांनी अनधिकृत रोकडदारूड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर दक्षता वाढवावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने दिले.

गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत

 गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत

केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

            मुंबईदि. १८ : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे गवसे आणि दर्डेवाडी (ता. आजरा) ही गावे इको सेन्सिटीव झोन मधून वगळण्याबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली जाईल. या गावातील परिस्थिती अभ्यासून त्याप्रमाणे निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईलअशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

            मंत्रालयातील परिषद सभागृहात यासंदर्भातील बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि संबंधित गावांतील पदाधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीआजरा तालुक्यातील या दोन गावांप्रमाणेच इतर काही गावांतही इको सेन्सिटिव झोनच्या अनुषंगाने प्रश्न आहेत. त्याबाबतही त्रिसदस्यीय समिती नेमून गावे वगळण्याबाबत निर्णय घेण्याची कार्यवाही केली जाईल.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीया गावांचा परिसर हा अनेक वर्षापासून औद्योगिकदृष्ट्या वाढला आहे. इको सेन्सिटिव झोनमुळे स्थानिक विकासाला खीळ बसणार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. वस्तुस्थिती तपासून यामध्ये निर्णय घेतला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.      

0000

दीपक चव्हाण/विसंअ/


 

कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या

 कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या

- मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

            मुंबईदि. १८ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करावे असे आवाहन कौशल्यरोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री प्रभात लोढा यांनी केले.

            कौशल्यरोजगारउद्योजकता आयुक्तालय येथे कौशल्य विकास विभागामार्फत सर्व उप आयुक्त,  सहाय्यक आयुक्त व जिल्हा कौशल्य विकास समन्वयक अशा सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर उपस्थित होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून गावागावात रोजगार निर्मिती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेतच ट्रेनिंग पार्टनर व ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख  देखील यांनी या कामासाठी सहकार्य करावे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामहाराष्ट्र इंटरनॅशनलनाविन्यता, सारथी या योजना प्रभावीपणे राबवाव्या. 19 जानेवारी 2024 रोजी जागतिक जागतिक कौशल्य स्पर्धेसह आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनेबाबत काही शंका असल्यास दोन दिवस होणाऱ्या कार्यशाळेत निश्चित सर्वांना शंका समाधान होईल. याबाबतीत काही सूचना किंवा अडचणी असतील तर जरूर सांगाव्यात. त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

****

राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारित लाइट अँड साऊंड शो होणार सादर

 राष्ट्र पुरुषांच्या जीवनावर आधारित

लाइट अँड साऊंड शो होणार सादर

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिरगाव चौपाटी येथे टिळक उद्यानातील नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

            मुंबईदि. 18 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकमान्य टिळक उद्यानात सुरू केलेला लाइट ॲण्ड साऊंड शो उपक्रम कौतुकास्पद आहे. आगामी काळात राष्ट्र पुरुषांच्या जीवनावरील लाइट ॲण्ड साऊंड शो पहावयास मिळतीलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक उद्यानाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पणस्वराज्यभूमी फलकाचा अनावरण सोहळा व लाइट ॲण्ड साऊंड शोचे उदघाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाआमदार प्रवीण दरेकरआमदार प्रसाद लाडबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशीलोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य उज्ज्वला मेहेंदळे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेभारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांना प्रेरित केले. त्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असे ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेल्या या उद्यानात अर्थात स्वराज्य भूमीत महानगरपालिकेने केलेले नूतनीकरणाचे काम कौतुकास्पद आहे. यावेळी मंत्री श्री. लोढामंत्री श्री. केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती जोशी म्हणाल्या कीलोकमान्य टिळक उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून लेझर शोमुलांसाठी ग्लो गार्डन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा ‘पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

 दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा

पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

दहा विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

           

            मुंबईदि. १८ :- पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषीउद्योगसेवापर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांनापूरक-सहाय्यभूत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यात यावी. या माध्यमातून उद्योजकतारोजगार वाढविण्यात यावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात महसूलनियोजनसामान्य प्रशासनजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकासमाहिती तंत्रज्ञानमाहिती व जनसंपर्कपशुसंवर्धनदुग्धविकास अशा १० विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. बैठकीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी. गुप्तासामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेजलसंपदाखारभूमीलाभक्षेत्र विकास विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैननियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेपशुसंवर्धनदुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढेवित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

            विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्याच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्याबाहेरपरदेशात निर्यात वाढली पाहिजे. राज्यासह राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय बाजारात दूधअंडीमासेमांसलोकर या उत्पादनांना मोठी मागणी आहे. मागणीनुसार दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करून नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पुढील १५ वर्षांचा पशुधन बृहद विकास आराखडा’ तयार करावा. त्यासाठी पशुधनाची उत्पादकता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने नवनवीन संशोधनअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पशुधनावरील खर्च कमी करतानाच त्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी संतुलित पशुखाद्यरेतनपशुरोग निदानलसीकरणावर भर देण्यात यावाअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले पाहिजेत. मुख्य सिंचन प्रकल्पाचे काम सुरु असतानाचप्रकल्पात साठविले जाणारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे कालवेवितरिकांची कामे केली पाहिजेत. जुन्या कालव्यांच्या दुरुस्तीची कामे करून पाणी गळती थांबवावी. नवीन प्रकल्पांमध्ये केवळ नलिकेद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामांचा समावेश करावा.

            पर्यावरण विषयाबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेनदीनाल्यांचे वाढलेले प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नद्यांमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रगत तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कारखानाऔद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर वाढीसाठी प्रयत्न करावा. पर्यावरण संतुलनासाठी सर्व निकषांची पूर्तता कटाक्षाने करावी. प्रक्रिया केलेले पाणीच नदीत सोडले जाईलयासाठी ठोस कारवाई करावी. पाणीहवा यांचे प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. भविष्यातील वाढती लोकसंख्यावाहनांचापाण्याचाजमिनीचा वापर लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत.

-------०००------

वंदना थोरात/विसंअ/

राज्य सेवा मुख्य २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 राज्य सेवा मुख्य २०२२ ची

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 

            मुंबईदि. १८ : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

            राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबईनागपूरनाशिकछत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे  गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता ६२३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.

0000

Featured post

Lakshvedhi