Wednesday, 17 January 2024

विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांची महत्वाची भूमिका

 

विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांची महत्वाची भूमिका


- राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

 

            पुणेदि. १६ : विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्द‍िष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावाअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी. परमानंदनकुलपती डॉ. जी. के. शिरुडेकुलसचिव डॉ. एस. बी. आगाशेपरीक्षा नियंत्रक डॉ. मित्तल मोहितेअधिष्ठाता डॉ. डिंपल सैनीडॉ. बीजू पिल्लई आदी उपस्थित होते.

            विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणालेनव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्वाचे आहे. यादृष्टीने बालाजी विद्यापीठानेदेखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा. आपला पदवी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील.

            आज वेगवान प्रगतीसाठी जगात मल्टिटास्किंगआणि मल्टिस्किलींगआवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे. विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपतीगायककलाकारव्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाशी असलेले नाते कायम ठेवून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपालांनी केले.

            यशस्वी स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री.बैस म्हणालेबालाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ पुढे आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थींनींसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवणे विशेष आहे अशा शब्दात त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. स्नातकांनी देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावीअसे आवाहन त्यांनी केले.

            कुलगुरू डॉ.परमानंदन म्हणालेअपयश यशाची पहिली पायरी असून चुकांमधून विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमण केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थी यशस्वी झाले तर देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल. देशासाठी काय करता येईल याचा विचार करावा आणि त्यानुसार प्रत्येकाने प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            कुलगुरु डॉ. जी. के. शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

            पदवीपदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

            कार्यक्रमाला विविध विद्या शाखांचे संचालकविद्यार्थीविद्यार्थीनी उपस्थित होते.


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित उपक्रमास

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            नवी दिल्ली16 : जाणता राजामामाच्या गावाला जाऊ या, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

            मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

            मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन मुलींना विभागून देण्यात आले.  तसेचसहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावेयासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

            नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपालशिक्ष‍ीका भावना बावनेसुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.

            या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होते. 

मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 

            मुंबईदि. 16 :- महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने (ICAR) माती परिक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले.               मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  झालेल्या बैठकीस  मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सु. म. काळेकृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटीलफलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोत्रेमृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिव शुभांगी पोटेमृद व जलसंधारणचे सहसंचालक पांडुरंग शेळकेकृषी उपसंचालक शरद सोनवणे उपस्थित होते.

            कृषी विकास दर वाढवण्यास मातीची गुणवत्ता व पोषकता महत्त्वाची असून यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.  मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावेअशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

            बैठकीत राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन संस्थेचे (ICAR) संचालक नितीन पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण केले.


इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट

  इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक


गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केला पाठपुरावा


 


            मुंबई, दि. 16 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.


            सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादनविषयक तंत्रज्ञान राहणार असून, पर्यावरण रक्षण हा त्याचा मुख्य गाभा असेल. त्यामुळे हा संपूर्णत: पर्यावरणपूरक स्टील प्रकल्प राहणार आहे, अशीही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी दिली. गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून, या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत. गडचिरोली हे देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून, तेथे ते राज्य सरकारसोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत.


            गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. कोनसरी येथे एका प्रकल्पाचे उदघाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन सुद्धा लवकरच होणार आहे. श्री. फडणवीस मुख्यमंत्री असताना या कोनसरी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आता या नव्या गुंतवणुकीतून गडचिरोली आणि पर्यायाने विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळणार

 आहे.


००००


वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

 वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका

देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

 

            मुंबई, दि. 16 : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या.

            आ. रमेश पाटीलविविध प्रशासकीय अधिकारी आणि पालघरडहाणू आणि वाढवण बंदर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीवाढवण बंदर परिसरात किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. हे बंदर समुद्रात होणार असल्याने भूसंपादनाची त्याला आवश्यकता नाही. केवळ रस्ते आणि रेल्वेसाठी जी जागा लागेलत्यासाठी बाजारभावाप्रमाणे चौपट मोबदला देण्यात येईल. तसेच जे मासेमार प्रभावित होण्याची शक्यता आहेत्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. प्रकल्पबाधित मासेमारांच्या पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. त्यांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यात येईल.

            या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असूनत्यात स्थानिकांनाच मोठ्या संख्येने रोजगार मिळेलहे निश्चित केले जाईल. मासेमारांच्या मुलांचे रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षणहॉस्पीटल इत्यादी सुविधा इत्यादींकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष दिले जाईल. या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातच अत्याधुनिक फिशिंग हार्बरची तरतूद करण्यात आली आहे. याशिवायया भागात जेएनपीटीमार्फत विविध विकास कामे सुद्धा केली जावीतअसेच नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि त्यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना याची एक पुस्तिकाच प्रकाशित करुन ती संबंधितांना देण्यात यावीत्यामुळे कुणाच्याही मनात कोणती शंका राहणार नाहीअसेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.

००००

दावोस येथील महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 दावोस येथील महाराष्ट्राच्या दालनाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            दावोस, दि. 16 : दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे (महाराष्ट्र पॅव्हेलियन) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसह उद्योगमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            54 व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस येथे यावर्षी मी पुन्हा आलो आहेगेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. यावर्षी उत्पादनअन्न प्रक्रियाडिजिटल- नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी  गुंतवणूक येईलयावर विशेष भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरीमहिलातरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईलयावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

दावोस येथे पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

दावोस  येथे पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

 

            मुंबई, दि. 16 : आज दावोस





येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते

ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार

            ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर 25 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

             यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी श्री जैन यांची चर्चा झाली.

जिंदाल यांच्यासमवेत 41 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

            देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी 41 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे 5000 नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

            महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स 4000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल. अशाप्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

            महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहउद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

००००

Featured post

Lakshvedhi