Wednesday, 17 January 2024

मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 

            मुंबईदि. 16 :- महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने (ICAR) माती परिक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले.               मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  झालेल्या बैठकीस  मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सु. म. काळेकृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटीलफलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोत्रेमृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिव शुभांगी पोटेमृद व जलसंधारणचे सहसंचालक पांडुरंग शेळकेकृषी उपसंचालक शरद सोनवणे उपस्थित होते.

            कृषी विकास दर वाढवण्यास मातीची गुणवत्ता व पोषकता महत्त्वाची असून यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.  मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावेअशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

            बैठकीत राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन संस्थेचे (ICAR) संचालक नितीन पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi