Wednesday, 17 January 2024

पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार

 

पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना


महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणा

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

            मंत्री श्री. लोढा म्हणालेमहाराष्ट्र राज्य कौशल्यव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्यरी-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.

            महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालयेवैद्यकीय उपकरणेक्लिनिकल चाचण्याआउटसोर्सिंगटेलिमेडिसिनवैद्यकीय पर्यटनआरोग्य विमावृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी 50 लाख आहेतर उपलब्धता केवळ 12 लाख आहे. तसेच एका डॉक्टर मागे साधारणत: 5 क्लिनिकल आणि 5 नॉन-क्लिनिकल आरोग्य सेवकांची आवश्यकता असते. कोविड व त्यानंतरच्या काळात मोठ्याप्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. विकसित देशात वृध्दांची काळजी घेण्याच्या (Old age care) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

            भारतात वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षण उच्चत्तम गुणवत्तेचे आहे. वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षणानंतर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवकांसाठी पदविका (Diploma) अभ्यासक्रमांत व प्रमाणपत्र (Certificate) अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्याचे निर्देशीत आहे.

            मंडळाद्वारे पॅरामेडिकल गटातील 30 प्रमाणपत्र अभ्यासक्रम व 11 पदविका अभ्यासक्रमात प्रति वर्षी राज्यभरातील 300 संस्थांमधून साधारणत: 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. तथापिविविध नियामक संस्थांच्या अटी व परदेशात आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी सक्षम यंत्रणेकडे नोंदणी असणे अनिवार्य असल्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ‍आता मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्यास प्रारंभ झाला आहे. मंडळाने पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत मागील ३ वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे निकालपत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी प्रक्रियेत पडताळणीसाठी सादर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्र पडताळणी सोयीस्कर झाले आहे.

नोंदणीकरिता अर्ज करण्याची पद्धत

            https://www. maharashtraparamedicalcouncil. org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. वैयक्तिक दस्तऐवजमंडळाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र व गुणपत्र अपलोड करावे व अर्ज शुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे अर्जांची छाननी व पडताळणी करण्यात येईल. कौन्सिलद्वारे ई-मेलद्वारे कळविण्यात आल्यावर नोंदणीशुल्क भरावे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याद्वारे नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. अधिक माहितीकरीता मंडळाचे संकेतस्थळ https://msbsvet. edu. in वर माहितीपुस्तिका उपलब्ध आहे.

            पॅरामेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Medical Laboratory Technician), किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ (Radiography & Ultra-Sonography Technician), हृदयचिकित्सा तंत्रज्ञ (Cardiology Technician), मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ (Neurology Technician), रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician), ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ (Optometry Technician), शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ (Operation Theatre Technician), रक्तशुद्धीकरण तंत्रज्ञ (Dialysis Technician) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/


 

वृत्त क्र. 185


साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) :  अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत असलेल्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ३० रोजी सोडत काढण्यात येणार आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर कार्यालयातही ग्रंथदालन नोंदणी करता येवू शकते. नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अधिक माहितीसाठी श्यामकांत भदाणे ९४२३९०३०४४ यांच्याशी संपर्क साधावा.


संमेलन सर्व वाचक, साहित्यिक व नागरिकांसाठी खुले आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र ज्यांना निवास व भोजनाची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चार हजार रुपये भरुन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. ही व्यवस्था २, ३ व ४ फेब्रुवारी दरम्यान असेल. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.पी.बी.भराटे ९४२३९३४७९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7

पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार

 पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना

महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. 16 : महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

            मंत्री श्री. लोढा म्हणालेमहाराष्ट्र राज्य कौशल्यव्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी तर उपलब्ध आहेतच परंतु पगार देखील आकर्षक आहेत. या क्षेत्रात झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नवीन कौशल्यरी-स्किलिंग व अप-स्किलिंगद्वारे नियमित प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून राज्य शासन उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.

            महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालयेवैद्यकीय उपकरणेक्लिनिकल चाचण्याआउटसोर्सिंगटेलिमेडिसिनवैद्यकीय पर्यटनआरोग्य विमावृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MOHFW) तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी

झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार

 झुरीकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या निमंत्रणाचा मुख्यमंत्र्यांकडून स्वीकार

 

            दावोसदि. 16 :- जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची 2024 ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मोठ्या अपूर्वाईने स्वागत करण्याचे निश्चित केले आहे.

            भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरीव्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

            बृहन्महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणालेमुख्यमंत्री श्री. शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत.  इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहेहे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत.

            महेश बिराजदार (मुळचे लातूर)मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करतानात्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे.

            श्रीमती किर्तीमालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळस्वित्झर्लंड)मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील श्री. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहेयाचाही खूप मोठा आनंद आहे.

            शेखर काकडे यांनी पत्नी विद्याकन्या बिल्वा काकडे (झुरीक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो.

            प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.

विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांची महत्वाची भूमिका

 

विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांची महत्वाची भूमिका


- राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत श्री बालाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

 

            पुणेदि. १६ : विकसीत भारताचे उद्द‍िष्ट गाठण्यासाठी देशातील विद्यापीठांची महत्वाची भूमिका असून स्नातकांनी देशाच्या अमृतकाळातील प्रत्येक क्षण या उद्द‍िष्ट प्राप्तीसाठी समर्पित करावाअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            श्री बालाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी. परमानंदनकुलपती डॉ. जी. के. शिरुडेकुलसचिव डॉ. एस. बी. आगाशेपरीक्षा नियंत्रक डॉ. मित्तल मोहितेअधिष्ठाता डॉ. डिंपल सैनीडॉ. बीजू पिल्लई आदी उपस्थित होते.

            विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणालेनव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुक्त आणि दूरस्थ शिक्षण महत्वाचे आहे. यादृष्टीने बालाजी विद्यापीठानेदेखील ऑनलाईन अभ्यासक्रमावर भर द्यावा. आपला पदवी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील.

            आज वेगवान प्रगतीसाठी जगात मल्टिटास्किंगआणि मल्टिस्किलींगआवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंग संदर्भात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करावे. विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रसिद्ध उद्योगपतीगायककलाकारव्यावसायिक नेतृत्वाला विद्यापीठात आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाशी असलेले नाते कायम ठेवून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपालांनी केले.

            यशस्वी स्नातकांचे अभिनंदन करताना राज्यपाल श्री.बैस म्हणालेबालाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाने शिक्षणासोबत भारतीय मूल्य आणि संस्कृतीवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही विद्यापीठ पुढे आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासावर दिलेला भर त्याचप्रमाणे विद्यार्थींनींसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवणे विशेष आहे अशा शब्दात त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. स्नातकांनी देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावीअसे आवाहन त्यांनी केले.

            कुलगुरू डॉ.परमानंदन म्हणालेअपयश यशाची पहिली पायरी असून चुकांमधून विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमण केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थी यशस्वी झाले तर देशाची प्रगती होईल आणि देश पुढे जाईल. देशासाठी काय करता येईल याचा विचार करावा आणि त्यानुसार प्रत्येकाने प्रयत्न करावे असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            कुलगुरु डॉ. जी. के. शिरुडे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

            पदवीपदव्युत्तर तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

            कार्यक्रमाला विविध विद्या शाखांचे संचालकविद्यार्थीविद्यार्थीनी उपस्थित होते.


मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त आयोजित उपक्रमास

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

            नवी दिल्ली16 : जाणता राजामामाच्या गावाला जाऊ या, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या काव्य स्पर्धेला नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

            मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

            मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन मुलींना विभागून देण्यात आले.  तसेचसहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावेयासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

            नूतन मराठी शाळेचे प्राचार्य गुलशन नागपालशिक्ष‍ीका भावना बावनेसुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता.

            या कविता स्पर्धेस पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा उपस्थित होते. 

मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

 

            मुंबईदि. 16 :- महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने (ICAR) माती परिक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले.               मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात  झालेल्या बैठकीस  मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सु. म. काळेकृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटीलफलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोत्रेमृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिव शुभांगी पोटेमृद व जलसंधारणचे सहसंचालक पांडुरंग शेळकेकृषी उपसंचालक शरद सोनवणे उपस्थित होते.

            कृषी विकास दर वाढवण्यास मातीची गुणवत्ता व पोषकता महत्त्वाची असून यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.  मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावेअशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

            बैठकीत राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन संस्थेचे (ICAR) संचालक नितीन पाटील यांनी याबाबतचे सादरीकरण केले.


Featured post

Lakshvedhi