Thursday, 11 January 2024

पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना, कोथेरी लघुपाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज

 पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना,

कोथेरी लघुपाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर

            राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पातंर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूरजि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाडजि.रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            राज्यामध्ये १ जानेवारी २०१४ पूर्वीच्या व पुनर्वसन अधिनियम१९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पातंर्गत बाधित गावठाणातील प्रकल्पबाधित कुटुंबांना घराच्या बांधकामाचा खर्चसर्व नागरी सुविधा विकसित करण्यासाठी लागणारा खर्च व स्थलांतरीत करताना देय असलेले भत्ते यापोटी खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेज अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री (ग्रामीण) आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी   रु.1,65,000/-

निर्वाह भत्ता

अ) बाधित स्थलांतरीत कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी

ब) अनुसूचित जाती आणि  अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त        

अ) रु. 3,000/-

ब)रु.50,000/-

वाहतूक भत्ता

प्रत्येक बाधित स्थलांतरीत कुटुंबाला वाहतूक खर्च   रु.50,000/

पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत

गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एकवेळची आर्थिक मदत          रु.25,000/-

कारागीर/छोटे व्यापारी यांना एकवेळचे अनुदान      रु. 50,000/-

पुनर्स्थापना भत्ता

घर बदलल्यानंतर एकवेळचे  पुनर्स्थापना भत्ता        रु.50,000/-

            वर दर्शविण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च (प्रती भूखंड प्रमाणे) व त्या व्यतिरिक्त त्यावर २५ टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली  आहे.

         ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झालेले नाहीअशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज  घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला (ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असे) परत करण्यात येईल.

            पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहणखेड व मौजा पर्वतापूर ता. जि. अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघुपाटबंधारे योजनाता. महाडजि. रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगांव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणेनिधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


फ्लाइंग कंदील विक्री, साठवणूक व वापरावर बंदी

 फ्लाइंग कंदील विक्रीसाठवणूक व वापरावर बंदी

           

            मुंबईदि. 10 : मानवी जीवन व सार्वजनिक शांततासुरक्षितता यांना गंभीर धोकाअसामाजिक घटकांच्या कारवायांची शक्यता लक्षात घेता फ्लाइंग कंदिलाचा वापरविक्री व साठवणूक बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 29 जानेवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहेअसे पोलीस उपायुक्त (अभियान)विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

            फ्लाइंग कंदिलाद्वारे असामाजिक घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. मानवी जीवन व सार्वजनिक शांततासुरक्षितता यांना गंभीर धोका निर्माण होऊ नये म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईलअसेही आदेशात नमूद आहे.

******

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता एक लाख रुपये अनुदान

 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी

योजनेसाठी आता एक लाख रुपये अनुदान

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 

            मुंबईदि. 10 : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे असे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

             मंत्री  श्री. महाजन म्हणाले कीकेंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनाशबरी आवास योजनाआदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येते.

                  मंत्री श्री. महाजन म्हणाले कीपंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविताना जागेची कमतरता - राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही. पंडित दीनदयाळ जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य खरेदी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ५० हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र, एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत अनुज्ञेय अर्थसाहाय्यामध्ये मुद्रांक शुल्कनोंदणी शुल्क व शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहेत्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची रक्कम कमी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौरस फूटसाठी ही रक्कम मर्यादा ५० हजार रुपये वरून १ लाख रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.

******

मोरवा फ्लाइंग क्लब फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु करावा

 मोरवा फ्लाइंग क्लब फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु करावा

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबई दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाइंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत तेथील फ्लाइंग क्लब सुरु होईलया पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यापूर्वी 26 जानेवारी रोजी हा फ्लाइंग क्लब सुरु करण्यासंदर्भांत कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे जरी उशीर होणार असला, तरी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन चंद्रपूरवासियांच्या स्वप्नांची पूर्ती होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे चंद्रपूर येथील फ्लाइंग क्लब संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेअधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णीदूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीचंद्र्पूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेफ्लाइंग क्लबच्या अनुषंगाने ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहेत्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरणविभागीय आयुक्तालयजिल्हा प्रशासनजिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहेती मिळण्याबाबत तत्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे त्या बाबी पूर्ण कराव्यातअशी सूचनाही त्यांनी केली.  

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेनक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावेयासाठी चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान तीन शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

0000

सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट

 सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट


            सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. 


          सत्यशोधक हा मराठी चित्रपट शिक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना चालना देणारा आहे. या चित्रपटात महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे जीवन, महिला आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणासाठीचे त्यांचे अमुल्य योगदान व त्यांच्या परिश्रमाची कथा दाखविण्यात आलेली आहे. या चित्रपटाद्वारे जनमानसात योग्य तो सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.


            चित्रपटाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रेरणादायी पैलूंचा विचार करता तो सर्वांना पाहता यावा यासाठी प्रोत्साहन म्हणून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चित्रपटगृहांनी या चित्रपटाच्या तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवाकर (एसजीएसटी) 30 एप्रिल, 2024 पर्यंत कालावधीत प्रेक्षकांकडून वसूल न करता स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. तिकीट विक्री वरील शासन तिजोरीत भरणा केलेल्या राज्य वस्तू व सेवाकराचा (एसजीएसटी) परतावा देण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.


-----०-----

डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार सर्वंकष करण्यासाठी योजनेत सुधारणा

 डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार

सर्वंकष करण्यासाठी योजनेत सुधारणा

- आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

            मुंबईदि. १० : उत्कृष्ट कार्य करणारी उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रूग्णालयेउपजिल्हा रूग्णालयेस्त्री व जिल्हा रूग्णालयेखाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ २६ फेब्रुवारी शासनातर्फे देण्यात येतात. या पुरस्कार योजनेत सुधारणा करण्यात येत असून पुरस्कार सर्वंकष करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

            डॉक्टरांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आग्रही आहेत. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या धोरणांमधून पुरस्कार सर्वंकष करण्यात आले आहे. पुरस्काराने गौरविल्यानंतर अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोविडसारख्या साथरोग काळात डॉक्टरआरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारीकर्मचारी यांनी लोकांचे जीव वाचविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. 

            राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट डॉक्टर व सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टरसर्वोत्कृष्ट उपकेंद्रप्राथमिक आरोग्य केंद्रेजिल्हा रूग्णालयस्त्री रूग्णालयस्वयंसेवी संस्थामानसिक आरोग्य केंद्रकर्करोग रूग्णालय,  ग्रामीणकुटीरउपजिल्हा यापैकी सर्वोत्कृष्ट असे एक रूग्णालय पुरस्कार देण्यात येतील. अशापद्धतीने जिल्हास्तरावरही पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्तआरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यामध्ये संचालक आरोग्य सेवा मुंबई व पुणेअतिरिक्त संचालक आरोग्य सेवा (रूग्णालय) मुंबईमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार आहे. तर सदस्य सचिव हे आरोग्य सेवा राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक असणार आहे. 

               विभागीय स्तरावर निवड समितीमध्ये संबंधीत आरोग्य मंडळाचे उपसंचालक अध्यक्षडॉक्टर संघटनेचे प्रतिनिधीस्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधीमहिला डॉक्टर प्रतिनिधीजिल्हा माहिती अधिकारीमंडळ कार्यालयातील सहाय्यक संचालकजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सक सदस्य असणार आहे. तर आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सदस्य सचिव असणार आहे.

            स्वयंसेवी संस्थेच्या निवडीसाठी राज्यात कार्यरत असणारीधर्मदाय आयुक्तांकडे किमान पाच वर्षापूर्वी नोंदणी केलेलीराष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लगतचे किमान पाच वर्ष भरीव सहभाग असलेलीसनदी लेखापालमार्फत लगतच्या किमान तीन वर्षाचे लेखापरीक्षण केलेलीआरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग असणारीशेतकऱ्यांच्या आत्महत्या व समुपदेशन या क्षेत्रात काम केलेले असणारीदुर्बल घटकांसाठी दुर्गम भागात आरोग्य विषयक उपक्रमआरोग्य शिक्षण विषय उपक्रम राबविलेलीएड्सकर्करोग आदी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर व राज्यात काम केलेले संस्था असावी.

            वैयक्तिक पुरस्कारासाठी किमान दहा वर्ष अखंड सेवासंस्था रूग्णालय त्यांच्या कामांमध्ये उल्लेखनिय सहभागआरोग्य शिक्षण उपक्रमात सहभाग असायला पाहिजे. पुरस्कारार्थींना राज्यस्तरीय कार्यक्रमात स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.  

*****

क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत

 क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत

मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. १० :  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तालुका  व जिल्हा क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणासाठी निधी वितरित केला आहे. त्या संकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

            मंत्रालयात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

             माणगावतळाश्रीवर्धनम्हसळारोहा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी वाढीव निधी आवश्यक असेल, तर तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत.  क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराच्या सोयीसुविधेसहसंरक्षक भिंतअंतर्गत रस्तेचेंजिंग रुमजुनी इमारत दुरुस्तीविद्युतीकरणपाणी व्यवस्था या सुविधाही चांगल्या दर्जाच्या देणे गरजेचे या क्रीडा संकुलनामुळे ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध होईल असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

            या बैठकीला जिल्हा व तालुका क्रीडा अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi