Saturday, 30 December 2023

भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे

 भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे

राज्यपाल रमेश बैस

'मेरी माटी मेरा देशअभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

 

            मुंबईदि. २९ : देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला देश विश्वगुरू व्हावाअसेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेऊन कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरु होईलअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

            राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते  प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने 'मेरी माटी मेरा देशया अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

            याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता रायराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.              

            यावेळी राज्यपाल श्री.बैस म्हणालेदेशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासीक वारसा जोपासण्याचे काम केले.

            या अभियानात महाराष्ट्राने दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली यांचा अभिमान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपण माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांनाशहिदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन साजरा केला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्नं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करुया, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

0000


Friday, 29 December 2023

बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 बृहन्मुंबई हद्दीत 9 जानेवारीपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी

 

            मुंबईदि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 9 जानेवारी 2024 पर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

           या आदेशानुसार शस्त्रेअग्नीशस्त्रेबॅटनतलवारीभालेदंडुकेविना परवाना बंदुकाचाकूकाठ्या किंवा लाठ्या,इतर कोणतीही वस्तू जी शारीरिक हानी करण्यासाठी वापरली जाऊ शकतेअशी हत्यारे बाळगणेस्फोटके वाहून नेणेप्रेतआकृतीपुतळे यांचे प्रदर्शनसार्वजनिक टिकाकरण उच्चारगाणी गाणेसंगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात येत आहे.

         कोणत्याही सरकारी किंवा सरकारी उपक्रमाच्या सेवेतनोकरीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कर्तव्याच्या स्वरूपानुसार शस्त्रे बाळगण्यासाठी तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखाचौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहेअसे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

 भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महासंकल्प रोजगार अभियानात महानिर्मितीकडून १०४२ उमेदवारांची निवड

       विजया बोरकर यांची ‘महानिर्मिती’च्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड

 

            मुंबईदि. २९ :- राज्यात खात्रीशीरदर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनी समोरील आव्हान आहे. यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी महाराष्ट्र तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधने राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रिक्त पदे भरणेबाबतराज्य शासनाच्या "महासंकल्प रोजगार" अभियानाअंतर्गत महानिर्मितीद्वारे सरळसेवा भरती प्रक्रियेत १२ प्रातिनिधिक उमेदवारांना आज नियुक्ती पत्र वितरीत करण्यात आले. या समारंभात ते सह्याद्री अतिथीगृह येथे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगनमहापारेषणचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमारसूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

            महाराष्ट्रात युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ हजार पदभरती करण्याचा शासनाने निर्धार केला आणि महानिर्मितीने पारदर्शकतेसह जलदगतीने मागील एक वर्षाच्या काळात विविध संवर्गातील १०४२ उमेदवारांची निवड केली ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. शिवाय १५० उमेदवारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. पारदर्शक भरतीमुळे युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतोअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. विजया बोरकर यांची महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळसेवा भरतीद्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचे आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नवीन उत्साहाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

            भारत विकसनशील आणि जलदगतीने आर्थिक विकास करणारे राष्ट्र आहे. या आर्थिक विकासाचा कणा ऊर्जा विभाग आहे. आगामी काळात ऊर्जेची मागणी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने ऊर्जा क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यासाठी तीनही कंपन्यांनी आपापल्यापरीने सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०३५ पर्यंतचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सद्य:स्थितीत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात  बदल होईल. पंप स्टोरेजग्रीन हायड्रोजनसारखे धोरण राज्याने तयार केले आहे असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले कीऊर्जा पुरवठ्यावर गुणवत्तापूर्ण जीवन,औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे. महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये लवकरच सुमारे १५ हजार भरती प्रक्रिया होणार आहे. त्यांनी मागील दीड वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती देत ऊर्जा विभागाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

            प्रास्ताविकातून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनबलगन यांनी सांगितले कीमानव संसाधन विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल स्वरूपात रुपांतर करण्यात येणार असून त्याद्वारे बदलीबढती टपाल,उच्च श्रेणी लाभ गोपनीय अहवाल ई - सेवा पुस्तिकेचा  समावेश करण्यात येणार आहे . राज्यभरात महानिर्मितीचे एकूण 9 हजार 915 प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी 6814 व्यक्तींना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. 2 हजार 103 पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण  देण्यात येत आहे.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते १२ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आलेत्यात विजया बोरकर (मुख्य अभियंता)राहुल नाळे (उप मुख्य अभियंता)अरुणा भेंडेकर (अधीक्षक अभियंता)जयदीप राठोड (लॅब केमिस्ट)अक्षय शिरसाट (सहाय्यक अभियंता)ज्ञानेश्वर कारंडे (सहाय्यक अभियंता)प्रकृती यादव (सहाय्यक अभियंता)प्रथमेश सोनजे (सहाय्यक अभियंता)सागर बागुल (कनिष्ठ अभियंता)मंगेश लाखे (कनिष्ठ अभियंता)तेजस काटे(कनिष्ठ अभियंता)वैभव सोनवणे(कनिष्ठ अभियंता) यांचा समावेश होता.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनीतर आभार प्रदर्शन महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी केले. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक बाळासाहेब थिटेसंजय मारुडकरअभय हरणेकार्यकारी संचालक डॉ.नितीन वाघपंकज नागदेवतेउपसचिव नारायण कराडतसेच मुख्य अभियंते आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झाडाच्या मुळांपासून पूल बनण्याची गोष्ट !

 झाडाच्या मुळांपासून पूल बनण्याची गोष्ट !


- ‘लिव्हिंग रूट ब्रीज’ किती वर्षांनी बनतो?
(मेघालय डायरी ५)

मेघालयातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे झाडांच्या मुळांपासून तयार केलेले पूल अर्थात ‘लिव्हिंग रूट ब्रीज’. तिथे असे पूल जागोजागी आहेत. काही गावांमध्ये तर त्यांची संख्या शंभराच्या घरात आहे, असे स्थानिकांकडून समजते. 

त्यांचा उपयोग काय?... तर पाण्याचे प्रवाह किंवा खोल दरी ओलांडून पलीकडे जाण्यासाठी. आपल्या गरजांसाठी स्थानिक संसाधनांचा किती चांगला वापर करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण. पूर्वीच्या काळी, अगदी ३० - ४० वर्षांपूर्वीपर्यंत फारशी आधुनिक साधने नसताना या पुलांमुळे दळणवळण किती सुकर झाले असावे, याची कल्पना करता येते. कारण तिथला धो-धो पाऊस आणि डोंगर-दऱ्यांची भूरचना.

आताही या पुलांचा उपयोग होतो, पण सध्याच्या काळात त्यांचा सर्वाधिक उपयोग पर्यटनासाठी होतो. हे पूल पर्यटकांना आकर्षित करतात. या पुलांवरून चालणे, त्यावर उभे राहून फोटो काढणे... हे सर्वत्र पाहायला मिळते. 

पण हे पूल किती जुने आहेत, एक पूल तयार होण्यासाठी किती वर्षे लागतात, ते नेमके कसे तयार केले जातात... असे अनेक प्रश्न घेऊन मी तिथे गेलो होतो. अनेकांशी बोलून, ते प्रत्यक्ष पाहून या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्नही केला. त्यातून हे पूल बनण्याची गोष्ट समजली. ती फारच भन्नाट आहे.

तिथले अनेक पूल हे काही शतकांपासून अस्तित्त्वात आहेत. पूर्वी पाण्याचे प्रवाह ओलांडणे, विशेषत: पावसाळ्यात शक्य होत नसे. इतर वेळीसुद्धा ते पोहून जाणे किंवा पायी पाण्यातून जाणे सोयीचे नसे. त्यासाठी हे पूल. हे पूल करण्यासाठी गरज असते ती पारंब्या असलेल्या झाडांची. भारताच्या संदर्भात सांगायचे तर वडाच्या झाडाची.

जिथे पूल हवा आहे, तिथे प्रवाहाच्या एका काठावर असे झाड असावे लागते किंवा लावावे लागते. वडाचे झाड चांगले वाढले की त्याला पारंब्या येण्यासाठी साधारणपणे वीसेक वर्षे लागतात. पण केवळ सुरुवातीला येणाऱ्या पारंब्या असून चालत नाहीत. या पारंब्या जमिनीला लागतात तेव्हा त्यांना उप-पारंब्या फुटणे (ब्रँचिंग) सुरू होते. 

या उप-पारंब्या फुटल्या, वाढायला लागल्या की लोक एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत बांबूचा सांगाडा तयार करतात. पारंब्या जशा वाढतील, तशा त्यांना या सांगाड्यातून विणून घेतात आणि मग या पारंब्या जाडजूड होण्याची वाट पाहतात. त्यासाठी आणखी वीसेक वर्षे जातात. मग या पुलावर मोठाले गोटे टाकून त्याला मजबुती दिली जाते, मुळ्यांमधे असलेल्या फटी बुजवल्या जातात. मग तो पूल वापरण्याजोगा बनतो.

म्हणजे झाड लावल्यापासून हा पूल वापरण्यायोग्य होईपर्यंत सारे सुरळीत पार पडले तर चाळीस-पन्नास वर्षे लागतात. त्यानंतरही त्याची काळजी घ्यावी लागते. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहणारे दगडगोटे, शिळा यांच्यामुळे मुळीचा एखादा भाग खराब झाला तर तिथून संपूर्ण पूल खराब व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून त्याची देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची.

या पुलावरून चालता-चालता किंवा तो पाहत असताना हे सारं समजून घेणं हा वेगळीच अनुभव असतो. त्यासाठी मेघालयलाच जावे लागते आणि हे समजून घ्यायचे असेल तर “भवताल”ची सोबत असावी लागते.

- अभिजित घोरपडे
........

Exclusive Meghalaya - Kaziranga

नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय
(26 Feb - 4 March 2024)
 
9545350862

(बॅच फुल्ल होण्यापूर्वी संपर्क साधा.)

- भवताल टीम

प्रसंग येताच

 रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. ३५ महिला आणि २३ पुरुष त्यामध्ये होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली, अशी माहिती पर्यटक संजू म्हात्रे यांनी दिली.


या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यांचा तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.


देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले.


त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले.. काठमांडूमध्ये देवेंद्रच आमच्या मदतीला धावून आले अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली.

‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची ‘दिलखुलास’, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

  

‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची

दिलखुलास'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'महालक्ष्मी सरसया प्रदर्शनाबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद)  मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            राज्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंब तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आणि महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता गटांच्या आणि सर्व रोजगाराच्या उत्पादनांची प्रसिद्धी व विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी. यासाठी  8 जानेवारी 2024 पर्यंत ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन वांद्रे (पूर्व) येथे भरविण्यात आले आहे. या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे स्वरूपबचत गटांना यामध्ये सहभाग घेण्याची प्रक्रिया तसेच या प्रदर्शनाचे नियोजन  याबाबतची सविस्तर माहिती 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी दिली आहे.

             दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. जयवंशी यांची मुलाखत शुक्रवार दि. 29 आणि शनिवार 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे 3 जानेवारी पूर्वी अदा करावे

 रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे

3 जानेवारी पूर्वी अदा करावे

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 28 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.

            त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरेआमदार अनिकेत तटकरेकृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंतकृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळ पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली. यानंतर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले.

००००

Featured post

Lakshvedhi