Monday, 25 December 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा –

  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा – उपमुख्यमंत्री

 

बारामतीदि. २४:  नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेली विकासकामे आगामी १०० वर्ष टिकतीलत्यांची कमीकमीत देखभाल दुरुस्ती करावी लागेल अशा दर्जाची कामे करावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभागचिल्ड्रन पार्कसेंट्रल पार्कश्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहितेअपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटेउप विभागीय अधिकारी वैभव नावडकरमहावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.

 

कन्हेरी वनविभाग परिसराचा विकास करीत असताना हवामानानुरुप वाढणारीकमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा. दोन झाडामधील अंतर समान ठेवावेवृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहीलतलावाच्या कडेला पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल याची दक्षता घ्यावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

 

'चिल्ड्रन पार्क'ची कामे करीत असताना मुलांना रात्रीच्या वेळी चांगली दृश्यमानता राहील याचा विचार करुन वीजेचे खांब बसवावेत. बालकांना केंद्रस्थानी ठेवून परिसराची रंगरंगोटी करावी. पदपथाच्या बाजूला कमी उंचीच्या फुलझाडांची लागवड करावी. विकासकामे करताना पदपथावर स्वच्छता राहीलयाची काळजी घ्यावीअसे श्री.पवार म्हणाले.

 

'सेंट्रल पार्क'ची कामे येत्या दिवाळीअखेर पूर्ण व्हायला पाहिजे. परिसरातील सर्व शासकीय इमारतींसोबत या पार्कसाठी एकत्रित पाणीपुरवठा करण्याचा आराखडा करावा. श्रीमंत बाबू नाईक वाडा व परिसरातील विकासकामातून ऐतिहासिकपारंपरिक वास्तूंचे दर्शन होईलअशी विविध छायाचित्रे भिंतीवर लावावी. त्यावर विविधरंगी प्रकाशझोत टाकून ते अधिक आकर्षक दिसतील अशी व्यवस्था कराअसेही ते म्हणाले.

 

बारामती अधिक स्वच्छसुंदरसुविधायुक्त व्हावी यासाठी नागरिकांनीही या विकास कामांना सहकार्य करावेअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपेजलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष भुजबळमुख्याधिकारी महेश रोकडेवन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकरबारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातवजय पाटीलबाळासाहेब जाधवकिरण गुजर आदी उपस्थित होते.

 

0000

भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

 भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईदि24गुलामगिरी मानसिकता झुगारून आजची भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहावयास मिळत आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तीन दिवस सुरु असलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारोहावेळी केले.

देशाची प्रगती आणि जागतिक शांततेच्या उद्देशाने युवा चेतनातर्फे आयोजित केलेल्या श्री विद्या लक्षार्चन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह होते.

विद्या लक्षार्चन समारंभामुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे सांगून आणि उपस्थित संतांचे स्वागत करून श्री. फडणवीस म्हणालेभारत पुन्हा एकदा आपली हरवलेली अस्मिता परत मिळवताना दिसतोय. एकेकाळी भारत जगाला विचार देत होता. विचाराबरोबर व्यवहार आणि व्यापारात तसेच सामरिक ताकदीमध्येही भारत जगात अग्रेसर होता. परंतु तो हळुहळू गुलामीच्या साखळदंडात जखडत गेला. विचारांच्या गुलामगिरीमुळे देशाची अधोगती झाली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यावर मात करून भारत नव्या आत्मविश्वासाने उभा राहत आहे. सनातन विचार देशात पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहेत. नित्यनूतन असा हा सनातन विचार आहे. सनातन म्हणजे जो कधीही समाप्त होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे वळत असल्याचेच हे निदर्शक आहे.

उपमुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हा विकसित भारत म्हणजे रामराज्य होय. राजाला जे स्थान असेल तेच स्थान रामराज्यात तळातल्या माणसाला असतेअसे रामराज्य प्रस्थापित करण्याला आपले प्राधान्य आहे. येत्या २२ जानेवारीला आपण रामलल्लाची जन्मस्थानी प्रतिष्ठापना करीत आहोतहा देशवासीयांसाठी भावूक करणारा क्षण आहे. सनातन धर्माचे विश्वरूप आपल्याला राम मंदिराच्या पुनर्निर्माणात पाहायला मिळेल. ही आत्मविश्वासाची नवी सुरुवात असून त्यानंतर मागे वळून पाहावे लागणार नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रेस्वामी अभिषेक ब्रह्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

00000

मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन प्रारंभिक उपचार केंद्र सुरू करणार

 मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन प्रारंभिक उपचार केंद्र सुरू करणार

----

स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. २४ - विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईलअसे ते म्हणाले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आले असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते नायर रुग्णालयांतर्गत नव्याने सुरू झालेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन (ईआयआरसीसी) केंद्राचे रविवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढास्थानिक आमदार रईस शेखआमदार श्रीमती यामिनी जाधवआमदार कालिदास कोळंबकरॲड.मनीषा कायंदेमाजी नगरसेवक दत्ता नरवणकरयशवंत जाधवबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशीडॉ.सुधाकर शिंदेउपायुक्त रमाकांत बिरादार आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज वरळी येथील डॉ.हेडगेवार चौकआचार्य अत्रे चौकमाता रमाई आंबेडकर चौकनायगाव येथील महाराणा प्रताप चौकतसेच नायगाव बीडीडी चाळ परिसरातील गांधी चौक येथे स्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्यात स्वतः सहभाग घेतला. 

 

प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान

 

मुलांसाठी प्रारंभिक उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणालेहे केंद्र खाजगी उपचार केंद्रापेक्षा चांगले असून महानगरपालिका किती चांगले काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष मुलांच्या गरजाही विशेष असतातत्यांची पालकांना काळजी असते. तथापि या केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून अशी दोन केंद्रे मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तर एक केंद्र ठाण्यामध्येही सुरू करण्यात येईल. प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान असल्याचे सांगून येथे मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

 

स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: या मोहिमेत सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणालेस्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामुळे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिकशालेय विद्यार्थीअशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळ तसेच सक्शन मशीनएअर प्युरिफायरमिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाईरत्यांवरील माती काढणेपुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणेअंतर्गत रस्तेपदपथनालेसार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत. यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नियमित सफाईची कामे करणे सोयीचे होत असून याचे दृश्य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असून सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रत्येक चौकात झाडे लावणेअर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो

 

मुख्यमंत्री म्हणालेमुंबई स्वच्छसुंदरनिरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहेत्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेतदुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावीतरस्ते एक दिवसाआड धुतले जावेतधूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेतअशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतीलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

 

नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील नायगाव नवरात्रौत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणालेपोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसेच बीडीडी चाळीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीने पूर्ण करण्यात येतील. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणूअसा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीतील लव्ह ग्रोव उड्डाणपुलाखालील संतशिल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

 

00000

 

Sunday, 24 December 2023

श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा




 

श्री सिद्धिविनायक dylisis सेंटर

 



ज्यांनी ही कविता लिहिली 1खूपच सुंदर कविता*

 *ज्यांनी ही कविता लिहिली त्यांना  100 तोफांची सलामी*

*खूपच सुंदर कविता*


*_🙏Nice🙏_* 


*_पूर्वीचा काळ बाबा,_*

*_खरंच होता चांगला,_*

*_साधे घरं साधी माणसं,_*

*_कुठे होता बंगला ?_*


                     *घरं जरी साधेच पण,*

                     *माणसं होती मायाळू,* 

                     *साधी राहणी चटणी भाकरी,* 

                     *देवभोळी अन श्रद्धाळू.*


*_सख्खे काय चुलत काय,_* 

*_सगळेच आपले वाटायचे,_*

*_सुख असो दुःख असो,_* 

*_आपुलकीने भेटायचे._*


                    *पाहुणा दारात दिसला की,* 

                    *खूपच आनंद व्हायचा हो,*

                    *हसून खेळून गप्पा मारून,*

                    *शीण निघून जायचा हो.*


*_श्रीमंती जरी नसली तरी,_*

*_एकट कधी वाटलं नाही,_*

*_खिसे फाटके असले तरीही,_*

*_कोणतंच काम रुकलं नाही._*


                    *उसनं पासनं करायचे पण,* 

                    *पोटभर खाऊ घालायचे,*

                    *पैसे आडके नव्हते तरीही,*

                    *मन मोकळं बोलायचे.*


*_कणकेच्या उपम्या सोबत,_* 

*_गुळाचा शिरा हटायचा,_*

*_पत्रावळ जरी असली तरी,_*

*_पाट , तांब्या मिळायचा._* 


                    *लपाछपी पळापळी,* 

                    *बिन पैशाचे खेळ हो,*

                    *कुणीच कुठे busy नव्हते,*

                    *होता वेळच वेळ हो.* 


*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*

*_खळखळून हसायचे,_*

*_निवांत गप्पा मारीत माणसं,_* 

*_ओसरीवर  बसायचे._*


                    *सुख शांती समाधान " ते "*

                    *आता कुठे दिसते का ?*

                    *पॉश पॉश घरा मधे,*

                    *" तशी " मैफिल सजते का ?*


*_नाते गोते घट्ट होते,_*

*_किंमत होती माणसाला,_*

*_प्रेमामुळे चव होती,_*

*_अंगणातल्या फणसाला._* 


                    *तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*

                    *राहिला आहे का राम ?*

                    *भावाकडे बहिणीचा हो,* 

                    *असतो का मुक्काम  ?*


*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_* 

*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*

*_मृदंगाच्या ताला वरती,_*

*_गाव आता का डोलत नाही._* 


                    *प्रेम , माया , आपुलकी हे,*

                    *शब्द आम्हाला गावतील का ?*

                    *बैठकीतल्या सतरंजीवर,*

                    *पुन्हा पाहुणे मावतील का ?*


*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*

*_मजा आता कमी झाली,_*

*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*

*_सुदामाची सुट्टी झाली._* 


                    *हॉल किचन बेड मधे,*

                    *प्रदर्शन असतं वस्तूंचं,*

                    *का बरं विसर्जन झालं,* 

                    *चांगुलपणाच्या अस्थीचं ?**

💐💐🙏💐💐

पार्ले महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 पार्ले महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 





पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी

— उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 23: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज पार्ले महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजनआमदार पराग अळवणीमाजी मंत्री डॉ. दीपक सावंतअभिनेत्री सुधा चंद्रनअभिनेते शैलेश दातारसाठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडेसारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूरज्योती अळवणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती(Culture), खाद्य संस्कृती (Cusine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला.

पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

खासदार श्रीमती महाजन म्हणाल्या कीउत्तम आयोजनउत्तम परीक्षकउत्तम स्पर्धक यामुळे पार्लेकर यांना हा महोत्सव आपला वाटतो यातच याचे यश आहे.

विलेपार्ले कल्चर सेंटरकडून पार्ले महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे. यावर्षी या महोत्सवादरम्यान वेगवेगळया 32 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये 30 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

पार्ले महोत्सवाचे उद्घाटन प्रास्ताविक आमदार पराग अळवणी यांनी केले. तसेच यावेळी पार्ले महोत्सवासाठी तयार करण्यात आलेले गाणे कार्यक्रमादरम्यान वाजविण्यात आले.

साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात आले आहे.

00000

Featured post

Lakshvedhi