Wednesday, 20 December 2023

जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार

 जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत विचार


- मंत्री गिरीश महाजन


 


            नागपूर, दि. २०: राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. तसेच जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसविण्याची प्रलंबित कार्यवाही येत्या दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, शासकीय आश्रम शाळा, लालमाती, ता. रावेर येथे सन २०११ मध्ये सौर यंत्रणा बसविण्यात आले होत. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१९-२० अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा विकास या योजनेतून रावेर तालुक्यातील १७ जिल्हा परिषद शाळांवर सौर यंत्रणा बसविण्यात आले होते. मात्र, शासकीय आश्रम शाळा लालमाती, ता. रावेर येथील सौर यंत्रणा नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळामुळे) काही युनिट बंद पडले आहेत. ही बंद युनिट तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


            यावेळी सदस्य प्राजक्त तनपुरे, प्रकाश आबिटकर आणि ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले. 


0000


दीपक चव्हाण/विसंअ/

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

 मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात मराठा आरक्षणावरील चर्चेच्या उत्तरात ग्वाही

            नागपूरदि. 19 : - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीयाचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईलअशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. 

            मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेवरील उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे विधान परिषद आणि विधानसभेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीअशी निसंदिग्ध ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमराठा आरक्षणासाठी जे-जे काही करायचं आहेते सगळं करण्याची आमची तयारी आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेऊन वचन दिले होते. आजही त्यावर मी ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर अशीच शपथ घेतली असतीत्यामुळे या प्रश्नात कुठेही मागे हटणार नाहीअसा पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

            तसेच त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आवाहन केले कीसरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला भूषणावह नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर आजिबातच शोभणारे नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीविरोधी पक्षांनी आणि एकूणच समाजानेही आजवर घेतली आहे. आणि आपण आज घेतोय आणि यापुढेही घेत राहू. त्यामुळेचमराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहेत्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच सावध राहण्याचीविचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात शांतताकायदा सुव्यवस्थाबंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली गेली तर सर्व प्रश्न सुटतातअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजेहीच आमची भावना आहे. अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे. या मागणीसाठी काहींनी भावनेच्या भरात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचललं. हे सर्व विषण्ण करणारे, वेदनादायी आणि आपल्याला परवडणार नाही. राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिकसामाजिक बांधणी घट्ट केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला असेही त्यांनी सांगितले.

            गेल्या दोन अडीच महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत. तर सर्व पक्ष आणि संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेतांना विश्वासात घेतल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणालेदरम्यान १० बैठका घेतल्या. उपसमितीच्या १२ बैठका झाल्या ,मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ आणि सल्लागार मंडळाच्या ७ अशा एकूण ३० बैठका झाल्या. सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत.

            फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांबाबतची भूमिका स्पष्ट केली होती.  अंतरवाली-सराटीतल्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली. ७ सप्टेंबर २०२३ रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री म्हणाले कीमराठवाड्यातील मराठा कुणबीकुणबी-मराठाजात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली. तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. निजामकालीन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावेनिजामकालीन करारत्यावेळच्या सनदीराष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने ठरविले. न्या. शिंदे समितीस सादर करण्यात आलेले १२ विभागांचे पुरावे४८ दस्ताऐवज ग्राह्य धरण्यासाठी तशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाच्या नियमांत करण्यात येत आहे. त्यामुळे कुणबी लिहीलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढ ते सोप नाही. त्यामुळे कुणीही भिती बाळगू नका. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची तपासणी करून कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत हे दाखले अतिशय काटेकोरपणे दिले जात आहेत. समितीच्या समन्वयासाठी राज्यभरात १८५८ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यात ६६ हजार ६४४ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.  न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला. दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केला आहे. ४०७ पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी पाठवत आहोत.

सर्व समाज घटकांसाठीच्या संस्थांच्या योजनात समानता

            सर्व समाज घटकांसाठीच्या संस्थांच्या योजनांत समानता आणण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांत समानता असेल तर सर्वाना समान न्याय मिळेल. यादृष्टीने  बार्टीसारथीमहाज्योतीटीआरटीआयअमृत या संस्थांच्या कार्यक्रमयोजनांमध्ये एकसमानता आणण्यात येत आहे. अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन तयार करेल. प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर मान्यतेसाठी ठेवेलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्योजक घडवण्यावर भर

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील ७२ हजार १४४ जणांना ५ हजार ३८० कोटी बँक कर्ज मंजूरत्यावरील ५९२ कोटीचा व्याज परतावा केला जाणार आहे. महामंडळाकडून ३५ गट प्रकल्पांना ३ कोटी ३५ लाख रुपये कर्ज वितरित केले आहेत.  सारथी आणि महामंडळाच्या विविध योजनांमधून अनेक उद्योजक घडले आहेत. हे तरुण केवळ उद्योजक झाले नाही तर त्यांच्या उद्योगांमध्ये शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. नोकऱ्या मागणारे नव्हे नोकऱ्या देणारे तयार व्हावेतअसे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगत असत. आपल्याला एक मराठा लाख मराठा उद्योजक घडवायचे आहेत. मराठा समाजातील शेतकऱ्यांना ट्रँक्टर देणार आहोत. वर्षभरात तीन हजार ट्रॅक्टर दिले जाणार असून त्यासाठी महामंडळाने ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत एमओयू केले आहेतअशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

            राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी जिल्हानिहाय ७२ पैकी ५२ वसतीगृहे महिनाभरात सुरु होत आहेत.  प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुले असे 7200 मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत १० लाख घरे ३ वर्षात बांधण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसीव्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे

 

महाज्योती

            महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला रु.13 हजार ते 10 हजार विद्यावेतन देण्यात येते तर रु.18,000 ते 12,000 इतका आकस्मिक निधी देण्यात येतो. दिल्ली तसेच पुणे येथे युपीएससीएमपीएससीसेटनेटमिलिटरी भरतीएमबीएचे प्रशिक्षण देण्यात येते. ६ हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. युपीएससीसाठी ५० हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करण्यात येते. तर मुलाखतीकरिता २५ हजार रुपये प्रति विद्यार्थी अर्थसहाय्य केले जाते. युपीएससी मध्ये आतापर्यंत ३४ विद्यार्थी यशस्वी झालेले असून ते आयएएसआयपीएस आणि आयआरएस सेवांत दाखल झाले आहेत. एमपीएससी मध्ये  यशस्वी झालेले १३१ विद्यार्थी राज्यात विविध पदांवर कार्यरत आहेत.

धनगर समाजासाठी तरतूद

            धनगर समाजासाठी १४० कोटी रुपये तरतुद केली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५५०० विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येत आहेत. हा लाभ १६ हजार ३५० विद्यार्थ्यांना दिला जातो. धनगर समाजासाठी १० हजार घरकुलं बांधतो आहोत. २ हजार ८८८  लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. २५ हजार घरकुल बांधणार आहोत. धनगर समाजाच्या उन्नतीकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी माझ्या  अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती स्थापन झाली आहे. धनगर बहुल जिल्ह्यांमध्ये धनगर समाजातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे उभारण्यात येणार आहेत. शेळ्या-मेंढ्यासाठी विमा संरक्षण कवच दिले आहे.

            मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर कौन्सिलची फौज उभी केली आहे.  उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू स

क्षमपणे मांडणाऱ्या विधीज्ञांचीही या कामी मदत घेतली जाईल. आवश्यकतेनुसार टास्क फोर्स देखील स्थापन केला आहे. उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी मा. निवृत्त न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यांच्याशी सुद्धा सातत्याने संवाद सुरु आहे.

मागासवर्ग आयोगाला निधी

            राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आयोगाचे पुनर्गठन केले आहे. सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला ३६० कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करण्यासाठी इम्पिरिकल डेटा युध्दपातळीवर गोळा केला जातोय. सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून दिला जात आहे. अत्यंत वेगाने ताकदीने काम करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. सर्व शक्ती पणाला लावणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

            एसईबीसी कायदा निर्मितीबाबतचा कालानुक्रमतसेच विविध समाज घटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचीही सविस्तर माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

0000


येथील विश्राम गृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव

 मुंबई येथील विश्राम गृहामधील 6 कक्ष

 विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          नागपूरदि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील 6 कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

          विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या मागण्यांबाबत आज विधानभवनाथ बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ गुंडिले, डॉ. रमेश गजबे, बाळासाहेब साळुंके, दिनानाथ पडोळे, वसंतराव शिंदे आदी उपस्थित होते.

          यावेळी प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च व मुंबई येथे कामासाठी आल्यानंतर तात्पुरत्या निवासाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी

 आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी

केंद्र सरकारची मदत घ्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          नागपूरदि. १९ : राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. या दृष्टीने उपग्रह तंत्रज्ञानाची मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

          राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत विविध प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव  नितिन करीर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपत्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असून त्यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जावेत असे सांगितले.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मदतकार्यात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. यासह ही यंत्रणा राज्यातील आपत्तीग्रस्त भागात वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन असावे.

          या बैठकीत आपत्ती व्यवस्थानाशी संबंधित विविध यंत्रणा व विभागांद्वारे सादर केलेल्या नियोजन व खर्चांच्या मागण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये आपत्ती प्रसंगी मदतकार्यामध्ये सहभागी होणाऱ्या सैन्यदल तसेच केंद्र शासनाच्या एनडीआरएफसह राज्य शासनाच्या एसडीआरएफ, नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभाग यासह अग्नीशमन यंत्रणाद्वारे मागणी केलेल्या विविध बाबींवर चर्चा झाली. याप्रसंगी मदतकार्य व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून त्या दृष्टीने विविध यंत्रसामग्री व प्रणालींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

          आपत्तीमुळे ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान सांगणारे रेस्क्यूसेल व्हेइकल, सॅटेलाईटबेस कम्युनिकेशन सिस्टिम यासह अनेक महत्वपूर्ण प्रणालींची माहिती यावेळी सादर करण्यात आली.


Tuesday, 19 December 2023

देवलापार तालुका निर्मितीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय

 देवलापार तालुका निर्मितीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            नागपूरदि. १९ : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालय बळकट करण्याच्या दृष्टीने देवलापार येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. देवलापार तालुका निर्मितीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे निवेदन शासनास प्राप्त झाले असून नवीन तालुका निर्मितीबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवलापार तालुका निर्मितीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

            सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सदस्य सर्वश्री अभिमन्यू पवारराजू कारेमोरेदिलीप मोहितेनाना पटोले आदींनी सहभाग घेतला.

             राज्यातील तालुक्यांच्या विभाजनांच्या अनुषंगाने सुधारित निकष ठरविण्यासाठी 2 मार्च 2023 रोजी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या समितीचा अहवाल अप्राप्त असून हा अहवाल आल्यानंतर नवीन तालुका निर्मिती बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

            या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या अन्य एका प्रश्नाबाबत मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले9 मार्च 2023 रोजी अपर तहसीलदार देवलापार या पदावर नियमित तहसीलदाराची पदस्थापना करण्यात आली आहे. तथापि सद्यस्थितीत तहसीलदार देवलापार अनुपस्थित असल्याने अपर तहसीलदार देवलापार या पदाचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार रामटेक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अनुपस्थित असलेले तहसीलदारास बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले. विदर्भातील पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येत असून रिक्त पदे भरण्याबाबत एका महिन्यात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कासारशिरसी तहसीलबाबत मार्चपर्यंत निर्णय घेण्यात येईलअसे सांगून गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाबाबत कोणताही प्रस्ताव शासनासमोर नसल्याचे त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

बाबरगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करणार

 बाबरगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करणार

- मंत्री संजय राठोड

 

            नागपूर दि. 19 :  मौजे बाबरगाव ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली.

            यासंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी श्री राठोड बोलत होते.या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

            यावेळी श्री राठोड म्हणालेमौजे बाबरगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शिवना नदीवर 2015-16 मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी अडविल्याने परिसरातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. सप्टेंबर 2021 मध्ये पावसाच्या पुरामुळे हा  हा बंधारा वाहून गेल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र  कमी झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यासाठी या बंधाऱ्याच्या  दुरुस्तीच्या  कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येईल.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/


 

वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार

 वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत

११५ लाभार्थींना घरांच्या चाव्या देणार

- उदय सामंत

नागपूरदि. १९ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत वाल्हेकरवाडी गृह प्रकल्पातील पहिल्या लॉटरीत ११५ लाभार्थींना लवकरच घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अश्विनी जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारसदस्य जयकुमार गोरेभीमराव तापकीर यांनी भाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणालेवाल्हेकरवाडी येथे ७९२ सदनिकांचा गृह प्रकल्प करण्यात येत आहे. यामध्ये वन रूम किचन सदनिका ३७८, 'वन बीएचके सदनिका ४१४ आहेत. गृह प्रकल्पात पाणीवीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. या गृह प्रकल्पात दुसरी लॉटरी २४ जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे २०१६ मध्ये काम सुरू झाले. हे काम २०१९ अखेरीस पूर्ण करणे आवश्यक होते. याबाबत कंपनीला १ कोटी ६० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये कंपनीला ५८ लाख रुपये सूट देण्यात येवून १ कोटी १० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई शासन नियमानुसार करण्यात आली. या प्रकल्पात नियमबाह्य काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरुवातीलाच ८ ते १० महिने उशिरा सुरू झाले.


Featured post

Lakshvedhi