Tuesday, 19 December 2023

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार

 राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार

धनंजय मुंडे

            नागपूरदि. 19 : राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असूनपहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसहपावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            नियम 97 अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा  उपस्थित केली होती. यावर उत्तर देतांना मंत्री श्री. मुंडे बोलत होते.

            मंत्री श्री. मुंडे म्हणालेराज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी राज्यभर चार महिने विशेष मोहीम राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अग्रीम 25% प्रमाणे 2216 कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कमेचे वितरण सुरू आहे. सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकार कडे अपील केले असूनती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. या वर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील 5 वर्षातील रक्कमेच्या तुलनेत अनेक पटींनी असल्याचे असेही मंत्री  श्री मुंडें यांनी सांगितले.

            अवकाळी व गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून यांतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे 1458 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहेत्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण देखील सुरू केले आहेअसेही श्री. मुंडे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पफळपिक विमायांसह शासनाने लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधानपरिषदेत दिली.

            शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात 'ड्रोन मिशनराबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहेयाचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईलअसेही श्री. मुंडे पुढे म्हणाले.

            धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा श्री. मुंडे यांनी यावेळी केलीयासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.22 हजार ग्रामपंचायतीमध्ये वॉटर ग्रीड योजना आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी रुपये इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

            यावेळी चर्चेत सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकरएकनाथ खडसेप्रवीण दरेकरसुरेश धसप्रज्ञा सातवनरेंद्र दराडेअरुण लाडअभिजीत वंजारीअनिल परब,रमेश कराडशशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

 

नक्षल पीडित, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करावे

 नक्षल पीडितशरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करावे

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीची बैठक

            नागपूरदि. 18 : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठित राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रजनीश सेठअतिरिक्त महासंचालक स्पेशल ऑपरेशन प्रवीण साळुंखेपोलीस सहआयुक्त श्री. जैनसीआरपीएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक पद्माकर रणपिसे तसेच विशेष पोलीस महानिरिक्षक संदीप पाटीलगडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा आदी उपस्थित होते.

            बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करूननिर्देशही दिले.

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीनक्षलवादी कारवाया मुळे पीडित होऊन विस्थापित होणारे तसेच नक्षलवादी विचारसरणीचा त्याग करून जे शरण येतातत्यांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे. या प्रक्रियेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा. विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीने करण्यात याव्यात. नागपूरगडचिरोली मार्गावरील मॉडर्न फायरिंग रेंजचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या पोलीस स्थानकांच्या 25 अधिकारी व 500 कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या सर्व नेमणुका स्थानिक पातळीवर होणार आहेत.

            महाराष्ट्र पब्लिक सिक्युरिटी अँक्ट - हे जनसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणण्याबाबतही विचार विनिमय झाला. शहरी माओवादी रोखण्यासाठी हे विधेयक महत्वाचे ठरणार आहे. तसेच मायनिंग कॉरिडॉरच्या रस्त्यांचा विकास तसेय या परिसरातील मोबाईल टॉवर्सची कामे वेगाने पूर्ण व्हावीत याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

            या संबंधित जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एसटी बसेसची प्रभावी सेवा देण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

0000

ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी संगणकीय सोडत

 ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी

संगणकीय सोडत

- मंत्री दिलीप वळसे पाटील

            नागपूर दि. 18 : राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात  येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

            राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधी दिला नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेजयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.

            यावेळी श्री वळसे पाटील म्हणाले कीराष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सद्यस्थितीत वैयक्तिक शेतकरी ,उद्योजकसाखर कारखाने यांच्याकडून 7300 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पास 2023 -24 करिता रुपये 96.39  कोटी इतका अतिरिक्त नियतव्यय मंजूर केल्याचे 3 नोव्हेंबर 2023 च्या पत्रान्वये केंद्र शासनाने कळविले आहे. या मंजूर नियतव्ययानुसार प्राप्त होणाऱ्या निधीच्या अधीन राहून ऊस तोडणी यंत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची राज्यस्तरावर संगणकीय सोडत काढण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुषंगिक बदल करण्याचे काम महाआयटी विभागाकडून सुरू आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य सरकार एखादी राज्यस्तरीय योजना आणण्याबाबत शेतकरीसाखर कारखानदार, ऊस तोडणी संघटना यांच्याशी चर्चा करेल, असे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

0000

गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची कामे सुरू

 गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची कामे सुरू

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

       नागपूरदि. 18 : धारासुर येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची तसेच इतर आवश्यक कामे सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.

            धारासुर ता. गंगाखेडजि. परभणी येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदिराच्या दुरुस्तीची तसेच इतर आवश्यक कामे करण्याबाबतचा प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेप्राचीन गुप्तेश्वर  मंदिराच्या संरक्षित  स्मारकाच्या फक्त जतन व संवर्धनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात रुपये 14 कोटी 95 लाख रुपये रकमेची कामे हाती घेण्यात आली आहेत तसेच पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या स्मारकाच्या जतन व संवर्धनासाठी दुसऱ्या टप्प्याचे 13 कोटी 98 लाख रुपये इतक्या रकमेची कामे हाती घेण्याचे नियोजित आहे. स्मारकाच्या जतन व संवर्धनासाठी पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे तथापि मंदिराच्या जतन दुरुस्तीच्या कामामुळे भाविकांना दर्शनाची कोणतीही अडचणी येऊ नयेम्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भगवान महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे तसेच मंदिराच्या इतर सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल.

00000

जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई

 जिजाऊ को.ऑप. बँकेच्या कर्जवाटप प्रकरणी चौकशीअंती कारवाई

- दिलीप वळसे पाटील

          नागपूर, दि. 18 : अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्या प्रकरणी सहकार आयुक्तांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जि.अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

            या संदर्भात सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी      श्री. वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकरसतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

            यावेळी श्री वळसे पाटील म्हणालेजिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकअमरावती या बॅकेबाबतच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्तांनी  10 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी प्रादेशिक उपसंचालक, (साखर)अमरावती यांची नियुक्ती केली असून त्यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी तपासणी अहवाल  सादर केला आहे. या अहवालामध्ये कर्ज मंजूर प्रकरणांमध्ये पुरेसे तारण न घेणेकर्जदाराची क्षमता न पाहता कर्ज देणे, संपूर्ण कर्ज रक्कम उचल देणे, कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणेशासन मान्यता न घेता एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविणे इत्यादीमध्ये अनियमितता आढळून आल्याने या बँकेची चौकशी करण्यासाठी दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये सहकार आयुक्तांनी  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जि. अमरावती यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषीं असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

0000

संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्स विशेष ---- 1 कोटी कर्क रुग्णांना अन्नदान, लाखोंच्या सेवेसह सुश्रूशा

 

संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्स विशेष

----

1 कोटी कर्क रुग्णांना अन्नदान, लाखोंच्या सेवेसह सुश्रूशा

गाडगे महाराज धर्मशाळेकडून सेवेचा महायज्ञ अविरत

कॅन्सरमुक्त भारत’ अभियानासाठी प्रयत्न

मुंबई – श्री संत गाडगे महाराजांनी दशसुत्रीच्या माध्यमातून मानवी जवनाच्या सर्वांगिण उत्थानाचा मार्ग दाखविला. त्यांच्या याच विचारांवर मार्गक्रमन करत संत गाडगे महाराज धर्मशाळेद्वारे सेवाव्रती नागरिकांच्या माध्यमातून 1 कोटी 20 लाख कर्करुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान यासह 21 लाख कर्करुग्णांची सेवाकरून त्यांना आधार देण्यात आला आहे. भविष्यात वाढणाऱ्या कर्करुग्णासंदर्भात चिंता व्यक्त करत समाजसेवक प्रशांत देशमुख यांनी कॅन्सरमुक्त भारत अभियानासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

श्री संत गाडगे महाराजांनी दशसूत्री समाजालाला अर्पण करून मानवी कल्याणाच्या दिशा स्पष्ट केल्या. त्यांच्या याच विचारावर चालत प्रशांत देशमुख यांनी गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दादरच्या (मुंबई) धर्म शाळेच्या माध्यमातून ते कर्क रुग्णांच्या निवासासह त्यांना अन्नदान व वैद्यकीय मदत करतात. मुंबईच्या टाटा ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांचे या ठिकाणीच वास्तव्य असते. ही बाब लक्षात घेता प्रत्येक राज्यात कर्क रुग्णालय, रुग्णांसाठी धर्मशाळा व्हावी यासाठी प्रशांत देशमुख हे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. गाडगे महाराजांनी दाखवलेला व्यसनमुक्तीचा मार्ग यासाठीही ते देशभरात जाऊन जनजागृती करत असतात. दादरच्या धर्मशाळेच्या माध्यमातून 1996 पासून ते गाडगे महाराजांचा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  येथे आतापर्यंत आलेल्या 1 कोटी 20 लाख नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे. त्यांचे सेवा, सुश्रूसा, वैद्यकीय सहाय्यतेकरिता मदत करण्यात आली. यासह  21 लाख कर्क रुग्णांना आधार देण्यात आला आहे.

--

टीबीमुक्तीच्या धर्तीवर कँन्सरमुक्तीसाठीही  प्रयत्न

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये कॅन्सर या आजाराचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत टीबी मुक्त भारताची घोषणा केली. त्यात आपण यशस्वीपणे पुढे जात आहोत. तर  2047 पर्यंत विकसित भारताची घोषणा सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. अमृत काळाकडे वाटचाल करत असताना कॅन्सर मुक्त भारत व्हावा यासाठी ही मोहीम सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यापकपणे राबवली जावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती दादरच्या धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी बोलताना दिला. सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक जाणीवा  जपणारे अनेक नागरिक आपल्याला सर्व स्तरावर मदत करत असल्याने गाडगेबाबांचे विचार पोहोचविण्यात मदत होत आहे. त्यामुळे अशा सर्व नागरिकांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

--

संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या माध्यमातून कर्करुग्णांना अन्नदान, वैद्यकीय मदत, निवासाची सुविधा, समुपदेशन, चांगल्या जिवनशैलीसाठी प्रयत्न इत्यादी उपक्रम राबविले जातात. कर्करुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कँन्सरमुक्त भारत हे अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत.

-प्रशांत देशमुख, व्यवस्थापक, संत गाडगेबाबा धर्मशाळा, ट्रस्ट

00000

संत गाडगेबाबा की पुण्य तिथि पर विशेष

----

1 करोड़ कैंसर रोगियों को भोजन दानलाखों लोगों की सेवा सुश्रुषा

गाडगे महाराज धर्मशाला की ओर से सेवा का महायज्ञ

'कैंसर मुक्त भारतअभियान के लिए सक्रीय प्रयास

मुंबई – श्री संत गाडगे महाराज ने दशसूत्री के माध्यम से मानव जीवन के सर्वांगीण उत्थान का मार्ग दिखाया। उनके विचारों पर चलते हुए संत गाडगे महाराज धर्मशाला ने 1 करोड़ 20 लाख कैंसर रोगियों और 21 लाख कैंसर रोगियों को सेवाव्रती नागरिकों के माध्यम से उनके परिजनों को भोजन उपलब्ध कराकर सहायता प्रदान की है। सामाजसेवक प्रशांत देशमुख ने भविष्य में कैंसर रोगियों की बढ़ती संख्या पर चिंता व्यक्त करते हुए केंद्र सरकार से कैंसर मुक्त भारत अभियान शुरू करने की अपिल की है.

श्री संत गाडगे महाराज ने समाज को दशसूत्री प्रदान कर मानव कल्याण की दिशा बताई। इसी विचार पर काम करते हुए प्रशांत देशमुख गाडगे महाराज के विचारों को दुनिया भर में प्रचारित और प्रसारित करने का प्रयास कर रहे हैं। दादर (मुंबई) में धर्म शाला के माध्यम से वे कैंसर रोगियों को आवास के साथ-साथ भोजन और चिकित्सा सहायता भी प्रदान करते हैं। मुंबई में टाटा ट्रस्ट के कैंसर अस्पताल में आने वाले मरीजों की संख्या बहुत बड़ी है। वे इसी जगह पर रहते हैं. इसे ध्यान में रखते हुएप्रशांत देशमुख ने हर राज्य में मरीजों के लिए कैंसर अस्पताल और धर्मशालाएं बनाने के लिए केंद्र सरकार से बात कर रहे हैं। गाडगे महाराज ने नशे से मुक्ति का रास्ता  दिखाया  है, इस विचार पर अमल करते हुये देशमुख पूरे देश में जागरूकता भी फैला रहे हैं। 1996 से वे दादर की धर्मशाला के माध्यम से गाडगे महाराज के विचारों को लोगों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं. अब तक यहां आए 1 करोड़ 20 लाख नागरिकों को भोजन दान किया जा चुका है. उनकी सेवाओंनर्सिंगचिकित्सा सहायता के लिए सहायता प्रदान की गई। इसके साथ ही 21 लाख कैंसर रोगियों को सहायता प्रदान की गई है।

--

टीबी मुक्ति की तर्ज पर कैंसर मुक्ति के लिए भी प्रयास हो

बदलती जीवनशैली के कारण तरह-तरह की बीमारियों की संख्या बढ़ती जा रही है। इसमें मुख्य रूप से कैंसर शामिल है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2025 तक टीबी मुक्त भारत की घोषणा की। हम उसमें सफलतापूर्वक आगे बढ़ रहे हैं. प्रधानमंत्री ने 2047 तक विकसित भारत की भी घोषणा की है. इस संदर्भ मे बातचित करते समय धर्मशालादादर के प्रबंधक प्रशांत देशमुख ने बताया कि अमृत काल की ओर बढ़ते हुए हम भारत को कैंसर मुक्त बनाने के लिए केंद्र सरकार के माध्यम से इस अभियान को व्यापक रूप से लागू करने के लिए सरकार के साथ कदम से कदम मिलाकर चलने के लिए प्रयास कर रहे हैं। सामाजिक उत्तरदायित्व और सामाजिक जागरूकता को बनाए रखने वाले कई नागरिक हर स्तर पर हमारी मदद कर रहे हैंइससे गाडगे बाबा के विचारों पर चलने के लिए मदत हो रही । अत: उन्होंने यह भावना भी व्यक्त की कि हम ऐसे सभी नागरिकों के प्रति कृतज्ञ होना चाहते हैं।

--

संत गाडगेबाबा धर्मशाला के माध्यम से कैंसर रोगियों के लिए भोजन दानचिकित्सा सहायताआवास सुविधापरामर्शबेहतर जीवन शैली के प्रयास आदि गतिविधियाँ क्रियान्वित की जाती हैं। कैंसर रोगियों की बढ़ती संख्या चिंताजनक है। इसलिए केंद्र सरकार द्वारा कैंसर मुक्त भारत अभियान को क्रियान्वित करने का प्रयास किया जा रहा है।

- प्रशांत देशमुखप्रबंधकसंत गाडगेबाबा धर्मशालाट्रस्ट

00


दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार

 दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार

- मंत्री दादाजी भुसे

            नागपूरदि. 19 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे २५१ बसआगार,  ५७७ बस स्थानके आहेत.  महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्वमालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत.  या बसेस मधून दररोज ५४ लाख प्रवासी  प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या बस स्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करून रूपडे पालटविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

             राज्यातील बसस्थानकांच्या दुरुस्तीबाबत सदस्य लहू कानडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सदस्य प्रकाश आबिटकर, मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

            मंत्री श्री. भुसे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छसुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार आहे. तसेच बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात १८६ बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. आतापर्यंत ११ निविदा काढण्यात आल्या असून दोन कामांना विकासकांचा प्रतिसाद मिळाला आहे.  तसेच ४० निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावरील कामांना प्रतिसाद कमी आहे. याबाबत निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा महिनाभरात अहवाल येईलत्यानंतर या पद्धतीतील त्रुटी दूर करण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

            मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, राज्यात ४५ बसस्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ७२ बस स्थानकांचा विभागाच्या निधीतून विकास करण्यात येत आहे. यामध्ये ७० कामे प्रगतीपथावर आहेत.  या वर्षात या कामांसाठी ४०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ९७ बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागआपलं गाव - आपलं बस स्थानक या संकल्पनांतूनही बस स्थानके सुशोभित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बस स्थानकांच्या कामांची तांत्रिक तपासणी करण्यात येवून यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.

००००

Featured post

Lakshvedhi