Tuesday, 19 December 2023

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लाखाच्या मदतीची कार्यवाही सुरु

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लाखाच्या

मदतीची कार्यवाही सुरु

- मंत्री अनिल पाटील

 

            नागपूर दि. १८ : शेतकरी आत्महत्याप्रकरणी नियमानुसार पात्र ठरलेल्या संबंधित शेतक-यांच्या वारसांना रुपये 1 लाख याप्रमाणे मदत देण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरू आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने कृषी विभाग व विविध विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

            मराठवाडा तसेच अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबतचा प्रश्न सदस्य रमेश कराड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदेजयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीवसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.  विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी समृध्दी योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.   शेतमालाला हमीभावपीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली.

            शेतकऱ्यांना केवळ रुपये 1 भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता "सर्वसमावेशक पीक विमा योजना" सन २०२३-२४ पासून राबविण्यास २३ जून२०२३ रोजीच्या कृषी  विभागाच्या   शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून प्रतिवर्ष रुपये ६०००/- शेतक-यांना देण्यासाठी नमो किसान शेतकरी महासन्मान’ निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अथवा वेळ प्रसंगी राज्य शासनाच्या निधीतून मदत दिली जातेअसेही त्यांनी सांगितले.

00000

न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

 न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

            नागपूरदि. 18 : राज्यातील मराठा- कुणबीकुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला.  विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलआमदार भरत गोगावलेमुख्य सचिव मनोज सौनिकसामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे आदी उपस्थित होते. यापूर्वी न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर न्या. शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल आज सादर केला.

            राज्यातील कुणबी- मराठा व मराठा- कुणबी जातीचा शोध घेऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी नियुक्त न्या. शिंदे समितीने अभिप्रेत असे कामकाज केले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव डॉ. भांगे यांनी समितीने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

०००००

अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

 अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

 

            नागपूर दि. 18 : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले.

            विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलवनमंत्री सुधीर मुनगंटीवार,

            राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाईग्रामविकास मंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेमुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            आज झालेल्या मदत वाटप कार्यक्रमात धान पिकासाठी मौदा तालुक्यातील गोविंदा गोपाळ डांगरे (बाबदेव)राघू सदाशिव आखरे  (बाबदेव)सूर्यभान विठोबा डांगरे  (बाबदेव)  श्रीकांत जागो किरपान (चिरव्हा) योगेश यादवराव पत्रे  (धानला) अंकित मनोहर चामट  (गोवरी)  धर्मपाल नागोजी तेलंगराव  (मारोडी)शरद सुमदेव किरपान  (पिपरी)श्रीनिवास शामशिवराव देवानेनी (पिपरी)सुदेश मोडकू चव्हाण (पिपरी)नथू काशिराम चकोले (सिंगोरी)कवडू सिताराम नाकाडे (बोरी सिंगोरी)प्रभाकर भोपाल नागपुरे  (बोरी सिंगोरी) आणि सुरेश महादेव पोटभरे  (बोरी कांद्री) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश हस्ते वितरित करण्यात आले.

            नोव्हेंबर २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची मदत संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन (डीबीटी) पद्धतीने जमा केली जाईल. ३ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर. बागायत पिकासाठी २७००० रुपये प्रति हेक्टरबहुवार्षिक पिकासाठी ३६००० रुपये प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

नाफेड' आणि 'एनसीसीएफ' महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ' महाराष्ट्राकडून

 दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

            नवी दिल्लीदि. १८ एनसीसीएफ (NCCF) आणि 'नाफेड'च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णयकेंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, 'एनसीसीएफ' च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली.

देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगरधुळेपुणेसोलापूरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 'एनसीसीएफ' आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. 'एनसीसीएफ'ने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि 'एनसीसीएफ'कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही  श्रीमती चंद्रा यांनी सांगितले.

'एनसीसीएफ'च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्लीकोलकातापाटणाबंगळुरूमुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे.  कांदागव्हाचे पीठडाळींपाठोपाठ 'एनसीसीएफ'तर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात  विक्री करणार असल्याची माहिती श्रीमती चंद्रा यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार 'नऊ' ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

 महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार 'नऊ' ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

नवी दिल्ली, 18: कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्रमध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ 'ईएसआयसी' रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची  माहितीकेंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे.

नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या 'ईएसआयसी'च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

            महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशे वीस करण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली आहे. तसेचअंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभतसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली.

            महाराष्ट्र राज्यासोबतचगुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहेतरओडिशातील राऊरकेलामधील रुग्णालयात खाटांची संख्या 75 वरून दीडशे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0000

Monday, 18 December 2023

अहमदनगर जिल्ह्यातील भानगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

 अहमदनगर जिल्ह्यातील भानगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

मंत्री गुलाबराव पाटील

            नागपूर दि.15 : जल जीवन मिशन अंतर्गत भानगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथील नळ  पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

भानगाव (ता. श्रीगोंदाजि. अहमदनगर) येथील नळ  पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते.

            मंत्री श्री पाटील म्हणाले कीजलजीवन मिशन अंतर्गत भानगाव योजनेचे उर्ध्व वाहिनीचे व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण असून उंच टाकीचे पहिल्या टप्प्यापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. योजनेचे काम प्रगतीत आहे. सद्यःस्थितीत भानगाव गावठाण व तीन वाड्या वस्त्यांना अस्तित्वातील योजनेव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.

नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू

 नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू


- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


            नागपूर दि.15 : नागपूरसह राज्यातील वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयांमध्ये शासनाने 11 जुलै 23 रोजीच्या आदेशान्वये रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यास मान्यता प्रदान केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.


            नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.


            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ऑनलाइन सेवा सुरू करून बंद पडलेल्या सोयीसुविधांसाठी गव्हर्न्मेट मार्केट प्लेस अर्थात जेम (GeM) पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया लवकरच आयुक्तस्तरावरून राबविण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi