Tuesday, 19 December 2023

अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

 अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत

 

            नागपूर दि. 18 : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले.

            विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलवनमंत्री सुधीर मुनगंटीवार,

            राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाईग्रामविकास मंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेमुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            आज झालेल्या मदत वाटप कार्यक्रमात धान पिकासाठी मौदा तालुक्यातील गोविंदा गोपाळ डांगरे (बाबदेव)राघू सदाशिव आखरे  (बाबदेव)सूर्यभान विठोबा डांगरे  (बाबदेव)  श्रीकांत जागो किरपान (चिरव्हा) योगेश यादवराव पत्रे  (धानला) अंकित मनोहर चामट  (गोवरी)  धर्मपाल नागोजी तेलंगराव  (मारोडी)शरद सुमदेव किरपान  (पिपरी)श्रीनिवास शामशिवराव देवानेनी (पिपरी)सुदेश मोडकू चव्हाण (पिपरी)नथू काशिराम चकोले (सिंगोरी)कवडू सिताराम नाकाडे (बोरी सिंगोरी)प्रभाकर भोपाल नागपुरे  (बोरी सिंगोरी) आणि सुरेश महादेव पोटभरे  (बोरी कांद्री) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश हस्ते वितरित करण्यात आले.

            नोव्हेंबर २०२३ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची मदत संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन (डीबीटी) पद्धतीने जमा केली जाईल. ३ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायत पिकासाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर. बागायत पिकासाठी २७००० रुपये प्रति हेक्टरबहुवार्षिक पिकासाठी ३६००० रुपये प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi